गुरूमंत्र

एक गमंतशीर पण काही शिकवून गेलेला किस्सा..शिवायला दिलेला ड्रेस मिळायचा म्हणून मी टेलर कडे गेले..ड्रेस तयार होतच होता म्हणून टेलर ने मला 5 मिं बसायला सांगितलं.. तिची 2 वर्षांची छोटी मुलगी तिथेच खेळत होती..मी तिच्याशी गप्पा मारत बसले..बोबडं बोलत पण मोठ्या उत्साहात ती मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होती आणि मलाही प्रश्न विचारत होती..थोड्यावेळाने 'आँख माले' (तिच्या बोबड्या भाषेत 🤣🤣) या अलिकडे गाजलेल्या bollywood गाण्यावर तिने dance पण करून दाखवला..(मी dance teacher आहे कळल्यावर आया उत्साहात आपल्या मुलांना bollywood dance करून दाखवायला सांगतात 🤪🤪 त्या मुलांचा उत्साह पाहून मला बघावाच लागतो) Dance झाल्यावरही आमच्या गप्पा सुरू होत्या..तिने आपणहून मला विचारलं, "मावशी, तुझ्याकडे cat आहे का? (2 अडीच वर्षांच्या मुलीने मला मावशी म्हणणं मी समजू शकते, आणि सहनही करू शकते🤠🤠🤠) मी म्हटलं," नाही गं, cat नाही माझ्याकडे, तुझ्याकडे cat आहे का?" तिने नकारार्थी मान हलवली..आणि म्हणाली, माझ्याकडे भुभु आहे.." आणि तिथेच बाहेर बसलेल्या एका भटक्या कुत्र्याकडे तिने बोट दाखवले..हा माझा भूभू आहे..ती आनंदाने सांगत होती... हा कुत्रा रोज इथे येऊन बसतो असं तिच्या आईने सांगितलं..त्यामुळे या चिमुर्डीला वाटतं तो आपलाच.. मी ड्रेस घेऊन बाहेर पडले तेव्हा ही छोटी, तिचं नाव तनिष्का आणि तिची एक मैत्रीण, तिच्याहून थोडी मोठी अशा दोघी, या कुत्र्याशी खेळत होत्या.. खरं तर one sided, या दोघी त्याला गोंजारत होत्या, त्याची शेपुट धरत होत्या, त्याला चापटी देत होत्या..कुत्रा आपला निवांत, पण तो त्यांना काहीसुद्धा करत नव्हता.. मी निघता निघता त्यांना विचारलं..काय गं? तुमच्या भुभु चं नाव काय? आणि त्यांनी उत्तर दिलं 'लाज'..माझी tube पेटायला काही सेकंद गेले, त्या म्हणत होत्या 'राज'..🤣🤣🤣🤣 कुत्र्याचं नाव 'राज'...popular हिंदी नावांपैकी एक.. मला म्हणतात कशा, तू पण 'लाज' ला हात लाव ना.. भटका कुत्रा असल्यामुळे मी जरा बिचकतच, या 'राज' ला त्याच्या नावाने 'राज...राज' अशी हाक मारत, हात लावला..त्याला आत्ताही ढिम्म काही फरक पडला नाही..🤣🤣🤣 मला कौतुक याचं वाटलं की एवढीशी मुलगी, 'हा भुभु माझा आहे' हे सांगते..तो भटका..किंवा तो खूप स्वच्छ नाही..! हे काही त्या निरागस बाळाच्या ध्यानी सुद्धा आलं नाही..अगदी पाळीव कुत्रा असल्याप्रमाणे ती त्याच्या जवळ जात होती..थोडक्यात, हा जीव माझ्या इथे येतो, मग तो माझा झाला..त्याच्यावर प्रेम करायला तिला मालकी हक्काची गरज वाटली नाही..आणि कदाचित याच निरागसतेमुळे त्या भटक्या कुत्र्यालाही तिथे बसणं safe वाटत असेल.. अलिकडे मुंबईत एक भटका कुत्रा पावसात आश्रय घ्यायला आला असता त्याला काठीने निर्दयीपणे मारण्यात आलं..एवढं की त्यामुळे त्याचा जीव गेला..यावर petitions..चर्चा, खूप काही घडलं.. भटक्या प्राण्यांपासून सावध राहणं बरोबर असलं तरी, माणुसकी सोडून वागणं हा गुन्हा आहे.. जिथे 2 वर्षांची कोवळी बाळं या सगळ्यापलिकडे जाऊन एका भटक्या कुत्र्याला आपलंसं करतात, आणि हा भुभु माझा आहे हे सुद्धा मोठ्या प्रेमाने सांगतात, तिथे मोठ्या माणसांचे हे असले अपराध केवळ अक्षम्यच.. लहानमुलं कायमंच आपल्याला कायम एखादा असा 'गुरूमंत्र' देत असतात..अर्थात आपण तो घेण्याकरता तयार असलं पाहिजे.. काहीही असो, आता 'राज' हे नाव ऐकल्यावर मला मात्र आता हसू येणारे एवढं नक्की🤣🤣🤣
Image courtesy : google

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....