एका अंघोळीची गोष्ट

अंघोळ म्हटलं की मला सध्या एकच चित्र डोळ्यापुढे दिसतं ..जे कदाचित घरोघरी दिसत असेल किंवा नसेलही..रोज एक ठरलेला प्रश्न मी सचिन ला नक्की विचारते (हुकूम करते म्हंटल तरी चालेल) अंघोळ कधी करतो आहेस?...त्यावर तो ," जातोय, कळलं ना!" असा वैताग मिश्रित राग दाखवत अंघोळीला जाण्याचं मनावर घेतो..
अंघोळ करणाऱ्यांच्या 2 categories असतात..एक, ज्यांना अंघोळ करताना विलक्षण आनंद मिळतो , त्यामुळे ते अंघोळ झाल्या नंतर नवीन जन्म झाल्याच्या आविर्भावात बाहेर येतात, सचिन सारखे,..तर दुसरे ,ज्यांना अंघोळ हि केवळ औपचारिकता वाटते , त्यामुळे ते अं घो ळ हि ३ अक्षर उच्चारायच्या आत बाहेर आलेली असतात, कावळ्याची अंघोळ करणारे , माझ्यासारखे..
म्हणूनच सचिन सारख्या लोकांना आंघोळीचं वेळापत्रक केलेलं आवडत नाही , ते दिवसभरात कधीही व कितीही वेळ अंघोळ करू शकतात..तर माझ्यासारखे," एकदाची करून टाकूया ती अंघोळ" म्हणून प्रकाश वेगाने अंघोळ करून येतात. मुद्दा काय , तर अंघोळी वेळेवर व्हाव्या आणि घराचं वेळापत्रक बिघडू नये..पण त्यावर "माझ्या अंघोळीचा आणि घरातल्या रुटीन चा संबंध काय?" असा निरागस प्रश्न सचिन विचारतो..त्यावर," मला मशीन लावायचं असतं , कपडे वाळत घालायचे असतात" असं प्रत्युत्तर मी देते..पण अर्थातच त्यावर ब्रह्मास्त्र चालवत "मग माझे कपडे राहूदेत आजचे, उद्या टाक धुवायला" असं म्हणतो..मी " मै चूप रहुंगी" सिनेमा ची नायिका होते , आणि घरचं रुटीन म्हणजे रोजच्या रोज सगळे कपडे धुतले गेले पाहिजेत, हे त्याला पटवून द्यायला असमर्थ ठरते.
आता तुम्ही म्हणाल यात अंघोळीची गोष्ट कुठे आली. 
तर गोष्ट ही नाहीच मुळी.. हि तर 'अंघोळ' म्हटलं कि काय घडतं आमच्या घरात याची प्रस्तावना..
आता गोष्टीकडे येते..साल होतं 2012, ऑगस्ट महिना..कॉलेज मधे माझी सिनियर असलेली मैत्रीण मधुरा खिरे हिच्या पाथफाईंडर डान्स ग्रुप मध्ये तेव्हा मी व माझ्या अजून काही मैत्रिणी काम करायचो. मधुराच्या पुढाकारानेच जपान मध्ये होणाऱ्या World Music and Dance festival मधे नृत्य सादर करण्याची संधी आम्हा सर्वानां मिळाली.
तिथे जाण्या अगोदर जपानी संस्कृती, नियम , तिथल्या लोकांची शिस्त, आवड-निवड याबद्दल आम्ही जाणून घेत होतो..एक मजेशीर गोष्ट समजली. जपान मध्ये समूह अंघोळीची संस्कृती आहे. एरवी जपानचं आयुष्य अगदी शिस्तबद्ध व व्यस्त असल्यामुळे अंघोळ करताना त्यांना गप्पा मारायला आवडतं. त्यामुळेच तिथे पब्लिक बाथ हि संकल्पनाही आहे म्हणे जिथे सर्व बायका एका ठिकाणी व पुरुष एका ठिकाणी groups मध्ये अंघोळ करतात.
 तर, आमची सोय एका dormitory मध्ये केलेली. जगभरातून त्या महोत्सवात नृत्य गायन सादर करायला कलाकार आलेले. आणि अतिशय व्यवस्थित शिस्तबद्ध सोय केलेली होती. आम्हा आशियाई खंडातील देशाच्या कलाकारांना एका ठिकाणी उतरवलेलं. तिथे जाण्यापूर्वी group bath ची सोय तिथे आहे, single bathrooms नाहीत याची कल्पना आम्हाला दिलेली. ते कळताच आम्ही कपाळाला हात लावला होता, मात्र करू, बघू, काहीतरी सोय होईल असा आमचा समज होता. 
   आम्ही तिथे पोहोचलो तोपर्यंत म्हटलं तर संध्याकाळ होत आलेली. आदल्या दिवशी भारतातून सकाळी लौकर निघालेले आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिथे पोहचलो. सर्व कलाकारांकरता वेलकम पार्टी होती , तुम्ही फ्रेश होऊन खाली बस मध्ये या , इतर सर्व ग्रुप्स तिथे पोहोचले आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यामुळे येऊन अंघोळ करण्या इतका वेळ आमच्याजवळ नव्हता. कपडे बदलले आणि वेलकम पार्टी ला गेलो. 
