मोलाचा धडा

परवा जोशी काकू भेटल्या..तशी ही माझी आणि त्यांची पहिलीच भेट..आमच्या स्वयंपाकीण बाई जोशी काकूंकडे काम करतात त्यामुळे त्यांच्याविषयी ऐकून होते..वरवर ठणठणीत वाटणार्या काकू, अल्जायमर च्या रुग्ण आहेत..दररोज काही तास सोबत राहणं, स्वयंपाक आणि काकूंना बाहेर फिरायला घेऊन जाणं हे आमच्या स्वयंपाकीण बाई छाया ताईंचं काम..आणि हे सगळं त्या अगदी प्रेमाने करतात.. परवा बाहेर फिरायला पडल्या असताना आमची भेट झाली..आमच्या घरावरून जात असताना छाया ताईंनी आमची ओळख करून दिली.. अतिशय प्रसन्न चेहर्याने जोशी काकू म्हणतात, किती छान नाव आहे तुमच्या बंगल्याचं 'शैलचंद्र'.. आजारी असल्यामुळे काकू संदर्भ सोडून बोलत होत्या..पण मधेच त्या असं काही छान बोलू लागल्या की त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकावं लागलं.. त्या बोलत होत्या..'अगं, आपण की नाही लोकांना गृहित धरतो, सगळ्यांशी कसं प्रेमाने बोल्लं पाहिजे..तुम्ही बरे आहात ना..खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, पुन्हा नक्की या आमच्याकडे असं म्हटलं पाहिजे..आपली पहिली भेट आठवणीत राहिली पाहिजे समोरच्या व्यक्तीच्या..हल्ली की नाही कुणी कुणाशी प्रेमाने बोलत नाही..सतत राग राग करतात लोकं..निरपेक्ष ओळख कुणीही कुणाशी करत नाही..' मला नंतर छाया ताईंकडून समजलं की काकू हेच सतत बोलत असतात..आणि मला आश्चर्य वाटलं.. एवढा मोलाचा धडा देणार्या, एकेकाळी नोकरी आणि घर सगळं उत्तम सांभाळणार्या काकूंना या आजाराला सामोरं जावं लागतंय.. त्या म्हणतात त्यात खरंच तथ्य नाही का?..आयुष्य तसं बेभरोशीच..काही क्षणात माणुस होत्याचा नव्हता होतो..आत्ता भेटलला माणुस पुन्हा दिसेल न दिसेल सांगता येत नाही..याची सतत जाणीव माणसाने ठेवण्याची गरज आहे..ही जर माझी आणि तुझी शेवटची भेट असेल आणि याची आपल्या दोघांनाही कल्पना असेल तर कसे वागू बोलू आपण एकमेकांशी? प्रत्यक्ष भेटीत तर हे पाळायलाच हवं पण chat या आधुनिक माध्य्मातून सुद्धा असाच संवाद ठेवता येऊ नाही का शकत.. करून बघुया..😊😊

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....