वेग..
अगदी ४ दिवसांपूर्वी घडलेली गोष्ट. सिग्नल ला गाडीवर पहिल्या रांगेत थांबले होते. हिरवा दिवा लागल्यावर गाडी सुरु करून पुढे गेले. अर्थातच नुकताच pick up घेतल्यामुळे माझा वेग कमीच hota. क्रॉसिंग चे पट्टे ओलांडून पुढे जाते न जाते तो भरदाव वेगाने सिग्नल मोडून बाईक चालवत २ किरकोळ पोट्टी जोरात ओरडत समोरून पुढे आली. जणू काही आपणच बाईकचे जनक आणि पहिल्यांदा या जगात आपणच ती चालवतोय या आविर्भावात ती मुलं ओरडत होती. मी वेळेवर ब्रेक लावला नसता तर अर्थातच काय झालं असतं हे सांगायला नको. बरं माझी चूक नसतानाही त्यांनी मला शिवी घातलेली मला ऐकू आली. मात्र, अत्युच्च दर्जाच्या शिव्या येत असतानाही मी त्या हाणु शकले नाही. भरदाव वेगाने ती पोट्टी पुढे निघून गेली . त्यांचा पाठलाग करण्यातही अर्थ नव्हता. त्यांच्या बाईक च्या स्पीड ला माझी गाडी पळवणं म्हणजे कासवाला घोड्याच्या वेगाने पळ सांगण्यासारखं झालं असतं. काही सेकंद माझं अवसान गळालं, भीती वाटली हे मी कबूल करते. थोडी पुढे येऊन मी माझी दुचाकी थांबवली. दीर्घ श्वास घेतला. आपल्याला काहीही झालेलं नाही असं म्हणत स्वतःलाच धीर दिला. आपण काय काम करायला बाह