संवाद

काल, एका restaurant मधे गेले असता एक विलक्षण गोष्ट पहायला मिळाली..आम्ही आमच्या टेबलवर बसलेलो असताना, एक मोठा ग्रूप बाहेर थांबलेला..येणारे सगळे जमण्याची वाट पाहत होता..आम्ही किती जणं , कुठे बसायचं हे सगळं त्यांनी तिथल्या captain ला सांगितलं..हे सगळं ते करत असताना अगदी सहज त्यांच्यापैकी एकाकडे माझं लक्ष गेलं.. त्याने कानाला यंत्र लावलं होतं.. त्या गोष्टीचं अर्थातच मला काही विषेश वाटलं नाही कारण कुठल्याही वयाची लोकं कानात दोष असेल तर यंत्र वापरू शकतात. त्यांच्यापैकी सगळी मंडळी जमल्यावर ते आत येऊन बसले..8 जणांचा ग्रूप होता..ते अगदी माझ्या समोरच्याच टेबलवर असल्यामुळे माझं त्यांच्याकडे पुन्हा लक्ष गेलं..अजून एकीने सुद्धा तसंच, कानाला यंत्र लावलेलं..मग मात्र माझी उत्सुक्ता ताणली गेली.. मी एक एक करत सगळ्यांकडे बघू लागले..अर्थातच त्यांचं लक्ष नव्हतं.. ते सगळे वेगवेगळे हातवारे आणि ओठांच्या हालचाली करून एकमेकांशी संवाद साधत होते.. एवढ्या वेळाने लक्षात आलं की ते सगळे मुक-बधीर होते..मी थक्क होऊन त्यांच्याकडे बघत बसले..आपल्यालाही लाजवतील इतक्या उत्कृष्ट पद्धतीने ते एकमेकांशी बोलत होते..हो...बोलत होते.. मला आधी वाटलं त्यांच्यापैकी कुणी एक ऐकू-बोलू शकणारं असेल आणि ते या सगळ्यांना एकत्र घेऊन आले असतील..पण तसं नव्हतं..आणि तसं असण्याची काही एक गरज नव्हती.. इतक्या आत्मविश्वासाने ते सगळे बसलेले तिथे आणि किती सहज बोलत होते एकमेकांशी.. तेवढ्यात त्यांच्यातील एकीशी माझी नजरानजर झाली..मला त्या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतंय हे तिला समजलं..ती सुद्धा माझ्याकडे बघून गोड हसली.. खरंच, कुणाशी बोलण्यासाठी आपल्याला काय लागतं? तर संवाद साधण्याची इच्छा..आजकाल आपण ऐकतो की कुटुंबातला संवाद हरवलाय..लोकं एकत्र राहूनही लांब गेलीत एकमेकांपासून...खरंच संवाद हरवलाय का? नाही..संवाद साधण्याची, मोकळं बोलण्याची इच्छा हरवत चालली आहे.. या ग्रूप बदद्ल सर्वात छान गोष्ट काय होती सांगू? त्यांचा एकमेकांशी असलेला eye contact..पहिला संवाद घडत होता तो डोळ्यांमधून..त्यामुळे ते एकमेकांशी बोलण्यात इतके रंगून गेले होते की कुणाला लक्षातही येणार नाही हे मूकबधीर आहेत.. Gadgets मुळे संवाद कमी झालाय, अजून कशामुळे कमी झालाय, असं आपण आपलं खापर सहज इतर गोष्टींवर फोडत असतो..तसं तर या ग्रूप कडे पण gadgets होते की..ते सुद्धा सेल्फी काढत होते, video call करत होते, फोटो एकमेकांना दाखवत होते..Gadgets हा आता आपल्या आयुष्याचा एक भाग आहे हे आपण स्वीकारायला हवंच पण त्याचबरोबर आपलं माणूसपण विसरता कामा नये..gadgets सारखं यांत्रिक वागलो तर आपल्यात आणि त्यात फरक काय? म्हणजे माणसाने gadgets तयार केली आणि आता gadgets स्वत: सारखी यांत्रिक माणसं तयार करू पाहताहेत..पूर्वी tv समोर बसल्यामुळे संवाद हरवायचा..आता मोबाईल मुळे तो हरवू पाहतोय.. म्हणजे माणूस चुकत नाहिये, gadgets चुकतायत? असं कसं? माणसं जीवंत असतात, gadgets नाहीत याची जाणीव जेव्हा माणसाला होईल तेव्हा हा हरवलेला संवाद परत येईल.. हरवली नाही पाहिजे ती संवाद साधण्याची इच्छा..एकमेकांपाशी व्यक्त होण्याची इच्छा..कारण सांगू?....इच्छा डोळ्यातून जाणवते..ती दिसली की आपोआप संवादाला वाट मोकळी होते..त्यासाठी शब्दांची गरज नाही हे या ग्रूपनी दाखवून दिलं.. त्या काही मिंटात त्या सर्वांकडून खूप काही शिकता आलं..मी मनोमन त्यांचे आभार मानले.. 😊😊😊♥️♥️♥️ -गौरी
Photo credits: Google

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....