अनुबंध...

    मला लहानपणी कुत्र्यांची खूप भीती वाटायची...गल्लीच्या त्या टोकाशी कुत्रा दिसला कि मी या टोकावरून मागे फिरायचे. आमच्या घराच्या अगदी जवळ एक खाद्यपदार्थांचं दुकान होतं . दूध, ब्रेड, अंडी इ काही आणायचं असेल की तिथून आणता यायचं. त्या मालकाकडे एक पाळीव कुत्रा होता . छान उंचा पुरा,...अत्यंत बोलके डोळे होते त्याचे. गंमत अशी व्हायची की दुकानात मी काही आणायला गेले आणि हा तिथे असला की माझी तंतरलेली असायची. तो तसा शांत कुत्रा होता,  ना कधी तो माझ्यावर भुंकला ना गुरगुरला . पण त्याला का मी आवडायचे त्यालाच ठाऊक. मी दिसले कि तो माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायचा. दुकान मालकाचं नाव जोसेफ. आम्ही त्याला जो काका म्हणायचो . मी कुत्र्याला घाबरते हे जो काकाला माहिती होतं म्हणून तो लक्ष ठेवून असायचा. मात्र मी दुकानातून निघाले की हा कुत्रा माझ्या मागे मागे घराच्या गेट पर्यंत यायचा. आणि इतका गपचूप यायचा कि मला कळायचं सुद्धा नाही . चालता चालता नजर मागे गेलीच तर लक्षात यायचं कि हे महाशय येतायत. 
    याचा अर्थ तेव्हा कळत नव्हता . वाटायचं हा मला का त्रास देतोय. का येतो माझ्या मागे मागे ? 
  आज एवढ्या वर्षांनी हे सगळं आठवलं कि गम्मत वाटते. प्राणी प्रचंड निरागस असतात . ज्याच्याशी त्यांना 'अनुबंध' जोडायचे असतात म्हणजेच connect व्हायचं असतं त्यांच्याकडे ते ओढले आपोआप जातात. They can understand vibes like nobody else can..
  आता मात्र माझी प्राण्यांशी, विशेषतः कुत्र्यांशी गट्टी जमलिये आणि पूर्वी जितकी मी त्यांच्यापासून लांब पळायचे तितकीच त्यांच्या जवळ जाऊ लागले आहे.
  एकदा अशीच पायी फिरून झाल्यावर कट्टयावर बसले होते आणि एक golden retriever पळत पळत माझ्याजवळ आला. त्याची घरी जायची वेळ होती बहुतेक पण त्याला जायचं नसावं. म्हणून तो न ऐकता पळायला लागला आणि माझ्या जवळ येऊन बसला. मी ५ मिं त्याला कुरवाळून झाल्यावर तो आपणहून निघाला. ती ५ मिनिटे त्याने माझ्याजवळ असणं हे मला निखळ आनंद देऊन गेलं . It was more than a therapy for me.
  माझी कुत्र्यांविषयीची भीती कायमची गेली ती आमच्या बूझो मुळे .आधी बुझो असताना गेट उघडून आतही न शिरणारी मी, ते नंतर बुझो ला एकटीने अंघोळ घालणारी मी ,असा आमूलाग्र बदल माझ्यात घडून आला . याचं सगळं श्रेय अर्थात बूझोलाच. 
  बूझोला जाऊन ६ वर्ष झाली पण तो माझा गुरु होऊन गेला . समोरच्याला आपलंस करून घ्यायला आधी आपली इच्छा लागते हा मोठा धडा तो देऊन गेला  . आधी मी गेटपाशी दिसले, की त्याची साताजन्माची शत्रू असल्यासारखा तो माझ्यावर भुंकायचा, तो त्याचा धर्म म्हणून . मात्र त्याच्या सहवासात आल्यानंतर त्याने मला आश्वस्त केलं की मला तुझ्याशी मैत्री करायची आहे.
  किती मोठी गोष्ट !! 
एखाद्याला सहज आश्वस्त करणं ..कसलीही अपेक्षा न ठेवता कि हो मला तुझ्याशी मैत्री करायची आहे आणि ती टिकवायची आहे. सगळेच प्राण्यांशी  connect होतात असं नाही . मात्र माणसांनाही माणसांशी connect का होता येऊ नये !! मग ती व्यक्ती स्त्री असो, पुरुष असो , वयाने आपल्यापेक्षा  मोठी असो लहान असो...
  या बाबतीत लहान मुलंही अगदी मोकळी असतात बरं का! त्यांना काही आणि कसले inhibitions नसतात. ज्याच्याशी बोलावंसं वाटलं , share  व्हावंसं वाटलं त्यांच्याशी बिनधास्त बोलतात. त्यांना ओळख पाळख सुद्धा लागत नाही. एकदा डॉक्टरांकडे गेले असता बाहेर वेटिंग रूम मधे माझ्यासमोर २ वर्षांची नुकती बोलायला लागलेली चिमुरडी बसली होती. बराच वेळ तिचं  निरीक्षण चाललेलं . आपल्या आजूबाजूला कोण कोण बसलंय ,काय करतंय , सगळं टक लावून बघत होती. माझ्याकडे जरा जास्त वेळ बघत होती. मी सुद्धा तिला hi  केलं आणि ती एकदम बोलायलाच लागली. 'हि माधी आई ए ' 'ही माधी आदी ए '  मला गंमत वाटली. मी म्हटलं 'वा , किती छान ए गं तुझी आई आणि आजी, मी घेऊन जाऊ का घरी?".. तशी ती गोड हसली. त्यांचा नंबर आला आणि ती मला अच्छा करून निघून गेली.
