'ती' खूप काही करते...
कुठल्याही मालिकेवर/ सिनेमावर केलेली ही टिका किंवा युक्तीवाद नाही..आणि 'गरळ ओक' तर नाहीच नाही. एक अनुभव ज्याची आज आठवण झाली तरी मी स्वत: बद्दल नाराज होते.. काही वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट..तेव्हा मी कॉलेज मधे असेन बहुदा..बाबांचे जुने मित्र , त्यांच्या पत्नी आणि मुलं असं कौटुंबिक get together करुन एक दिवस भेटायचं ठरलं..मला आठवतं त्याप्रमाणे बाकी कुणाची मुलं सोबत आलीच नाहीत. त्यामुळे मला कंपनी नव्हती. जमेल तेवढा त्या संभाषणात मी सहभाग घेतला.. या दोघी तिघी एकाच वयाच्या बायका होत्या..मात्र यापैकी माझी आई एकटीच गृहिणी आणि बाकी दोघी नोकरदार..त्यापैकी एकीने बोलता बोलता माझ्या आईला आश्चर्याने विचारलं," तू काहीच करत नाहीस का!"..हा प्रश्न ऐकून आई जरा ओशाळली..खरं तर आईने ओशाळायचं कारण नव्हतं पण तेव्हा तिला हा प्रश्न अनपेक्षित होता. मला आजही वाईट या गोष्टीचं वाटतं की तेव्हा मी काहिही बोलले नाही. मोठ्यांच्या मधे लहानांनी बोलू नये हे संस्कार म्हणून ठीक असलं तरी त्या वेळी मी गप्प बसायला नको होतं कारण प्रश्न माझ्या आईच्या आत्मसन्मानाचा होता. त्या बाई ला गप्प केलं नाही याची आजही खं