शोध

आज सकाळी पुन्हा जोशी काकू भेटल्या...मी आधी त्यांच्याबदद्ल लिहिलंय, काही वाचकांना माहिती असेल की काकूंना Alzimer आजार आहे..घरात मुलगा आणि काकूच असतात..त्यामुळे मुलाला काय ते त्या ओळखतात..मुलीला पूर्णपणे विसरल्या आहेत.. आज आर्थातच नव्याने माझी आणि त्यांची ओळख झाली..पण काकू मोठ्या आनंदाने माझ्याशी बोलल्या..कदाचित गप्पा मारणं त्यांना खूप आवडत असावं..एखाद्या लहान मुलाबदद्ल आपण म्हणतो , याला ओळख लागत नाही, तसं जोशी काकूंचं झालंय..कशा आहात काकू? हा एवढा साधा प्रश्न विचारला तरी काकू मोठ्या आनंदाने बोलतात.. "आपण भेटलो, खूप बरं वाटलं.." गेल्यावेळे प्रमाणे काकू बोलत होत्या..
    अशा दुर्धर आजाराला कुणालाही सामोरं जावं लागू नये. पण कल्पना करा, आपली सगळ्यांची 'वाईटाची' आठवण इथपतच असती तर..उदारणार्थ काल आपल्यात कडाक्याचं भांडण झालं , आपण ठरवलं, यापुढे एकमेकांच तोंड सुद्धा पहायचं नाही..आणि उद्या भेटलो तेव्हा यातलं काहीही आठवत नसेल आपल्याला..पुन्हा नव्याने संवाद सुरू...झालं गेलं सगळं काही आपण विसरून गेलोय..फक्त चांगल्या आठवणी ऊरल्या आपल्यापाशी..आणि पुन्हा जोमाने आपण एकत्र आलोय.. प्राणी-पक्षांसारखं 'त्या' क्षणापुरतं जगण्याचं वरदान देवाने आपल्याला दिलं असतं तर किती बरं झालं असतं नाही..हे असं वागायला आपल्याला एवढं कठीण जातं, तेच आपल्याकडून किती सहज घडून आलं असतं..प्राण्यांप्रमाणेच किती निरागस असतो आपण..कुठलेच पूर्वग्रह नाहीत, कुठलेच 'अहं' नाहीत..राग धरून ठेवायची सवय नाही, वाईट आठवणीच नाहीत की..अतीशय निरपेक्ष भावनेने प्रेम केलं असतं आपण एकमेकांवर..जसं जोशी काकू म्हणत असतात अगदी तसं..
  त्यांचं कौतुक का वाटतं माहित्ये? Alzimer सारखा आजार असूनही जेव्हा काकू लोकांशी बोलतात, भेटतात तेव्हा मनापासून भेटतात..चांगल्या गोष्टी बोलतात..आणि सर्वात महत्वाचं," निरोप घेताना, तुला भेटून मला खूप आनंद झाला, पुन्हा भेटायला नक्की आवडेल हे सांगायला विसरत नाहीत, त्या Alzimer च्या रुग्ण आहेत हे त्या 'विसरायला' लावतात.." माणसाने असं असावं नाही का? त्याचे vibes इतके positive असावे, त्याचं बोलणं इतकं गोड असावं की विसर पडावा त्याच्या इतर सगळ्याचा.. आपण स्वत: असे नाही हे माहिती असताना सुद्धा जेव्हा अशी एखादी व्यक्ती आपल्या भेटते ना, तेव्हा नकळत आपण स्वत: मधे हेच सगळे गूण शोधायला लागतो..त्यामुळेच म्हणतात "Stick to those people who pull the magic out of you, not the madness".. अशा लोकांचा शोध घेता घेता कदाचित आपल्यालाही शोधत कुणीतरी येईल, let's try to make a small difference in somebody's life.. 😊♥️ गौरी

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....