Posts

Showing posts from 2026

सापायन

Image
आयुष्य अकल्पित आहे म्हणतात त्याची मागच्या गुरुवारी प्रचिती आली.. सकाळी सकाळी घरात एकच धांदल उडाली.. अचानक खालच्या मजल्यावरून सचिन ची हाक ऐकू आली..एरवी मारलेली नुसती हाक आणि आजची हाक यात फरक जाणवत होता.. एका खोलीच्या दारापाशी साप बसला होता..पूर्ण वाढ झालेला मोठा साप..सचिन पाहिल्यापासून प्राणी ,पक्षी आणि कीटक प्रेमी ..त्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं असेलच पण घरात साप आल्याचा आनंद नक्की झाला असेल..भीती नक्की वाटली नाही.. त्या हाकेचा उलगडा झाला..आश्चर्य, आनंद मिश्रित होती ती..😀.. मला सचिनने सापासमोर उभं राहून व्हिडिओ कॉल केला..खोलीतून महाशय आत गेलेले आणि बाल्कनी चं दार बंद असल्यामुळे त्याला टेकून थांबलेले ..वळवळ होतीच सुरु.. तेवढ्यात आमचे चिरंजीव उठले..त्यालाही प्राण्यांविषयी अत्यंत प्रेम आणि कुतूहल..भीती अशी नाहीच..त्याला म्हटलं 'साप आलाय घरात..बघायचा का तुला?" एकदा का साप बघण्यात गुंग झाला की हा आवरायचा नाही..म्हणून त्याचं उठल्यानंतरचं पटपट आवरून झाल्यावर खाली गेलो.. तोपर्यंत साप महोदय पलंगाच्या फटीत जाऊन बसले..आम्हाला दिसले नाहीत..त्यावरून आमचे चिरंजीव ठाण मांडून बसल...

धुरंधर

Image
' धुरंधर '... अलिकडे आपण सगळ्यांनीच एक अद्भुत चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिला असेल..ott वरही हा चित्रपट प्रदर्शित झालाय..ott वर पुनः पुनः एखादं दृश्य आपण पाहू शकतो आणि दादही परत परत देऊ शकतो..काही दृश्य आपल्याला निशब्दही करतात. अर्थात सगळ्याच चित्रपटाच्या बाबतीत असं होणार नाही..धुरंधर मात्र अपवाद आहे.. म्हणूनच' अद्भुत ' हा शब्द वापरावासा वाटला या साठी...एकाच चित्रपटात एकाच मनुष्याने जगलेली तीन परस्पर विरोधी आयुष्य या चित्रपटात दाखवली आहेत.. देशभक्ती रक्तात घेऊन जन्मलेला आणि फौजेत जायची तयारी करत असलेला तरुण जसकीरत ..आई वडील आणि बहिणींबरोबर एका सुखी आनंदी कुटुंबाचा भाग असलेला जसकीरत एकीकडे.. तर ,कुटुंबावर अन्याय झाल्यावर त्याच्याविरुद्ध एकटा लढणारा आणि पुढे जाऊन मिळालेल्या संधीचं सोनं करत शत्रूचा नायनाट करणारा हम्जा अली मझारी एकीकडे... केवळ अद्भुत आहे हा त्याचा प्रवास.. या सगळ्या गोष्टी बघत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्याच्या भूमिकेला मिळालेले अगदी नाममात्र पण परिणामकारक संवाद. ' घायल हो इसिलिये घातक हो ' इंटेलिजन्स चीफ अजय सन्याल यांनी म्हटलेला ...