Posts

Showing posts from February, 2020

रिक्त

Image
     या बद्दल लिहिण्यापूर्वी स्क्रीन कडे टक लावून खूप वेळ पाहत होते..अर्थातच विषयामुळे..      'रिक्त'..'रिकामं'..यावर शब्द मांडले गेले की हा कॅन्व्हास भरून जाणार. मग रिक्तपणाचं महत्व उरेल का? पण शांतपणे विचार केला की या रिक्तपणाची गरज जाणवेल..त्याचं वेगळं स्थान उमगेल..      एक कोरा कागद आपल्या समोर ठेवला आणि विचारलं की यावर तुम्हाला काय दिसतंय?..काय असेल आपलं स्वाभाविक उत्तर?..की यावर काहिही दिसत नाही..मात्र त्यावर एक लहानसा बिंदू जरी काढला की आपलं सगळं लक्ष त्या बिंदू कडे आकर्षित होतं..एवढं मोठं रिक्त पटल, त्याचं अप्रूप वाटत नाही..पण आपण हे विसरून जातो की तो कागद रिकामा,म्हणून तो त्या बिंदूला सामावून घेतोय..या साठी ते पटल, तो कॅनव्हास कोरा असायला नको का? पण उत्तर देताना मात्र त्या भल्या मोठ्या रिक्त जागेला आपण विषेश महत्व देत नाही.      शांतता सुद्धा अशीच..जिथे आधी शांततेचा रिक्तपणा, तिथेच आवाजाचे महत्व..जिथे आवाज आहे तिथेच आपण जाऊन अजून आवाज मिसळला तर गोंगाटच होणार..      अर्थात सगळीकडे रिक्तपणा असणं 'महागात' पडतं ..खिसे रिकामे झाले तर पंचाईत होते..पण हेच

राजे शिवछत्रपती यांस.....

Image
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसुनो: शिवस्यैषा मुद्राभद्राय राजते।। आदरणीय राजे शिवछत्रपती,                         साष्टांग दंडवत🙏...          राजे, आज आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आपणास हे पत्र लिहावेसे वाटले..आपण महाराष्ट्रात जन्म घेतलात हे आमचे केवढे मोठे भाग्य..आपल्या आदरणीय माता-पित्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न आपण साकार केलेत..महाराष्ट्राला मोकळा श्वास घ्यायला शिकवलात आपण..जे आपल्या हक्काचं त्यासाठी लढलंच पाहिजे पण अचूक योजना, नियोजन करून हा दंडक कित्येक वर्षांपूर्वी आपण घालून दिलात...गावोगावी जाऊन जनमानसात मिसळून आपण माणसांना स्वराज्यात जोडलेत..      जात, पात, धर्म, वर्ण याच्या पलिकडे जाऊन आपण 'माणूस' मोठा केलात..केवळ स्वराज्य स्थापन केले नाहीत तर ते फुलवले आणि कणखर बनवलेत..      आपण आणि आपल्या सर्व शूर सैनिकांनी रक्त सांडले म्हणून आज आम्ही हा आजचा महाराष्ट्र पाहू शकलो..      पाहू शकलो हे खरं..पण आपण रुजवलेली मूल्य टिकवू शकलो का? राजकारण करावं ते स्वराज्यासाठी, रयतेसाठी, स्वार्थासाठी कदापि नाही ही आपली मूल्य तर आम्ही विसरलोच पण सगळीकडे जा

'भाकरी

Image
    'भाकरी' म्हणताच डोळ्यांपुढे उभी राहते ती मोठ्या आकाराची, पापुद्रे सूटलेली गोलाकार वाफाळलेली भाकरी..     खरंतर 'भाकरी' या शब्दाशी अनेक पैलू निगडित आहेत..उदारणार्थ सौभाग्य, असा शब्द वाचला की त्याचे पैलू येतात...मंगळसुत्र, लाल कुंकू, हिरवा चुडा, जोडवी ई. अगदी तसंच भाकरी म्हटलं की डोळ्यापुढे येते ती चूल, तवा , ठेचा, लोणी, झुणका, पालेभाजी..ई...ज्या प्रमाणे एखाद्या सौभाग्यवतीला पाहिल्यावर तिची दृष्ट काढावीशी वाटेल, त्या प्रमाणेच असा सुंदर थाट असतो भाकरीचा की ती खायची इच्छा पूर्ण करण्यापूर्वी आदराने आधी आपोपाप त्यासमोर नतमस्तक होवू...     आता पूर्वीसारख्या चुली राहिल्या नाहीत आपल्याकडे, तसंच स्वत: शेतात राबून ज्वारी बाजरी पिकवणं किंवा जात्यावर दळणं हे सुद्धा आता नाही.. पण भाकरी करायची पद्धत मात्र वर्षानुवर्ष अबाधित आहे..     या प्रक्रियेतील कलात्मकता मला कायम आकर्षून घेते..पीठ मळणं, खरंतर हाताच्या तळव्याचा वापर करून घोटून घेणं..त्यामुळे शरीरातील उर्जा पीठ शोषून घेतं..आपल्यातलं 'असणं' हेच जणू त्या भाकरीत ओढलं जातं..भाकरी थापणं म्हणजे आईने बाळाला जणू थोपटावं..इथे

विसावा

Image
अलिकडेच हे सुंदर छायाचित्र पाहिलं..छायाचित्रकार धृतिमान मुखर्जी यांनी टिपलेला सुरेख क्षण.. विसाव्याचा...समुद्रात बगळ्यासारखा दिसणारा एक पक्षी (Naazca Booby) एका कासवावर विसावलाय आणि त्या कासवाच्या खाली लहानगे मासे छताखाली थांबल्याप्रमाणे विसावलेत..कदाचित त्या बगळ्यापासून संरक्षण व्हावं म्हणून लपलेत..   कलाकार म्हणून श्री.मुखर्जी यांची कमालंच केली आहे..त्यांनाही असा क्षण समुद्रात पहिल्यांदाच पहायला मिळाला असं ते लिहितात..    त्या कासवाला कल्पनाही नाही की आपल्या नकळत आपण कुणाला तरी आसरा दिला..कुणाचा तरी विसावा बनलो.. 'विसावा'..शब्दातच किती शांतता आहे..एखाद्यावर विसावणं..एखाद्यावर हवाला असणं..निश्चिंत असणं की ती व्यक्ती आहे आपल्यापाशी..विश्वास असणं त्यावर पूर्ण..मी आश्रय मागितला तरी ही व्यक्ती नाकारणार नाही..आपल्याला यापासून काहिही धोका नाही..     आता हे कासवंच बघा..त्यावर बसलेला पक्षी आणि त्याखाली थांबलेले मासे दोघांच्या मनात याच भावना आहेत की याच्या सोबत आपण सुरक्षित आहोत..     सगळ्यांनी आठवून पहा..अशी एक तरी व्यक्ती असेलच आपल्या आयुष्यात..अशा लोकांच्या vibes इतक्या सकारात