Posts

Showing posts from August, 2020

हरे कृष्ण...

Image
    रविवार सकाळ सगळ्यांसाठी खास नाही का? शाळेत जाणारी मुलं असो किंवा मोठी माणसं..उद्या रविवार हे माहिती असल्यावरंच निम्मा खूश होतो माणुस..हा असा एक दिवस आहे की ज्या दिवशी आपल्यावर घडाळ्याचं वर्चस्व नसतं..       माझी शाळा कायम सकाळची..त्यामुळे रात्री लौकर झोपा..सकाळी लौकर उठा हेच रोजचं चक्र..असं आसल्यामुळेच मला रविवारी थोडं उशीरा उठण्याची मुभा होती..मात्र तरी ,माझा रविवारचा एक गजर होता..टी.व्ही  वर "कृष्णाssssss" असं ऐकू आलं रे आलं की मी उठायचेच...श्री रामानंद सागर कृत "श्रीकृष्ण" तेव्हा दर रविवारी सकाळी 9 वाजता दूरदर्शन वर लागायची..यात एक श्रीकृष्ण भेटायचा तर त्यानंतर 10 वाजता सुरु होणा-या श्री.बी.आर.चोप्रा यांच्या 'महाभारतात' भेटायचा तोही श्रीकृष्णच..       बालवयात मनावर गारूड घालणा-या या दोन मालिका आजही तितक्याच प्रभावी ठरतात म्हणजे बघा! पण त्या लहान वयात इतर पात्र किती समजत असतील ठाऊक नाही पण मनात घर करतात ते भगवान श्रीकृष्ण..ते परमेश्वर आहेत..शाश्वत आहेत..तरी ते मनुष्य रूपात अवतरले आहेत. म्हणूनच मनुष्य जन्माच्या मर्यादा बंधनं त्यांनाही पाळावी