पर्रीकर सर...

स्वर्गीय मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर..
फार कमी लोकांच्या बाबतीत 'बस नाम ही काफी है' असे उद्गार निघतात. पर्रीकर सर हयात असतानाही 'नाम हि काफी था', आणि आज ते आपल्यात नाहीत तरीही 'नाम हि काफी है'...
मनोहर पर्रीकर म्हणजे देश भक्ती  , मनोहर पर्रीकर म्हणजे तत्वनिष्ठा ,मनोहर पर्रीकर म्हणजे ध्यास , मनोहर पर्रीकर म्हणजे कार्यमग्नता, मनोहर पर्रीकर म्हणजे अखंड सावधानता, मनोहर पर्रीकर म्हणजे साक्षात हिंदुत्व ...
आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजताना सुद्धा ज्यांचा देशाप्रतीचा समर्पणभाव अखंड राहिला असं अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे पर्रीकर सर. 
त्यांच्या या समर्पण भावनेची सुद्धा खिल्ली उडवणारे अनेक होते पण त्या सगळ्याला न जुमानता , नाकातोंडात नळ्या असताना , मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा ते अविरतपणे कार्य करत राहिले.
..राष्ट्रभक्ती हि केवळ १५ आगस्ट व २६ जानेवारीला गाणी गाण्यापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक दिवशी देशाचा विचार करून कार्यरत राहण्यात आहे, हे ज्यांनी दाखवून दिलं ते म्हणजे श्री.मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर..
आज तिसऱ्या स्मृतिदिवशी सुद्धा पर्रीकर सर आपल्यात त्यांच्या या राष्ट्रप्रेमाच्या रूपाने आहेतच ..आणि इथूनपुढेही राहतील..

कार्यमग्नता जीवन व्हावे , मृत्यू ही विश्रांती...
पर्रीकर सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....