वाढदिवस


किती गमतिशीर शब्द आहे हा..'वाढदिवस'..वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण एकमेकांना..
खरं तर हा आपला जन्म दिन म्हणून त्याची आठवण काढून आपण एक दिवस स्वत:ला साजरं करतो..तसं बघायला गेलं तर  वाढदिवस म्हणजे आयुष्यातून एक दिवस वजा..मग का बरं साजरा करायचा हा दिवस?
वाढदिवस असा शब्द का बरं? काय वाढतं? फक्त वय? ते तर नैसर्गिक झालं..देवाच्या कृपेने आपण त्या दिवशी जीवंत असतो म्हणून आपण म्हणू शकतो की वय एका वर्षाने वाढलं..
मग विचार याचा करायला हवा की वाढायला काय हवं..?
  वाढायला हवी ती प्रगल्भता..सकारात्मक विचार करायची..विचार मंथन करायची..आत्मपरीक्षण करायची..थोडक्यात स्वत:चं audit करायची..मानसिक, शारीरिक आणि आर्थिकही..
  आणि हे सगळं केलं तरंच पुढला वाढदिवस..पुढली वाढ..पुढली प्रगल्भता साधता येणार..
  एक एक वर्षाचं contract च केलं तर स्वत:शी? म्हणजे बघा हां..आपण सगळ्या पातळ्यांवर खरे उतरतोय का असा report तयार करायचा..कुठे कमी पडलो त्याची वेगळी यादी करायची आणि या वर्षात त्यावर काम करू असं आश्वस्त करायचं स्वत:ला..किती मजा येईल बघा..
  कशाला कुणाशी स्पर्धा करा..आपली प्रगती दरवर्षी तपासून पाहिली की कशाला स्पर्धेत अडकायला लागतंय..जे साधायचंय ते आपोआप साधेलंच की..नाही का?
   हे असं कल्यानेच 'वाढदिवस' या शब्दातील 'वाढी'चं महत्व समजेल..आणि मग सगळे जेव्हा या वाढीच्या शुभेच्छा देतील तेव्हा आपला जन्मदिवस नं राहता ख-या अर्थाने वाढदिवस होईल..आणि तो निश्चित साजरा करता येईल..
   काय वचने द्यावी स्वत:ला? अशी एक यादी प्रत्येकाने येणा-या वाढदिवसासाठी करावी..त्यादिवशी उठून आरशासमोर उभं रहावं..स्वत:लाच म्हणावं..काय गं? कशी आहेस? वर्ष झालं भेटून..असं करता करता आपल्याला लक्षात येईल आपण गेल्यावर्षी कुठे होतो..आणि आज कुठे आहोत..एक दिवस स्वत: स्वत:शी गप्पा मारायला काय मजा येईल.. स्वत:लाच एखाद्या मित्र मैत्रिणीसारखं भेटायचं..मग आपणच आपलयाला म्हणू , छान वाटलं तुला भेटून...आणि पुढल्या वर्षी स्वत:ला भेटण्याच्या ओढीने आपण नक्कीच स्वत:ची योग्य काळजी घेऊ..स्वत: स्वत:ला आवडायला लागू..सगळ्या पातळ्यांवर..मै अपनी/अपना favourite हूँ ..असं म्हणू..
   काय मग? बघायचं का करून..स्वत: स्वत: ला भेटुया..हा झाला खरा
'वाढदिवस'
ता.क: जे कोण हे करून पाहतील त्यांनी अनुभव नक्की सांगावे..🙏

Comments

Popular posts from this blog

एका अंघोळीची गोष्ट

कल्हई

श्री स्वामी समर्थ..