चांदनी...

 
चंद्रला जितकं महत्व, तो जितका हवा हवासा तितकीच चांदणी..चंद्राकडे लक्ष गेलं आणि चांदणी कडे नाही असं होणार नाही. या चांदणी चं सुद्धा असंच होतं 
   चार वर्षांपूर्वी अचानक सकाळी बातमी येऊन धडकलेली, श्रीदेवी गेली ..आणि ती सुद्धा अशी विचित्रपणे..आणि इतक्या लौकर..वेळ आली की हे लौकर उशिरा म्हणण्याला काही अर्थ उरत नाही खरा, तरी श्रीदेवी गेली हे पचनीच पडेना तेव्हा. 
तिची एक मुलाखत ऐकल्याचं आठवतंय. एकूण बालपण, शिक्षण ,अभिनयात पदार्पण असे नेहमीचे प्रश्न विचारले जात होते तिला. एक वाक्य ऐकून मात्र मी भारावून गेले. ती म्हणाली मी वयाच्या चौथ्या वर्षापासून सिनेमात काम करू लागले. शाळेत जायला कधी वेळ मिळाला नाही. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून डिग्री घेणं वगैरे काय असतं , शाळा कॉलेज काय असतं हे मला माहितीच नाही. 
एका हॉटेलात आई वडिलांसोबत आली असता चार वर्षांचा या मुलीला कुणी एक दिग्दर्शक डान्स करताना बघतो काय, सिनेमासाठी तिला निवडतो काय..घरून तिला प्रोत्साहन मिळत काय.. बाल कलाकार म्हणून तिची सुरुवात होते काय..and the rest is history...
अभिनय म्हणजे काय हे कळत नसलेल्या वयात अभिनेत्री म्हणून यशस्वी पदार्पण केलेल्या फार कमी कलाकारांपैकी श्रीदेवी एक आहे. स्पष्टंच बोलायचं तर पैसे म्हणजे काय हे कळत नसलेल्या वयात ती पैसे मिळवू लागली. मग शाळेत जायचा प्रश्न कुठे येतो? शालेय शिक्षण घेतलं नाही मात्र तुमचं एखाद्या क्षेत्रात टॅलेंट असेल तर पैसा हा विषयच राहत नाही हे श्रीदेवी ने सिद्ध केलं. 
अतिशय निरागस वयात अभिनयाचे धडे तिला मिळाले असणारेत, पण तेही, काम करता करता. गहि-या, बोलक्या डोळ्यांची हि दिवंगत नटी , अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व, चालताना पाठीतून ताठ..सर्वांचं लक्ष वेधून घेणारी..सिनेमातल्या तिच्या चुलबुल्या इमेज च्या अगदी विरुद्ध खाजगी आयुष्य जगणारी. मितभाषी, शांत..
डोळ्यातून व्यक्त होणं हि श्रीदेवी ची जमेची बाजू. अगदी नगीना पासून ते इंग्लिश विंग्लिश पर्यंत..
श्रीदेवी ने जशी बडबडी पात्र साकारली तशीच कमी बोलणारी सुद्धा . हे म्हटलं कि 'खुदा गवाह' ची आठवण होते आणि डोळ्यासमोर येते ती 'बेनझीर'... दुसऱ्या भागातल्या मेहंदी पेक्षा मला 'बेनझीर' ला बघायलाच जास्त आवडत. तिने घातलेली शर्त पूर्ण करायला बादशाह खान निघताना "एक मुस्कुराहट के बगैर जाऊंगा नही" म्हणतो...आणि "मुश्किल है" म्हणता म्हणता बेनझीर गालात हसून बादशाह खान ला अलविदा करते...त्या दृश्यातली श्रीदेवी पुन्हा पुन्हा बघावी अशी आहे. 
डबल रोल्स पैकी मात्र तिची लम्हे मधली 'पूजा' मला उजवी वाटते. आपल्या पेक्षा वयाने कितीतरी मोठ्या, पण त्या 'कुवर वीरेंद्र प्रताप' वरचं प्रेम ती इतक्या कन्व्हिक्शन ने आणि इतक्या मॅच्युअर्डली व्यक्त करताना दाखवली आहे कि गोष्टीतली काल्पनिकता किंवा आभासीकरण गळून पडतं..लक्षत राहते ती श्रीदेवी आणि तिचे बोलके डोळे. 
आपलं नृत्य कौशल्य सुद्धा तिने अगदी हवं तिथे फार प्रभावी पद्धतीने वापरलेलं आहे..मिस्टर इंडिया मधलं "आय लव्ह यु" ..हे गाणं बघताना सोपं वाटतं मात्र एक अदृश्य प्रियकर आणि दृश्य प्रेयसी असा तो प्रसंग आहे. समोर कुणी नसताना सुद्धा, असल्याचा सेन्शुअस आभास निर्माण करणं खरोखर कठीण मात्र श्रीदेवी ने ते लीलया पेललं आहे.
अंत्यदर्शना ठेवलेली श्रीदेवी इतकी जीवंत भासत होती, कि वाटावं आत्ता उठून उभी राहील आणि तशीच एखाद्या 'चांदनी' सारखी चमकू लागेल आणि पुन्हा तिला बघायला, तिच्या सोबत फोटो घ्यायला लोकं गर्दी करतील. 
तिचा हा बोलका फोटो इन्स्टा वर पहिला आणि हे सगळं आठवलं....श्रीदेवी ला जाऊन आज ४ वर्ष झाली, लेकिन...ये लम्हे, ये पल हम , बरसों याद करेंगे'... 
Gone too soon..❤😌
Image: instagram 

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....