लहानपण देगा देवा

       आज जर का कुणी विचारलं की लहान असतानाचं काय miss करतेस सर्वात जास्तं? तर मी म्हणेन लहानपणंच miss करते.
   मनुष्य प्राण्याचे लहानपण इतर प्राण्यांच्या तुलनेमधे सर्वात मोठं आहे. नंतरही माणसं लहान असल्यासारखी वागतात तो भाग निराळा..🤣🤣
   काय आणि किती आठवावं लहानपणचं? मला आठवतंय आमच्या घरात मला प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे लाडाची नावं ठेवलेली..आजी म्हणायची, ठकू..तर काका म्हणायचा चन्नु मुन्नु 😀बाबा म्हणायचे शहाणू तर आई म्हणायची गुंडू...
   बालपणाचा काळ ही खरंच मला ईश्वरी देणगी वाटते..आपण न सांगता मिळालेला खाऊ..surprise gifts..रात्री असू तिथे झोप आली तरी सकाळी जादू झाल्याप्रमाणे आपण आपल्या पलंगावर सापडायचो..कुणाच्या कडेवर बसायला कधी भिती नाही वाटली की कुणाच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसायचं tension आलं नाही..मित्र मैत्रिणींशी तासंतास खेळताना कधी आपल्याला आमक्या आमक्या 'रोगाची' लागण होईल हे डोक्यात तरी आलेलं का? तासंतास उनात खेळा..लोळा धडपडा पण आपण असं केलं तर आपल्याला त्रास होईल अशी शंकाही नव्हती..मिळालेल्या वस्तु व्यवस्थित वापरव्या ही शिकवण आई बाबांकडून मिळालीच पण गरज पडेल तेव्हा आपल्याला न मागता गोष्टी मिळतात हा ठाम विश्वास होता..तेव्हा कुठल्याही गोष्टीवर पटकन हसू यायचं..मला तर आठवतंय मी आणि माझी मावस बहीण मनाली भेटलो की निम्मा वेळ हसतच बसायचो..आई आणि मावशी वैतागायच्या.."काय सारखं खीं खीं गं तुमचं?" या त्यांच्या वाक्यावरही आम्ही हसत सुटायचो..आता तर कारणाशिवाय हसूच येत नाही..आज आपण हसलोच नाही हे आठवलं की मात्र हसू येतं..
   लहानणी ना पैसे मिळवण्याचा ताण..ना तो साठवण्याचा..आई जेव्हा सांगायची हे पैसे घे आणि एक किलो अमुक अमुक वाण्याकडून घेऊन ये..माझं गणित सुधारावं आणि हिशोब समजावे म्हणून ती मला नेमके पैसे कधीच द्यायची नाही..पण मला खात्री होती..वाणी काका आपल्याला फसवणार नाहीत..ते बरोबर सुट्टे देणार..किती पटकन विश्वास ठेवता यायचा माणसांवर लहानपणी..
   नृत्य वर्ग संपले की आई बाबा पुन्हा घ्यायला येई पर्यंत त्यांची ओढ लागून रहायची..आणि त्या कोप-यावर ते दिसले की धावत त्यांच्या पाशी जाण्याचा आनंद काही वेगळाच..घरी तुझ्यासाठी एक गंमत आहे असं सांगितलं जायचं..वाटेत "सांग ना, सांग ना" चा तगादा लावला जायचा..आणि घरी पोहोचल्यावर अचानक surprise द्यायला आजी आजोबा आलेले दिसले की आनंद गगनात मावायचा नाही..तेव्हा, आजी आजोबा आपल्याकडे येणं हे इतकं मोठं आनंदाचं कारण असायचं..
   म्हटलं ना..अमर्याद आठवणी असतील आपल्या प्रत्येकाच्या..आज मला हे बालपण जगता येतं माझ्या लहानग्या विद्यार्थिनींमुळे..क्लास ला पोहोचण्या अगोदरंच गल्लीच्या टोकाशी 'ताssssई' अशी हाक ऐकू येते..कधी कधी आल्या आल्या अगदी कडकडून भेटतातही..ताई आज मी नवीन कानातले घातले ते ताई हे घे मी तुझ्यासाठी फूल आणलंय..असं म्हणत वाटेत दिसलेलं, झाडावरून पडलेलं फूलही प्रेमाने देतात..कधी paper quilling चे कानातले तर कधी teachers day निमित्त स्वत: तयार केलेलं छोटं greeting card..
   परत लहान होणं आपल्याला शक्य नाही..पण परत लहानपण जगणं मात्र आपल्या हातात आहे..लहानग्यांना समजून घेत त्यांच्यातलं एक होणं आपल्याला शक्य आहे..काय रे सतत आवाज करता असं न म्हणता कधीतरी त्यांच्याबरोबर आवाजही करावा..काय सारखं हसत बसता असं म्हणून रागवण्यापेक्षा कधीतरी कारणाशिवाय आपणही हसावं..
   वाचणारे म्हणतील हिला लिहायला काय जातंय..इथे येऊन बघ..🤣🤣🤣 पण हे सगळं करून थोडं detox व्हायला आपल्याला नाही का आवडणार..
   अमेरीकन साहित्यिक Dr. Seuss म्हणतात " "Adults are just outdated children"..
   त्यामुळे lets not remain OUTDATED..
   All the best. 

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....