    त्या वेळी माझ्याकडून कदाचित तिला आलेले vibes तिला भावले असतील, मी तिचे vibes receive केले , आमच्यात छोटासा संवाद घडला ,आम्ही दोघी खुश झालो. किती सहज साधं सोपं . आपणच गुंता वाढवत बसतो नाही का?
    या बद्दल लिहायला घेतलं आणि 'आनंद' सिनेमा आणि त्यानी जोडलेले मुरारीलालही आठवले..दर दुसऱ्या माणसाला टपली मारून 'कुतुबमिनार पर बियर पिलाकर आउट कर दिया था' म्हणत अखेर एक ईसाभाई त्याला भेटतात. काही वेळातच त्यांचे अनुबंध जुळतात .एवढंच नव्हे तर आनंद च्या अखेरच्या दिवसांत त्याच्या आजाराबद्दल कळल्यावर ईसाभाईंना दुःख अनावर होतं .
    आपलं शरीर हे एक transmitter आहे आणि एक receiver सुद्धा. ज्याच्याशी अनुबंध जुळायचे असतात म्हणजे connect  व्हायचं असतं त्याच्याकडून आपल्याला vibes येत असतात .  आता हे आपल्यावर अवलंबून की आपल्याला ते receive करता येतं का नाही.
     कुणाशी मैत्री कराविशी वाटली, त्या व्यक्तीशी बोलावंसं वाटलं, हात हातात घ्यावासा वाटलं, मिठी मारावीशी वाटली, काही वेळ त्याच्यासोबत घालवून मनमोकळ्या गप्पा माराव्याशा वाटल्या... किती पटकन कुणाला तरी आपलंसं करता येतं. यातूनच कधी घट्ट मैत्रीची बीजं पेरली जातील सांगता येत नाही. पण आपलं वय वाढून आपल्याला शिंग फुटत जातात, आपल्याला वाटतं  जगातली सर्वात भारी व्यक्ती म्हणजे मीच. याच्याशी कुठे बोलायचं , तिच्यापाशी कुथे व्यक्त व्हायचं ? मुलगा असेल तर वाटतं मी मुलीशी कशी मैत्री करू, मुलीला वाटतं मी एखाद्या मुलाशी कशी बोलू. हे असेच प्रतिबंध (inhibitions) बाळगत आपण जगू लागतो..
    आणि एखादा होऊ घातलेला मित्र किंवा होऊ घातलेली मैत्रीण आपल्याकडून निसटून जाते. मग उरते एक न भरून येणारी पोकळी. 
    आयुष्यात येणाऱ्या इतर नात्यांइतकंच ते एक हळुवार नातं आपलं जगणं समृद्ध करत असतं .भरभरून व्यक्त होताना जिथे कधी इतर नाती जपण्याचा ताण आपल्यावर असतो तिथेच हे खास नातं आपल्याला हलकं होण्याकरता मदत करतं . अशा नात्याबद्दल विचार करताना 'श्रीकृष्ण द्रौपदी ' चं नातं डोळ्यापुढे येतं ..त्या दोघांमधली भावनिक ओढीचा दर्जा तो काय वर्णावा..आपल्या पतींवर द्रौपदी चं प्रेम होतं ..त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता तिला .पण तिलाही भावनिक आधार द्यायला श्रीकृष्णासारखा सखा भेटला आणि तिच्या जगण्याचा दर्जा उंचावून गेला. 
अमेरिकन लेखक Robert .M. Drake यांचा एक quote वाचनात आला व तो संयुक्तिक वाटला . तो जशाचा तास इथे लिहिते 
He says, " no one knows, when or how,  or even why..but the right people always find you when you need them most..and they always appear when you least expect them..understand..love is love..no matter where it comes from, keep your heart open, the right person will find you and at the right moment..I promise.."..
अनुबंध जुळू द्यायला आपल्या हृदयाची कवाडं उघडी करायला आधी शिकूया..हो..आपल्याला शिकायला लागणार..प्राणी, पक्षी आणि लहान मुलं यांच्यासारखं व्हायचं असेल तर शिकावंच लागणार हे...
मग..आहे तयारी?

Image courtesy : google

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....