गगन भरारी

'Dream is not what you see in sleep, Dream is something which does not let you sleep..'

 माजी राष्ट्रपती व जेष्ठ शास्त्रज्ञ भारत रत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे हे अनमोल शब्द...स्वत:चं आयुष्य आणि देशाचं भविष्य घडवण्याचा कानमंत्र म्हणून हे त्यांनी कायम जपलं.. त्यांच्या झोपेचा ताबा घेतलेलं एक स्वप्न म्हणजे भारतीय अंतराळ कार्याची (Indian space program) सुरुवात..भारताचं पहिलं रॉकेट अवकाशात झेप घेण्याच्या तयारीत होतं..डॉ.विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली त्रिवेंद्रम येथील थुंबा गावातील चर्च ची निवड करण्यात आली कारण शास्त्रीय दृष्ट्या हे ठिकाण पृथ्वीच्या विषुववृत्तावर (equator) होतं.. यासाठी चर्च च्या bishop महोदयांची परवानगी मागण्यासाठी ही जेष्ठ तज्ञ मंडळी गेली..नेमकं हो किंवा नाही मध्ये उत्तर देण्यापेक्षा बिशप महोदयांनी त्यांना रविवारी मास साठी येण्याचा आग्रह केला.. त्यावेळी बिशप जे म्हणाले ते केवळ वाचण्याजोगेच नव्हे तर जतन करण्याजोगे आहे..डॉ.कलाम यांच्या Ignited Minds:
 Unleashing The Power Within India. या पुस्तकातला हा परिच्छेद.. My children, I have a famous scientist with me who wants our church and the place I live for the work of space science and research. Science seeks truth that enriches human life. The higher level of religion is spirituality. The spiritual preachers seek the help of the Almighty to bring peace to human minds. In short, what Vikram is doing and what I am doing are the same - both science and spirituality seek the Almighty's blessings for human prosperity in mind and body. Children, can we give them God's abode for a scientific mission?"
 ....आणि 21 नोव्हेंबर 1963 या दिवशी भारताच्या पहिल्या रॉकेट ने गरूड भरारी घेतली..
 आज प्रगत भारतात जगत असताना, आपण भारतीय म्हणून कायम या सर्वांचे ऋणी राहिले पाहिजे...स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळात या आणि अशा अनेक लोकांनी भारताचं नशीब घडवण्याची स्वप्न पाहिली, एवढंच नाही, तर अथक परिश्रम घेऊन ती स्वप्न साकार केली..बिशप यांचं वरील वक्तव्य वाचून एक मोलाचा संदेश मिळतो, तो म्हणजे आपल्या देशातल्या माणसाला, आपल्या देशाला आपणंच मोठं करू शकतो..त्यावेळी जर धर्माच्या नावाखाली त्यांनी आढेवेढे घेऊन चर्च ची जागा उपलब्ध करून दिली नसती तर भारताची अवकाश प्रगती व्हायला अजून कितीतरी वर्ष वाट पहावी लागली असती.. आपल्या देशातील प्रत्येक प्रामाणिक, विवेकपूर्ण , कष्ट करणारा माणूस, मग तो नोकरदार असो, व्यावसायिक असो, कामगार असो, कलाकार असो, पुरूष असो किंवा स्त्री, तो ग्रामीण भागात राहो किंवा शहरात, कुठल्याही जाती-धर्माचा असो..तो भारतीय आहे आणि तो आपल्या कामातून आपल्या देशालाच मोठं करत आहे..
तेव्हा एकमेकांच्या पाठीशी ठामपणाने उभं राहूनच आपला माणूस, पर्यायने आपला देश मोठा होणार आहे..एकमेकांचे पाय ओढून, खाली खेचून, आपापसात जात, धर्म, पैसा ई. च्या नावाने भांडून आपण आणि आपला देश प्रगती कधीही करू शकणार नाही.
आपला लहानसा प्रयत्न सुद्धा आपल्या देशाला पुढे नेतो असा व्यापक विचार ,भारतीय म्हणून आपणंही केला पाहिजे आणि आपल्या पुढल्या पीधीलाही आपण हा संदेश दिला पाहिजे.. आजच्या दिवशी भारतीय अवकाश कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली..ज्या शास्त्रज्ञांमुळे हे शक्य झालं त्या सर्वांना आणि तेव्हापासून ज्यांच्या प्रयत्नांमुळे Indian space program ला आजचा जागतिक दर्जा मिळवून दिला, त्या सर्वांना साष्टांग दंडवत..(फोटो व माहिती सौजन्य: गूगल) gauripawgi.blogspot.com




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....