कल्हई

काळ बदलला..माणसं बदलली..माणसांच्या गरजा बदलल्या...सोयीची संकल्पना सुद्धा बदलली..पर्याय उपलब्ध झाले.. अगदी दैनंदिन आयुष्यातल्या वस्तू पहा..स्वयंपाकघरातली भांडी..स्टील किंवा, अल्यूमिनियम ,प्लास्टिक, मेलामाईन ई. येण्यापूर्वी पितळ हा धातू सर्रास वापरला जात असे..किंवा मातीची, तांब्याची भांडी सुद्धा..आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही भांडी अतिशय योग्य असत..आणि मुळात तेव्हा पर्याय उपलब्धही नव्हते त्यामुळे या भांड्यांची निगा राखणं हे routine असायचं..त्यासाठी वेगळा वेळ काढायला लागायचा नाही.. या मधे पितळ्याच्या भांड्यांची कल्हई हे एक महत्वाचं काम..काल आमच्या सोसायटीत असेच एक कल्हईकार आलेले..कल्हई कशी करतात हे बघण्याची माझी पहिलीच वेळ.. कल्हई म्हणजे तांब्याच्या वा पितळेच्या भांड्यांना आतल्या बाजूने कथलाचा पातळ थर देण्याची प्रक्रिया आहे...या भांड्यात जास्त काळ ठेवलेला, विशेषतः आंबट पदार्थ भांड्याच्या धातूशी प्रक्रिया होउन खराब होऊ नये म्हणून त्याला कल्हई केली जाते..(सौजन्य : गूगल ) हे बघत असताना सुचलं, अशीच कल्हई आपण स्वत:ला सुद्धा करून घेण्याची गरज आहे का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. कामं करताना ,career ई. च्या बाबतीत आपण multitasking अगदी सहज करतो..पण हेच multitasking आपण कायम स्वरूपी , जीवन जगण्याचं एक तत्व म्हणून स्वीकाराला हवं..ते म्हणजे 'to listen, ignore and forget at the same time'.. मानसशास्त्रात emotional किंवा mental diet ही संकल्पना आहे..आपल्या स्वास्थासाठी काय योग्य ,अयोग्य, उपयोगी-निरउपयोगी अशी पडताळणी सतत करत राहिली पाहिजे..म्हणजेच मनावर कल्हईचा थर देता आला पाहिजे.. वर्तमानपत्र,टीव्ही, इंटरनेट ई. माध्यमांचा वापर आपण सगळेच करतो..या सगळ्यात हल्ली आघाडी आहे ती social media ची..दिवसातून सर्फिंग करताना अशी माहिती सुद्धा आपल्यापर्यंत येते ज्याची वास्तविक आपल्याला गरज नसते , दुस-याच्या आयुष्यात डोकवायची सवय सुद्धा यामुळे आपण लावून घेतो..पर्यायाने दुस-याचं चांगलं झालं की ईर्षेची भावना नकळत मनात घर करते..शरीरावर , मनावर ताण येऊ लागतो..शरीर आपल्याला खुणावतंही..पण आपला आपल्याच शरिराशी संवाद नाही..या सारखंच, एखादी घटना, एखाद्या व्यक्तीशी भेट जसं चांगलं शिकवते तसंच नकारात्मक लहरी सुद्धा पोहोचवते..एखादा पदार्थ आपण जरूरीपेक्षा जास्तं खाल्ला तर जसं अजीर्ण होईल तसंच काहीसं मनाचं होतं..ज्या गोष्टी आपल्याला नकोयत मात्र ऐकाव्या किंवा बघाव्या लागतात, ज्याला पर्याय नाही त्याही आपण listen, ignore and forget करत नाही.. दुस-याने काय करावं यावर आपलं नियंत्रण नाही..पण आपण आपले राजे आहोत..मनावर कल्हईचा थर सतत दिलेला असेल तर , आपली मूल्य, आपले संस्कार ,आपली स्थिरता यावर कुठलीच प्रक्रिया कधीच घडणार नाही. आपल्यापासून आपलं 'आपलेपण', आपली शांतता कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.. ताण येत असेल तर तो याचा आला पाहिजे की ही नको असलेली गोष्ट आपल्याला दिली जात्ये..मग हा ताण घालवण्यासाठी आपण काय करू? ते ऐकणार नाही, पाहणार नाही, किंवा ऐकलं,पाहिलं तरी त्याकडे दुर्लक्ष करू..आणि forward तर मुळीच करणार नाही..याने आपण आपलं आरोग्य तर सुधारूच तसंच इतरांचं सुद्धा.. 'कल्हई' तून खूप मोलाचा संदेश मिळाला...तेव्हा आजपासून या emotional diet कडे लक्ष देऊया, स्वत:च स्वत:चे 'कल्हईकार' होऊया...

Comments

Popular posts from this blog

26/11...

माझी पहिली दुचाकी....