Posts

Showing posts from 2024

माझी पहिली दुचाकी....

Image
आपल्या आयुष्यात महत्वाचं स्थान आपली उपकरणं सुद्धा बजावतात बरं...घरातला फ्रिज , वॉशिंग मशीन ते आपली वाहनं...त्यांच्या शिवाय आपलं काय झालं असतं असं अनेकदा वाटत असणार आपल्याला..आणि ते खरंही आहे.. म्हटलं तर निर्जीव वस्तू त्या पण त्यातही आपला जीव गुंतलेला असतो..यापैकी काही बदलायची वेळ आलीच आणि त्याजागी नवीन वस्तू घरात आली तरी जुन्या वस्तूची आठवण येतंच राहते. माझ्या आयुष्यात 'सनी' ,माझी दुचाकी ही अशीच एक आठवणीतली गाडी आहे..नाशिकला असताना आम्ही सनी घेतली.. सनीच का घेतली याचं एक मजेशीर कारण बाबा सांगतात...आमच्या शेजारी राहणारे लठ्ठ वैद्य आजी आजोबा त्यांच्या सनीवरून double seat जात असंत...तिथेच तिचा दणकटपणा सिद्ध झाला आणि बाबांनी सनी घ्यायचं ठरवलं.🤣🤣🤣 सनीचा सर्वात महत्वाचा उपयोग हा मला शाळेत सोडण्यासाठी होणार होता..अर्थातच शाळा घरापासून लांब होती. त्यामुळे आईने मला सोडणं आणणं सोयीचं होणार होतं.. नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सकाळी मी आणि आई सनीवरून शाळेत जात असू..येताना ऊन असल्यामुळे जरा दिलासा असायचा..तरी ,डोक्यावर ऊन आणि गार वारा या combination मधे सनीवरून फिरण्याची मजा व