अनुभूती...

  सर सलामत तो पगडी पचास' अशी म्हण आहे...खरं तर अजून एक म्हण प्रचलित व्हायला हवी... 'मन सलामत तो पगडी पचास' ....
उद्या दहा ऑकटोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस..या अनुषंगाने काही सुचलं, ते शेअर करते. 
मन' असं म्हटलं की त्याला अनेक पैलू ,अनेक अर्थ, अनेक परिभाषा आहेत. पण हे मन नावाचं जे काही आपल्यापाशी आहे, ते सतत कार्यरत राहतं ते कशाच्या जोरावर? तर अनुभवांच्या...आपल्या समोर जे घडतंय..त्याला आपण काहीतरी प्रतिसाद देत असतो . त्यातूनच मन कार्यरत राहत..
अनुभव घेत राहून मन कार्यरत नक्की राहील. पण मानवी मनाची कक्षा इथपर्यंत मर्यादित नाही. आपण केवळ अनुभव घेत राहिलो तर एकावर एक असे नुसते थर साचत राहतील. मिळलेल्या अनुभवाचा विनियोग करायची वेळ येईल तेव्हा यातला नेमका कुठला,  कधी आणि कसा वापरायचा हे समजणारच नाही..
मग नेमकं काय घडलं पाहिजे? तर अनुभव हा ,अनुभूती पर्यंत पोहोचतोय का यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अनुभूती ची माझी व्याख्या हि अशी.. 'ज्ञानदायी अनुभव म्हणजे अनुभूती' ...ज्या अनुभवातून आपल्याला ज्ञान होतं ,ती अनुभूती.. ज्ञान...माहिती नव्हे...
अशाच अनुभूतींच्या आधारे मानसिक स्थैर्य टिकवता येऊ शकतं..त्यातूनच पुढे सृजनशीलता आणि एखादा आविष्कार घडून येतो. याचा संबंध फक्त कलाविष्काराशी नाही बरं..
अनुभव हा फक्त माहितीत भर घालू शकतो पण जेव्हा अनुभूती होते, तेव्हा ज्ञानात भर घातली जाते . यातूनच आपले विचार , जाणीव , धारणा, समृद्ध होत राहतात. या सगळ्याचा थेट संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी आहे असं मला वाटतं..
मला माहिती मिळली म्हटल्यानंतर आपल्याकडे माहिती उपलब्ध असते, जी आपण सांगू शकतो, पण मला ज्ञान झालं म्हणताना आपल्याला जे मिळालय ते फक्त आपल्यापाशी राहत , ते सांगता येत नाही, ..ज्ञानाच्या कक्षा रुंदाव्या म्हणून आपण चार ठिकाणी, जातो , चर्चा करतो, चार लोकांना भेटतो ,पण पुन्हा यातून जे मिळत ते आपल्यापाशी राहत..आणि केवळ राहत नाही तर त्याला प्रत्येक जण आपला वेगळा आकार देतो..हि झाली अनुभूती..
असा प्रत्येक क्षण आपला गुरू असतो..आपल्या हातात असत समतोल राखत अनुभवाला अनुभूती पर्यंत नेणं..प्रत्येक क्षणाची 'धानावस्था' करणं..when you already have 'felt' it but still you choose embrace the nothingness within you'
हि सतत घडत राहणारी प्रक्रिया आहे..आणि ती घडत राहिली पाहिजे.. कारण ती नैसर्गिक आहे. जेव्हा यातून आपण स्वतःला वेगळे काढू लागतो,  तेव्हा मानसिक आरोग्य ढळत असावं असं वाटतं. 
जागतिक मानसिक आरोग्य दिवसाच्या औचित्याने 'मन', अनुभूती आणि मानसिक आरोग्य यासंबंधी विचार मांडायचा प्रयत्न केलाय. 🙏
Image source: google

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....