आनंदाचे डोही आनंद तरंग


काल देवळात गेले असता घडलेली ही गंमत.. 1 वर्षाचं बाळ आणि त्याची आई ,रोज देवळात येतात..नुकतीच चालायला लागलेली ही छोटीशी मुलगी, हिचं नाव जिजा, देऊळभर मोठ्या आनंदाने फिरत असते..सगळ्यांकडे पाहून गोड हसते.. माझ्याजवळ असलेली गाडीची किल्ली मी तिला देऊ केली..मोठ्या आनंदात ती दुडुदुडु धावत आली आणि किल्ली हातात घेऊन खेळू लागली.. त्यांची निघायची वेळ झाली तशी तिची आई तिला म्हणाली," जिजा, चला घरी आता..त्या 'ताई' ला दे बरं परत किल्ली.." तिने मला 'ताई' शब्दाने संबोधल्याची मला मोठी गंमत वाटली, 🤣🤣🤣🤣 पूर्वी hair dye ची एक जाहिरात लागायची, ज्यात त्या बाईला त्यांच्या ओळखीचा मुलगा तिचे पिकलेले केस पाहून aunty अशी हाक मारतो..आणि तो शब्द aunty aunty aunty असा तिच्या डोक्यात घुमत राहतो..🤣तो hair dye लावल्यानंतर मात्र तो मुलगा तिला hello didi असं म्हणतो.. लहानपणी 'ताई' , 'दीदी' हा शब्द इतक्यांदा ऐकलेला असतो आपण..पण काळाच्या ओघात, वय मोठं होत जातं तसं आणि नवीन नाती आयुष्यात येत जातात तसं आपण या 'ताई' शब्दापासून लांब जातो.. पूर्वी ताई म्हणणारी लहान मुलं, आता 'काकू', 'मावशी', मामी, 'आत्या' तर इतर काही लोकं madam म्हणून संबोधत असतात..अनोळखी असलेली लहान मुलं काकू किंवा मावशी म्हणतात तेव्हा कितिंदा मी त्यांना रागावले आहे..😃😃 हो आता माझ्याकडे शिकणार्या सगळ्या विद्यार्थिनी मला 'ताई' च म्हणतात..पण ती पद्धतच आहे म्हणून..पण कधितरी चुकून त्यांच्याही तोंडी 'काकू' oh,sorry, 'ताई' ऐकून मलाही गंमत वाटते..आहे तर आपल्या काकूच्या वयाची पण औपचारिकता म्हणून म्हणा ताई, असं त्यांना वाटत असावं हा विचार करून हसू येतं..😃😃😃 आता आपण मोठे झालो, आता आपल्याला सगळे काकू, मावशी, मामी, madam च म्हणणार, याची सवय होत असताना पुन्हा इतक्या वर्षांनंतर कुणी लहानांनी 'ताई' म्हणून संबोधलं की कसं 'भारी' वाटतं.. तरूण झाल्यासारखं वाटलं, अगदी त्या hair dye लावलेल्या बाईला पुन्हा दीदी अशी हाक ऐकून सुद्धा जेवढा आनंद झाला नसेल तितका मला काल झाला..या आनंदात माझी उरलेली संध्याकाळ मस्तं गेली..😂😂😂😂 
Image courtesy : google 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....