शिवथर घळ

गडांचा राजा 'रायगड' पाहून दुस-या दिवशी खाली आलो..येताना ropeway चा वापर केला..तेवढाच हाही अनुभव मिळावा..अवघ्या 4 मिंटात खाली..विज्ञानाची खरंच कमाल आहे..अर्थात गड चढून जाण्याप्रमाणे उतरून येण्याची मजा वेगळीच..पण पुढलं destination लौकर गाठता यावं यासाठी वेळ वाचावा हा प्रयत्न..
  अलिकडे श्री सद्गुरू यांचा एक छान विचार वाचला..त्यांच्याच श्ब्दात इथे लिहिते..'Do not go in search of a Guru...when the pain of ignorance within you becomes a scream,  a Guru will come in search of you'...
   थोडक्यात गुरू भेट घडते ती योग्यवेळ आल्यावर..अशाच योग्य समयी महाराजांना भेटले ,ते त्यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी..
1653 च्या सुमारास वरंधा घाटातील शिवथर येथील एका काळोख्या गुहेत कुबडीवर रेलून..दीपप्रकाशात एक अत्यंत तेजस्वी सत्पुरूष कर्मयोगाचे तत्वज्ञान ओवीबद्ध करण्यात मग्न झाले होते...समर्थ रामदास स्वामी!! त्यांच्या कठोर साधनेतून 'दासबोध' याच शिवथरघळीत उदयास आले..
     'शिवथरघळ' हेच ठिकाण समर्थांनी का निवडले असा एक संदर्भ काही दिवसांपूर्वी वाचण्यात आला..तो असा की ही जगातली अशी frequency less जागा आहे जी कोणताच उपग्रह locate करू शकणार नाही..त्या घळी भोवती असे क्षेत्र आहे जे कोणत्याच उपग्रहाला तिथे पोहोचू देऊ शकत नाही..थोडक्यात असे की विश्रांती..निर्विचार अवस्था..शांतता..ज्यात भेसळ होणार नाही..जिथे फक्त आपल्याच मनातले विचार आणि आपण एवढेच..काय किमया असावी? मगाशीच ropeway विज्ञानाचं कौतुक सांगणारं एक वाक्य लिहिलं आहे मी..आणि आता थेट हे..400 वर्षांपूर्वी  केवळ साधनेमुळे..जाणीवेमुळे गुरूमाऊली समर्थ रामदास यांना ही शिवथरघळ गवसली..
     त्यांच्या साधनेचे पावित्र्य या स्थळी अनुभवता येते..अतिशय शांत..गुहेत आता समर्थ व त्यांचे शिष्य कल्याण स्वामी आणि राम लक्ष्मण सीता..अशा मूर्ती आहेत..गुहेत प्रवेश करताच या अद्वितीय शांततेत आपण खेचले जातो..गुहेत कितीही वेळ बसलं तरी समाधान होणार नाही..
     या शांततेच्या शोधात आपण सगळेच आहोत..राहणार आहोत नव्हे रहायलाच पाहिजे..आपल्या मनातही गोंगाट बाहेरही गोंगाट..एवढा की आपल्याला शांततेचीच आता भिती वाटते..गोंगाटाटच बरं वाटतं..मात्र  शांतता आहे..आपल्या आतच आहे..तिचा शोध घेत रहावं..मात्र त्याची जाणीव व्हायला हवी असेल तर शिवथरघळीला नककी गेलं पाहिजे..डोळे मिटून शांत काही क्षण जरी बसता आलं तरी ही आपली हरवलेली शांतता परत मिळवण्याची संधी आपल्याकडे आहे याची जाणीव होते..

Comments

Popular posts from this blog

एका अंघोळीची गोष्ट

कल्हई

श्री स्वामी समर्थ..