परत यायला उशीर झाला नाही. पण एक बॉम्ब नक्की पडला. तिथे सगळे रात्रीच अंघोळ करायचे. तेव्हा उद्या सकाळी थोडं लौकर उठून अंघोळी उरकू चा आमचा बेत फसला होता. पार्टी वरून परत आलो आणि अंघोळीच्या एरिया कडे गेलो. अर्थातच जेन्टस लेडीज साठी वेगवेगळी व्यवस्था होती. पण म्हणून काय झालं!..एकत्र अंघोळ करायच्या कल्पनेने आम्ही मुली गर्भगळीत झालो. अर्जुनाने जसे करुक्षेत्रावर हत्यार टाकले तसेच, अंघोळ करण्याआधीच हातातले कपडे टाकून आम्ही बसलो होतो. एक एक जण येत होती आणि अर्थातच अंघोळ करतात त्या स्थितीत, तिचे कपडे एका बास्केट मध्ये ठेवून बाथरूम मध्ये शिरत होती .
आम्ही सगळ्या मैत्रिणी, कधीतरी हे बाथरूम रिकामं होईल आणि आपण एकेकीने आत जाऊन अंघोळ करू असे plans आखत होतो. पण एक ना दोन..आता करायचं काय ? आम्ही जवळ जवळ १०-१२ दिवस तिथे असणार होतो, पैकी रोज आम्हाला नृत्य सादर करायचं होत. एवढे दिवस अंघोळ न करून चालणार नव्हतं. काय करावं सुचेना, धर्तीने दुभंगून आम्हाला तिच्या पोटात घ्यावं , निदान तिथे तरी अंघोळ व्यवस्तिथ होईल असं आम्हाला वाटलं. एकीकडे आम्हाला हसू आवरत नव्हतं , इतर मुली 'तशाच' आत जातायत तर आपण का नाही जाऊ शकत. भारताची लाज काढायची का इतर देशांपुढे असे विचारही आले मनात.
अखेर, मी हिम्मत एकवटली, ठीके , कोई बात नही. माझ्या मैत्रिणींना म्हटलं , पूर्ण कपडे उतरवून अंघोळ करण्याची तर अट नाहीये. मी युक्ती शोधली. इतर कपडे उतरवून अंतर्वस्त्र घालून जणू लढायला निघालोय, या अविर्भावात आम्ही त्या प्रशस्त बाथरूम मध्ये शिरलो. तिथे बाकी सगळ्या मुली कशा होत्या हे वेगळं सांगायला नको...खरी गम्मत इथे घडली,..त्या सगळ्या मुली 'तशाच' होत्या , आम्ही मात्र censored होतो, पण..आम्ही आत शिरताच जणू विश्वरूप दर्शन व्हावं अशा थाटात त्या १०-१५ मुली आमच्याकडे बघायला लागल्या..त्यांच्या या अशा बघण्यामुळे दोन मिं आम्ही गोंधळलो.कपडे कुणी घातलेत आणि कुणी नाही हेच समजे ना..आम्ही कमीत कमी का होईना, कपडे घातलेले, आणि त्या बाकी 10-12 जणी 'तशाच'..मग लक्षात आलं, odd man (women) out आपणंच आहोत म्हणून या आपल्याकडे बघतायत..chill...
जापनी बाथरूम बघण्याची आमची पहिलीच वेळ , साधारण आपल्या घरच्या हॉल एवढं मोठं बाथरूम, त्यात भरपूर शॉवर्स , बादली-मग अशी काही पद्धत नव्हती , किंवा त्या शॉवर्स ना आडोसेही नव्हते. बाथरूम च्या एका टोकाला टब बाथ होता. तो टब सुद्धा भला मोठा, एका वेळी 5 जणी आरामात डुंबत बसतील एवढा! आम्हा सगळ्या एशियन देशातल्या मुलींचा जणू तिकडे बाथरूम मध्ये मेळावाच भरलेला...आमच्या आधी एक दोन दिवस त्या मुली तिथे आल्यामुळे त्यांना या पद्धतीची सवय झालेली इतकंच. आम्ही मात्र पुढले 10 दिवस तिथे असताना भारताची लाज राखत पूर्ण नग्न न होता 'अंतर्वस्त्र' घालूनच अंघोळ करणं पसंत केलं..त्या मुलींना लक्षात आलं असावं की आम्ही फारशा कम्फर्टेबल नाही, पण म्हणून आम्हाला कुणी कधी त्रास दिला नाही. आम्हा मैत्रिणींनाही एकमेकींसोबत असं अंतर्वस्त्रात अंघोळ करणं पहिल्या दिवशी awkward वाटत होतं. पण कुठेतरी we had to drop our defences..उलटं असं आपल्याला पुन्हा कधी अनुभवता येणार म्हणून पुढले दहाही दिवस आम्ही अंघोळीची मजा घेतली हे खरं..
या नंतर आम्ही जेव्हा म्हणून भेटलो तेव्हा तेव्हा या अंघोळीची गंमत आठवू खो खो हसलो आहोत. बाकी मैत्रिणी 'जेवायला भेटूया एकदा' असं म्हणतात..आम्ही चौघी मात्र 'अंघोळ करायला भेटू एकदा'असं गमतीने म्हणायचो. 
In Rome behave like the Romans, तसंच in Japan behave like the Japanese..we did behave like them but wrapped it in our Indianness...🤣🤣🤣🤣

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....