Posts

Showing posts from October, 2020

डोळे

Image
    काय विलक्षण अवयव मिळावा हा आपल्याला....केवळ जादू..बंद असताना सुद्धा स्वप्न दाखवतो आणि उघडे असताना सुद्धा..काहिही न बोलता आपल्याला व्यक्त होण्याची सूट देतो..प्रेम..राग...अशा परस्पर विरोधी भावना सुद्धा हा आपला जादुई अवयव समोरच्या पर्यंत अगदी सहजगत्या पोहोचवत असतो..दु:ख आणि आनंदाश्रु वाहून आपल्याला मन  मोकळं करता येतं ते डोळ्यांतूनच..मेंदू पासून अगदी जवळ असलेले डोळे जणू आपला दुसरा मेंदूच..बेशुद्ध अवस्थेतला रूग्ण डोळे कधी उघडतो याकडे जास्तं लक्ष दिलं जातं..डोळे उघडले म्हणजे हरपलेलं भान ठिकाणावर आलं म्हणतात..     दिवसाचे अमुक एक तास आपल्या कोषात जाण्याची सोय सुद्धा आपल्या डोळ्यांनी केलिये बरं!..ध्यान करताना किंवा अगदी निद्रेत असताना सुद्धा डोळे मिटल्यावर आपण काही काळ 'एकांतात' जातो..आजुबाजुला कितीही कल्लोळ असो..स्वत:ला दुरुस्त करण्याची व पारखण्याची संधी या मिटलेल्या डोळ्यांमुळे रोज मिळत असते..जग जसं उघड्या डोळ्यांनी  पाहता येतं तसं बंद डोळ्यांनीही. त्याच्यावरचं मनन चिंतन हा त्यामागचा हेतू..     अलिकडे मी डोळे तपासायला गेले. खूप वर्षात तपासले नव्हते. एकूणच डोळे तपासणीकडे आपण दुर्