Posts

Showing posts from December, 2020

गजर

Image
गजर...      'विठू चा गजर' जसा हवा हवासा वाटणारा, तसाच हा आपल्याला दररोज न चुकता ऐकवा लागणारा पण नकोसा वाटणारा तो घड्याळाचा गजर..      हे लिहिताना सुद्धा माझ्या कपाळावरती आठ्या उमटल्या..कारण गजर म्हणताच माझ्या डोळ्यासमोर येतं ते चावी द्यावं लागणारं ते जुनं गजराचं घड्याळ..या घड्याळाची गणना बहुतेक आता पुरातन वस्तुंमधेच होत असावी इतकं ते दुर्लभ झालेलं आहे.. पण मी लहान असताना हे घड्याळ आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होतं..सकाळी याच्या कर्कश्श आवाजाने आमच्या सारख्या अनेकांचा दिवस सुरु व्हायचा..सहसा हा वाजलाच नाही असं व्हायचं नाही..पण कधी झालंच..तर उठायला उशीर, आईच्या डब्याला उशीर, बाबांची अमुक वाजून अमुक मिंटांची गाडी चुकायची, शाळेसाठी मला आवरायला उशीर, अशा घडामोडी घडायच्या.. पण सर्वात वैताग यायचा तो त्या गजराच्या कर्कश्श आवाजाचा..जणू काही आपल्या कानापाशी येऊन एखाद्द्या पिशच्चाने बोंबलावं, " ए ऊठ नालायक, लाज नाही वाटत झोपून रहायला?.. खूप झाली झोप!"... अशा थाटात तो गजर व्हायचा की आपण खडबडून जागे झालो नाही तरंच नवल..साधारण अर्धा मिनीट हा असा गजर रोज व्हायचा..आमच्या घरात हे