Posts

Showing posts from November, 2020

क्षण

Image
     खूप महिन्यांनी आखेर व्यायामशाळा उघडली...इतक्या महिन्यांची व्यायामाची विस्कटलेली घडी पुन्हा बसायला सुरुवात झाली..सकाळचं वेळापत्रक मार्गी लागलं तसं, त्या वेळी भेटणारी माणसंही पुन्हा दिसायला लागली..व्यायाम शाळेत येणा-यांशी जशी आपली ओळख होते, तसेच सकाळी आसपास फिरायला येणारे चेहरे सुद्धा ओळखीचे होतात..पार्क केलेली गाडी काढताना नावाने ओळख होत नसली तरी smile मुळे नक्की होत असते..रोजची smile हाच संवाद असतो..हां, सद्ध्या त्या करंट्या मास्कने माणसाचं स्मित मोकळेपणाने समोरच्या पर्यंत पोहोचवण्याची इच्छाच मारून टाकली आहे तो भाग निराळा..त्या मेल्या कोरोना बरोबर हा चिकटलेला मास्कही जळून भस्म होवोत अशीच प्रार्थना केली पाहिजे.. अशाच एका आजोबांशी माझी 'स्मित ओळख'...मध्य्म उंचीचे..साधारण 80 वय असलेले, हातात काठी आणि लोकरीची माकड टोपी घातलेले, अंगावर शर्ट पँट पण जरा मळलेले..त्यावरून त्यांची परिस्थिती फारशी बरी नसावी हे जाणवतं.. हे आजोबा मला नेहमी gym वरून निघालं की फिरताना दिसतात..ब-याचदा माझी निघायची आणि त्यांची तिथे फिरायला यायची एकच वेळ.. एकदा मी माझी गाडी काढून निघत असताना आजो