Posts

Showing posts from June, 2019

कृतज्ञता

Image
आमच्या घरासमोरंच बंगल्याचं बांधकाम सुरू आहे..येता जाता तर नजर पडतेच त्यावर रोज पण आज तिथे सकाळी लहानग्यांना खेळताना पाहून काही आठवणी जाग्या झाल्या.. हे माझ्या लहानपणच्या दिवसांचं..आम्ही,म्हणजे आई-बाबा आणि मी, नुकतेच बदलापूरला नवीन घरात रहायला गेलो होतो..मी असेन पहिली-दुसरीत..जे flats तयार होते त्याचं possession दिलं गेलेलं..आम्हीच सोसायटीत पहिले रहायला येणारे..बाकी घरं अजून पूर्ण व्हायची होती.. दिवस शाळेत आणि अभ्यासात निघून जायचा..प्रश्न उरायचा संध्याकाळचा..कुणासोबत खेळू..माझ्या वयाचं आजुबाजुलाही कुणी दिसेना.. कशी ते आता आठवत नाही, पण माझी ओळख लक्ष्मीशी झाली..इमारती चं बांधकाम करणार्या लोकांपैकी एका कुटुंबातील ही मुलगी..माझ्याहून थोडी मोठी असावी..ती आणि तिचा लहान भाऊ दोघे खेळताना दिसायचे..कशी कुणास ठाऊक, मी सुद्धा त्यांच्या सोबत खेळायला लागले..आई बाबांनीही कधी मला आडवलं नाही..लक्ष्मी कधी कधी भातुकली खेळायला घरी सुद्दा येत असे.. माझे काही फ्रॉक्स आईने तिला वापरायला म्हणू दिलेले..ते घालून तिला माझ्यासोबत खेळायला खूप मजा यायची.. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मी आजोळी गेले, परत

पाऊस...

Image
पाऊस...या एका शब्दामधे किती काही भरून राहिलंय...नवी उम्मेद, नवा उत्साह..नवतेचा संबंध पावसाशीच जुळलेला.. पावसाळा हा एकमेव असा ऋतू आहे ज्याची सर्वच जीव आतुरतेने वाट बघत असतात... कधी तो न सांगता एकदम surprise द्यायला येतो..तर कधी आत्तासारखं..केव्हा पडेल याची उत्सुकता ताणून धरतो..तो लांबवर दिसणारा काळा ढग..तिथूनच उत्सुकता ताणली जाते.. पावसाशी वेगवेगळ्या वयाचं वेगवेगळं नातं आहे.. लहानपणी तर खासंच.. शाळेत असताना तर पावसाळ्याच्या दिवसात, जून महिन्यात शाळा सुरू व्हायची..पाऊस पडल्यामुळे मातीचा सुवास जसा हवा हवा वाटतो तसंच नवीन पुस्तकांचा, वह्यांचाही वास हवा हवासा वाटायचा..नवीन वर्गात, नवीन इयत्तेत..मित्र मैत्रिणी मात्र तेच हवे असायचे, यातच नवीन मित्रांची सुद्धा भर पडायची.. रेनकोट घालून पावसात सायकल चालवत , चिखल उडवत, थोडं भिजून, थोडं कोरडं राहून शाळेत पोहोचायला किती मजा यायची..घरातून निघताना एकटं, वाटेत मित्र मैत्रिणींचा टोळका भेटायचा आणि त्याच उत्साहात कधी शाळेत पोहोचलो कळाचं सुद्धा नाही..चालत गेलो, तरीही मजा, हळूच एखाद्या डबक्यात सगळ्यांनी उडी मारायची..तेव्हा कुठे स्वच्छ पाणी आणि घाण पाणी

मोलाचा धडा

परवा जोशी काकू भेटल्या..तशी ही माझी आणि त्यांची पहिलीच भेट..आमच्या स्वयंपाकीण बाई जोशी काकूंकडे काम करतात त्यामुळे त्यांच्याविषयी ऐकून होते..वरवर ठणठणीत वाटणार्या काकू, अल्जायमर च्या रुग्ण आहेत..दररोज काही तास सोबत राहणं, स्वयंपाक आणि काकूंना बाहेर फिरायला घेऊन जाणं हे आमच्या स्वयंपाकीण बाई छाया ताईंचं काम..आणि हे सगळं त्या अगदी प्रेमाने करतात.. परवा बाहेर फिरायला पडल्या असताना आमची भेट झाली..आमच्या घरावरून जात असताना छाया ताईंनी आमची ओळख करून दिली.. अतिशय प्रसन्न चेहर्याने जोशी काकू म्हणतात, किती छान नाव आहे तुमच्या बंगल्याचं 'शैलचंद्र'.. आजारी असल्यामुळे काकू संदर्भ सोडून बोलत होत्या..पण मधेच त्या असं काही छान बोलू लागल्या की त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकावं लागलं.. त्या बोलत होत्या..'अगं, आपण की नाही लोकांना गृहित धरतो, सगळ्यांशी कसं प्रेमाने बोल्लं पाहिजे..तुम्ही बरे आहात ना..खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, पुन्हा नक्की या आमच्याकडे असं म्हटलं पाहिजे..आपली पहिली भेट आठवणीत राहिली पाहिजे समोरच्या व्यक्तीच्या..हल्ली की नाही कुणी कुणाशी प्रेमाने बोलत नाही..सतत राग राग करतात ल