26/11...

  रोजच्या सारखाच दिवस उजाडला होता त्या सकाळी सुद्धा..अगदी नेहमीप्रमाणे  सुरू होणारा एक बुधवार..कुणाला ठाऊक होतं काय वाढून ठेवलंय पुढे? 26/11 ला आज 11 वर्ष लोटली असतील, गुन्हेगारांना शिक्षाही झाली असेल..मात्र वरून खपली धरलेली असली तरीही मनावरच्या जखमा अजूनही ओल्या च आहेत..
   अलिकडे  निवृत्त वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री.रमेश महाले, 26/11 हल्ल्यांचे मुख्य तपास अधिकारी यांनी लिहिलेलं 'कसाब आणि मी' वाचलं..
    26/11 चा भीषण नरसंहार, त्यामागचं कारस्थान, तपास, सूत्र, पुरावे, साक्षीदार ई सर्वकाही या पुस्तकात विस्तृत लिहिलंय..वास्तव खरोखरंच एवढं भयानक असू शकतं यावर विश्वास बसत नाही.
 
  पोलीस म्हणजे सरकारी नोकर, दिलेलं काम तेवढं करणार असा आपला समज असतो..हे पुस्तक वाचून मात्र पोलीस खात्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला..
    गुन्हा काय घडलाय, कुठे घडलाय याच्या कायदेशीर कारवाया जसं पोलीस करतात , तसंच गुन्हेगार, त्याची मानसिकता, गुन्ह्याकडे काय दृष्टीने पाहिलं पाहिजे, त्यानुसार तपास करणं ही महत्वाची कामगिरी सुद्धा पोलिसांना बजावावी लागते..
        26 /11 नंतर तपासाचं काम  20-20 तास पोलिसांनी केलंय..यात केवळ पोलीस खातं नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा यात किती फरफट झाली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही ..
     कसाब आणि त्यासारखे अन्य तरूण..वय 20-21 किंवा त्याहीपेक्षा कमी..ज्या वयात चांगलं काम करून, कष्ट करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठीच्या विचाराने झपाटलं पाहिजे होतं तिथे या तरूणांना भारतियांचा नरसंहार या भीषण विचाराने झपाटलं..
     त्यांच्या विवेकालाच काबीज केलं गेलं..संमोहित (hypnotise) केलं गेलं..एवढं की माणसाला मारून स्वर्ग मिळत नसतं हे सुद्धा त्यांना कळू नये..
     अशाच आपल्या आसपास सांमोहित करणा-या अनेक गोष्टी आहेत..आपण कोण? आपला जन्म कशासाठी? आपल्या जगण्याचा उद्देश्य काय? हे तत्त्वज्ञान वगैरे सांगणारे प्रश्न आहेत का?
     विचार केला तर किती साधे-सरळ प्रश्न..आपण कोण? मी या पृथ्वीतलावरचा एक सर्व सामान्य जीव
     माझा जन्म कशासाठी? स्वत:च्या आणि माझ्या पृथ्वीतलाच्या उन्नती साठी..जगण्याचा उद्देश्य काय? कुणालाही मानसिक किंवा शारिरीक इजा न करणं..
     यापेक्षा वेगळी उत्तरं असली तरी याच उत्तरांच्या जवळची असणार..ही साधी उत्तरं उराशी बाळगली तरी आपण आपलं जगणं सुखकर नाही का करू शकणार?
    नरसंहार करणं तर अनाकलनीयच, आपलं प्रत्येक चुकीचं पाऊल, मग ते कुणाला फसवणं असो, tax नं भरणं असो, सिग्नल नं पाळणं असो किंवा रसत्यावर थुंकणं असो हे आपली, पर्यायाने आपल्या देशाची, आपल्या अस्तित्वाची फसवणूक नाही का? मग पुन्हा त्याच 3 प्रश्नांचा विचार केला पाहिजे,मी कोण? माझा जन्म कशासाठी? माझ्या जगण्याचा उद्देश्य काय?
     ही सततची विचारप्रक्रीया, आपण, या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून करण्याची गरज आहे..तसेच ती आपल्या पुढल्या पीढीलाही शिकवण्याची गरज आहे..हो..वाईट विचार करायला जसं शिकवावं लागतं तसाच चांगला विचार करायलाही शिकवावं लागतं..

Comments

  1. अगदी बरोबर..चांगला विचार सुध्दा मनावर बिंबवायला लागतो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कल्हई

माझी पहिली दुचाकी....