पाणीपुरी

 

कधी कधी खूप अस्वस्थ वाटतं नाही का आपल्याला?...त्या जाहिराती लागत पूर्वी.."मै बहोत उदास था' ...तसं काहीसं.. आणि ..त्याच जाहिरातींमध्ये "और फिर मुझे मिला एक जादुई इलाज' ....असं ती लोकं म्हणत आणि प्रॉडक्ट दाखवत...
ते इंग्रजी लोकांवरती केलेलं हिंदी डबिंग बघताना फार हसू यायचं 😃...पण.. इथे मुद्दा तो नाही.. मुद्दा हा आहे कि अस्वस्थ वाटतं ..ताण येतो.. मग करायचं काय.. तर दोस्त हो ..एक जालीम उपाय इथे या ठिकाणी मिळालेला आहे. .झोप हा उपाय आहेच..पण तीही कमालीची शांत लागावी या करता त्या अगोदरच नको का स्ट्रेस निघायला!..किमान थोडा तरी.
त्या करता एक भन्नाट उपाय सापडला मला.. 'पाणी पुरी' 
...पाणी पुरी ला आपण गोल गप्पा, पुचका इत्यादी शब्दांनी ओळखतोच. पण आज मी त्याचा इतिहास सांगणार नाहीये, तो जाणकारांनी सांगावा.. 
तर पाणी पुरी मुळे आपला स्ट्रेस रिलीझ होतो.. कमालीचा.. 
शंभर गोष्टी चालतात ओ डोक्यात.. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे जणू आपल्याकडे पर्मनंट भाडेकरू.. उध्या-संज्या सारखे..भाडंही देत नाहीत आणि जातही नाहीत डोक्यातून...डोक्यात जातात उलटं...वर्तमानकाळात जागायचं कसं याचे जर कुणी क्लासेस सुरु केले तर किती बरं नाही का? येथे वर्तमानकाळात जगायचं कसं याचे धडे दिले जातील असा बोर्ड वाले!🤭..तर तेही असो..
तर स्ट्रेस आला कि 'पाणी पुरी' आठवायची.. हो हो..आधी आठवायची..आपण असे त्या पाणी पुरी च्या गाडी समोर उभे आहोत.. या निव्वळ कल्पनेने आपल्यात बळ येईल..'श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगावं पार्थ, उठाओ अपना गांडीव और क्षत्रीय धर्म का पालन करो"..असं म्हटल्यावर अर्जुनाच्या अंगी जे बळ आलं तसंच बळ आपल्या अंगी येईल आणि आपण तडक त्या स्थळी पोहोचू...
आपण order देतो...पुऱ्यांना अंगठ्याने पाडली जातायत...आहाहा!..त्या क्षणी त्या पुऱ्यांचा आवाज म्हणजे जणू देवळातली घंटाच वाटावी इतका गोड वाटतो..आपण पूर्ण एकाग्र होतो.. पाणी पुरी आधी त्या कोमट रगड्यात बुडवली जाते.. आणि मग त्या अमृताकडे तिचा प्रवास सुरु होतो..ज्या मध्ये तिखट, गोड ,आंबट अशा सगळ्या चवी एकत्र असतात.. पुदिन्याची खास चव...जी आपण फक्त फील करू शकतो.. तर..या अमृतामध्ये ती पुरी बुडवली जाते..आणि आपल्याला दिलेल्या प्लेट मधे ठेवली जाते..हे क्षण फार महत्वाचे..त्या ताटलीतून ती पुरी आपल्या तोंडात जाई पर्यंत..आपण अतिशय सावधतेने ती पुरी उचलतो..जणू काही आपण या करताच जन्मलो आहोत असं वाटतं..किती भावुक क्षण असतो नाही तो.. 
त्यातलं पाणी कमीत कमी सांडत ती पुरी आपण अलगद तोंडात टाकतो..हाच तो ब्रमानंदाचा परम क्षण.. परमेश्वराशी एकरूप होण्याचा...त्या पाणीपुरीतलं अमृत आपल्या शरीरात प्रवेश करतं..ती चव आपल्या जिभेवर रेंगाळते आणि अलगद आपल्या मनाचा ताबा घेते..तेवढ्यात लक्षात येतं कि असं अजून ४ ते ५ वेळा आपण अनुभवणार आहोत...आणि आपण त्वरेने पुढली पुरी उचलतो..एक पुरी तोंडात आणि एक समोरच्या ताटलीत ...जणू काही या करताच आपण जन्मलो अशी भावना निर्माण होते.. आता अजून काहीही नको..भैय्याने पाणी पुऱ्या तयार करत राहाव्या आणि आपण मन भरेस्तोवर खाव्या.. त्या वेळी तो भैय्या देवळातला पुजारी भासतो..आणि ती पाणी पुरी म्हणजे देवाचा प्रसाद.. मला वाटतं प्रसाद खाताना आणि पुरी खाताना एकंच भावना निर्माण होते मनात.. ब्रह्मानंद.. 
नाकातून येणारा शेंबूड वजा पाणी आणि डोळ्यातून येणारं पाणी यांची स्पर्धा लागते..आपण हातांनीच हे दोन्ही पाणी पुसतो आणि पुढली पुरी उचलतो...शेवटी आपल्याला सांगतेची मसाला पुरी दिली जाते जी पूजेतल्या पंचामृतासारखी वाटते..त्या अगदी एका पुरीने मन कसं प्रफुल्लित होत..आपण भैय्याला धन्यवाद देतो.. 
हीच ती ब्रह्म प्रक्रीया ज्या वाटे आपण ताणमुक्त होऊ शकतो.."और वो भी मिनिटों मे"...
आता बघा.. याचा फक्त विचार करून..त्याबद्दल नुसतं वाचूनही गेला कि नाही ताण.. म्हणजेच साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ... तेव्हा सर्वांनी हा उपाय त्वरित अवलंबवावा..मला ठाऊक आहे.. वर्णण वाचताना सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय..तेव्हा आज पाणीपुरी खायचा बेत ठरलाच असणारे सगळ्यांचा. आज स्ट्रेस बस्टर म्हणून पाणी पुरी खाऊन बघा.. आणि खाता खाताच रोमारोमातून स्ट्रेस ची हाकालपट्टी करा..
आणि हो..आज या महान कार्याकरता मी तुम्हाला प्रेरित केलं...त्याबद्दल या जगात भारी Gauri ची आठवण काढायला विसरू नका..याने काय होईल ना की, मला उचक्या लागतील आणि मी सुद्धा जाऊन पाणी पुरीचा आस्वाद घेईन...
हा आरोग्यदायी stress buster सगळ्यांपर्यंत पोहोचवा..
और हमारे channel को like करें, share करें और subscribe करें...
आपल्या पाणी पुरीस ताटकळत ठेवून आधी माझा फोटो घेतल्या बद्दल Sachin मित्रा तुझे आभार...🤣🤣

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....