सापायन
आयुष्य अकल्पित आहे म्हणतात त्याची मागच्या गुरुवारी प्रचिती आली.. सकाळी सकाळी घरात एकच धांदल उडाली.. अचानक खालच्या मजल्यावरून सचिन ची हाक ऐकू आली..एरवी मारलेली नुसती हाक आणि आजची हाक यात फरक जाणवत होता.. एका खोलीच्या दारापाशी साप बसला होता..पूर्ण वाढ झालेला मोठा साप..सचिन पाहिल्यापासून प्राणी ,पक्षी आणि कीटक प्रेमी ..त्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं असेलच पण घरात साप आल्याचा आनंद नक्की झाला असेल..भीती नक्की वाटली नाही.. त्या हाकेचा उलगडा झाला..आश्चर्य, आनंद मिश्रित होती ती..😀.. मला सचिनने सापासमोर उभं राहून व्हिडिओ कॉल केला..खोलीतून महाशय आत गेलेले आणि बाल्कनी चं दार बंद असल्यामुळे त्याला टेकून थांबलेले ..वळवळ होतीच सुरु.. तेवढ्यात आमचे चिरंजीव उठले..त्यालाही प्राण्यांविषयी अत्यंत प्रेम आणि कुतूहल..भीती अशी नाहीच..त्याला म्हटलं 'साप आलाय घरात..बघायचा का तुला?" एकदा का साप बघण्यात गुंग झाला की हा आवरायचा नाही..म्हणून त्याचं उठल्यानंतरचं पटपट आवरून झाल्यावर खाली गेलो.. तोपर्यंत साप महोदय पलंगाच्या फटीत जाऊन बसले..आम्हाला दिसले नाहीत..त्यावरून आमचे चिरंजीव ठाण मांडून बसल...