Posts

Showing posts from July, 2020

पाहुणा

Image
 आमच्या घरच्या बागेत झाडं पुष्कळ..वावरायला भरपूर जागा..मांजरं-लहान मोठे पक्षी-फुलपाखरं हे आमच्याकडे रोज येणारे पाहुणे..खरं तर त्यांना पाहुणे म्हणणं चुकीचंच..हे अवघं विश्व त्यांचं घर..त्यांनी केव्हाही आणि कुठेही मुक्त विहार करावा..अगदी मनमुराद..   साधारण वर्षा दीड वर्षा पूर्वीची गोष्ट..माझे नृत्य वर्ग घरातच तळ मजल्याला..अगदी बागेला आणि अंगणाला लागून..येण्याजाण्याला तसं बंधन नाही..नेहमेप्रमाणे मुलींचा वर्ग सुरू होता..तेवढ्यात बाहेरून कणी चालत असल्याचा आवाज आला आणि अचानक समोर देव प्रकट व्हावा तसं बाहेरुन टुणकन उडी मारून एक मांजरीचं पिल्लू आत आलं..आम्ही सगळ्या..मी आणि माझ्या विद्यार्थिनी क्षणभर दचकलो..पण ते छोटंसं गोंडस पिल्लू पाहताक्षणी त्याच्या प्रेमात पडलो..आवाजाची दिशा हेरत हे पिल्लू आत आलं होतं..अजिबात न घाबरता जणू काही जन्मो जन्मीचा संबंध असावा असं ते आमच्यापाशी आलं..माझ्या सगळ्या विद्यार्थिनी प्राणी प्रेमी..त्यामुळे कुणालाही,  त्या न कळवता आलेल्या पाहुण्याचा त्रास नाही झाला..(न कळवता येणा-या पाहुण्यांचा अनुभव सगळ्यांना असेलच)उलटं क्लास राहिला बाजुला आणि या पिल्लामागेच आमचा बराचसा वे

साधना ताई आणि 'समिधा'

Image
    साधारण 18 वर्षांपूर्वीची गोष्ट..माझे वय वर्ष 14..इयत्ता नव्वीत..त्या वेळी माझे बाबा नागपूर येथे नोकरी निमित्त कार्यरत होते..दिवाळीच्या सुट्टीत मी आणि आई नागपुर ला गेलो..ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांनी वरोरा येथे वसवलेल्या आनंदवन ला भेट द्यायची माझ्या बाबांना खूप इच्छा होती. थेट संबंध नसला तरी वाचनाच्या माध्यमातून आणि त्या आधीपासून गेली अनेक वर्ष माझे आजोबा, बाबा आनंदवन ला जमतील तशा फूल ना फुलाची पाकळी स्वरूप देणग्या नक्की पाठवत असत..आणि त्याचा अभिप्राय म्हणून डॉ.विकास आमटे यांच्या सुरेख हस्ताक्षरातले पत्र आजोबांना येत असे..आमच्याकडे सुद्धा अभिप्राय म्हणून आनंदवनातून तेथील रहिवासियांनी हाताने तयार केलेले भेट कार्ड येत असे..   अशा या सुंदरशा आनंदवन ला भेट देण्याचे आमचे नक्की ठरले..एका स्नेह्यांच्या ओळखीने वार्तालाप करून एक रात्र राहण्याची सोयही तिथेच  झाली..आई-बाबा आणि मी, बस ने आनंदवन ला पोहोचलो..राहण्याच्या ठिकाणी सामान ठेवल्यावर एका स्थानिकाने आनंदवन शी आमचा परिचय करून दिला..रुग्णालयं..वेगवेगळे प्रकल्प, शेती, टाकाऊतून टिकाऊ ते अगदी भूकंपापसून सुरक्षा म्हणून स्व