एकांत

 प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा... 'एकांत'...आपल्याला कितीही मित्र असले तरी या मित्रा सारखा कुणी नाही..सततच्या गलक्यात..गर्दीतून मग ती विचारांची असो किंवा माणसांची..त्यापासून लांब जाऊन या मित्राला कधी भेटता येतंय याची आपण आतुरटेने वाट पाहत असतो..
 एकटेपणा आणि एकांत यात खूप फरक आहे बरं का..एकटेपणा कंटाळवाणा असतो तर एकांताची आपल्याला गरज असते..एकांतात माणुस आत्मपरीक्षण करू शकतो..आपली कृती..आपले विचार पारखून बघू शकतो..म्हणूनच हा एकांत नावाचा मित्र भेटला की त्याच्याशी आपण मोकळा संवाद साधू शकतो..
  हा आपल्याला माहिती असलेला अर्थ..तोही तितकाच महत्वाचा..आज या शब्दाचा खरा अर्थ वाचला..'एक' म्हणजे आपण..'मी'...या 'मी' ची आपल्याला जाणीवही नसते जेव्हा आपण जन्म घेतो..नंतर आपल्याला एक नाव दिले जाते..आपल्यावर संस्कार घडतात..आणि आपण जे काही करतो त्याला आपण म्हणतो हे 'मी' केले..आणि याचे रूपांतर अहंपणात होते..आपण हे विसरून जातो की इथे या निर्गुण निराकारची सत्ता..त्याच्या समोर आपण फक्त एक घटक..
  हा अहंभाव असलेला 'मी' 'एक'...त्याचा अंत होणे म्हणजेच देहबुद्धीचा विसर पडून पलिकडे जाणे..या एकाचा अंत होणे हा झाला 'एकांत'...
 किती खोल शब्द आहे..जसं गुंगीचं औषध म्हणजे anasthesia डॉक्टरने दिला की त्याचा परिणाम झालाय का हे तपासण्यासाठी आकडे मोजायला सांगतात..तेव्हा एका क्षणी आपण अशा स्थितीला येतो जेव्हा मीपणा उरत नाही..आपण डॉक्टर ला स्वाधीन होतो..हीच स्थिती जागेपणी अनुभवणं म्हणजे एकांत..
    या स्थितीला जाणं ही अर्थातच सोपी गोष्ट नाही..पण हा खोल अर्थ काही काळ बाजुला ठेवून विचार करुया..आपल्याला एकांत का हवा? आपल्या साठी..तेव्हा विचारही आपण करत असतो..ऐकतही आपण असतो..एकांतात नसताना आपण जे वागतो..जे बोलते..ते दरवेळी अविचारी असेल असं नाही..पण तटस्थपणे त्याकडे पाहून केलं गेलंच असेल असं नाही..इथे सुद्धा पुन्हा anasthesia चं उदाहरण बघुया..काही शस्त्रक्रीयांच्या वेळी partial anasthesia दिला जातो..आणि समोर स्क्रीन वर रुग्ण आपली स्वत:चीच चाललेली शस्त्रक्रीया पाहू शकतो..त्याला कल्पना असते आपण काय पाहतोय पण 'जाणीव' बधीर असते..तसंच या 'एकांतात' आपण स्वत:कडे तटस्थपणे पाहत असतो पण इकडे 'जाणीव' एरवीपेक्षा अधिक खोल असते...त्यामुळे आपण असलो तरी अहंभाव गळूण पडतो..
    असा 'एकांत' शोधायचा प्रयत्न व्हायला हवा..तिथून परत येताना सुद्धा आपली प्रगतीच झाली पाहिजे..एकटेपणातून एकांताकडे जाणं हा प्रवास आहे..आणि तो मात्र 'एकट्याने' च करायचा आहे..(फोटो सौजन्य: गूगल)

Comments

Popular posts from this blog

एका अंघोळीची गोष्ट

कल्हई

श्री स्वामी समर्थ..