Posts

Showing posts from July, 2023

कर्मभूमी ते पुण्यभूमी...

Image
    माझ्या नृत्य वर्गात ऊर्जेचा सर्वात मोठा झरा असतात त्या माझ्या छोट्या विद्यार्थिनी. शिकायला नव्याने सुरुवात केल्यामुळे उत्साह तर त्यांच्यात असतोच. त्याचबरोबर नवीन काय शिकतोय या बद्दल प्रचंड कुतूहल सुद्धा असतं.  सद्ध्या वार्षिक कार्यक्रमाची तयारी क्लास मधे सुरु आहे. अशावेळी लहान विद्यार्थिनींना समजेल, आवडेल आणि सादर करतानाही आनंद मिळेल असा आशय असलेलं काव्य त्यांच्यासाठी विचारपूर्वक निवडावं लागतं. आपल्या भारत देशाचं गुणगान गाणारं 'वंदे मातरम' हे असंच एक परिपूर्ण काव्य या वर्षी मी निवडलं.  मुलींना विचारलं , "याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? त्यांना जमेल तसं सोप्या भाषेत त्या सांगू लागल्या. वनस्पती, फळं, फुलं, नद्या, पर्वत रांगा, वारे सगळ्यांनी समृद्ध असा आपला देश आहे.   मात्र ही चर्चा एवढ्यावर थांबली नाही. विषय रंगत गेला आणि अचानक एकीने प्रश्न केला. ताई, कंट्री (देश) सुद्धा देवाघरी जाते का? आणि आपल्या सारखंच, कंट्री बॉर्न सुद्धा होते का (जन्म सुद्धा घेते का) वय वर्ष 7 असलेल्या या माझ्या विद्यार्थ्यांकडून हा प्रश्न येणं तसं अनपेक्षित होतं. दोन्ही प्रश्नांची उत्