Posts

Showing posts from September, 2020

न जाणलेले भगतसिंह

Image
दिनांक 28 सप्टेंबर 1907...शहीद भगत सिंह संधू  यांचा जन्मदिवस..आपण भगत सिंह , सुखदेव आणि राजगुरु या महावीरांची आठवण काढतो आणि त्यांना वंदन करतो ते 23 मार्च 1931 साठी..ज्या ऐतिहासिक दिवशी हे तिघे वीर पुरुष हसत हसत, भारतासाठी फासावर चढून शहीद झाले. पण आज भगत सिंह यांच्या जन्मदिनी त्यांच्या बद्दल लिहावंसं वाटलं ते वेगळ्या कारणासाठी.. "शेतात बंदूक पेरली तर त्यातून हजार बंदुका उगवतील"...लहानग्या भगत चे हे विचार.. भारत देशाप्रति असलेला श्रद्धा व समर्पण भाव, आपल्या देशावर असलेलं नितांत प्रेम आणि देशाला सशस्त्र क्रांतीतून स्वातंत्र्य मिळावं हे रक्तातंच असलेलं भगत सिंह नावाचं हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होतं. देशासाठी आपलं घरदार सोडण्यापासून ते पंडित चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान सोशलिस्ट रीपब्लिकन असोसिएशन ची स्थापना होईपर्यंतचा मोठा काळ भगत सिंह यांनी पाहिला.. या सगळ्या दरम्यान अनेक घडामोडी घडत गेल्या.. रिकाम्या पोटी काहिही काम करणं जिथे अशक्य असतं तिथे पोटाला चिमटा लावून , वेळप्रसंगी 8-8 दिवस उपासमार करून, भगत सिंह आणि त्यांचे साथीदार लढत राहिले ते भारत भूमी स्वतंत्र

अशोक...

Image
   नाही..सम्राट अशोकांबद्दल हा लेख नाही..😀सम्राट अशोकां सारखा हा अशोक पराक्रमी राजा वगैरे नाही तरी, हा जितका मला विलक्षण वाटतो तितकाच, पुढे वाचल्यानंतर तुम्हालाही विलक्षण वाटेल या बद्दल खात्री आहे..    तर, हा अशोक म्हणजे आमच्या घरी स्वयंपाक करणा-या छाया ताईंचा मोठा मुलगा..इथे मी मुद्दाम इंग्रजी शब्दाचा प्रयोग आधी करतेय कारण तोच शब्द जास्तं साजेसा आहे..अशोक हा special child आहे..मराठीत ज्यासाठी 'मतीमंद' असा सहज शब्द वापरला जातो..पण माझ्या दृष्टीने अशोक हा एक विलक्षण मुलगा आहे.    आज अशोकचं वय 19-20 वर्षांच्या आसपास असेल..तसा अशोकला भेटण्याचा योग एक दोनदाच आलाय..खूप ओळख नसलेल्यांसमोर अशोक जरा बुजरा आहे. पण त्याचा विषय निघाला की छाया ताईंकडून नेहमी जे जे ऐकलं त्याने मी थक्क होत आलेले आहे..छाया ताई स्वयंपाक काम करतात तर त्यांचे यजमान छत्री इ वस्तुंची दुरुस्ती ची कामं करतात..रोजचा ठरलेला दिनक्रम..तेव्हा अशोक साठी वेगळा वेळ देणं कुणालाही शक्य नव्हतं..तरीही त्यांनी अशोकचं केलेलं संगोपन आणि त्याच्यावर केलेले संस्कार हे वाखाणण्याजोगे आहेत..सुदैवाने अशोक अपंग नाही की अशक्त न

लहानपण देगा देवा

Image
       आज जर का कुणी विचारलं की लहान असतानाचं काय miss करतेस सर्वात जास्तं? तर मी म्हणेन लहानपणंच miss करते.    मनुष्य प्राण्याचे लहानपण इतर प्राण्यांच्या तुलनेमधे सर्वात मोठं आहे. नंतरही माणसं लहान असल्यासारखी वागतात तो भाग निराळा..🤣🤣    काय आणि किती आठवावं लहानपणचं? मला आठवतंय आमच्या घरात मला प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे लाडाची नावं ठेवलेली..आजी म्हणायची, ठकू..तर काका म्हणायचा चन्नु मुन्नु 😀बाबा म्हणायचे शहाणू तर आई म्हणायची गुंडू...    बालपणाचा काळ ही खरंच मला ईश्वरी देणगी वाटते..आपण न सांगता मिळालेला खाऊ..surprise gifts..रात्री असू तिथे झोप आली तरी सकाळी जादू झाल्याप्रमाणे आपण आपल्या पलंगावर सापडायचो..कुणाच्या कडेवर बसायला कधी भिती नाही वाटली की कुणाच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसायचं tension आलं नाही..मित्र मैत्रिणींशी तासंतास खेळताना कधी आपल्याला आमक्या आमक्या 'रोगाची' लागण होईल हे डोक्यात तरी आलेलं का? तासंतास उनात खेळा..लोळा धडपडा पण आपण असं केलं तर आपल्याला त्रास होईल अशी शंकाही नव्हती..मिळालेल्या वस्तु व्यवस्थित वापरव्या ही शिकवण आई बाबांकडून मिळालीच