जाणीव

अगदी परवाच घडलेली गोष्ट..मी मंगळवारी नेहमीप्रमाणे माझ्या क्लास हून उशिरा घरी आले..खूप उशीर नाही तरी 9.30 वाजतातच..त्यामुळे असे आठवड्यातून 2 दिवस आम्ही दोघे उशिरा जेवायला बसतो..परवा च्या दिवशी तो बाहेरगावी असल्यामुळे फक्त माझंच जेवण व्हायचं राहिलेलं..सासरे बुवांचं नुकतंच जेवण झालेलं..माझे हात-पाय धुवून झाले आणि तेवढ्यात सासरे विचारायला आले," येतेस ना गं..आमटी गरम केलीय..भात पण वाढलाय तुझ्यासाठी ..आज सचिन नाही ना घरात म्हणून मी केलं". 😊 पुण्यात गेले 2 दिवस थंडी चा चांगलाच तडाखा वाढलाय..आशात मी गाडीवरून घरी आले..म्हणून बाबांना जास्तं जाणवलं..जाणीव..किती मोठा शब्द आहे..आपली कुणीतरी वाट बघतंय, आपली कुणीतरी काळजी घेतंय..
काळाच्या ओघात या जाणिवाच हरवून गेल्या आहेत कुठेतरी..माणसाला माणसाशी जोडलेलं ठेवण्याची ही सर्वात मोठी गोष्ट..जाणीव..प्रेम एकमेकांपर्यन्त पोहोचवण्यचं सर्वात सशक्त माध्यम..जाणीव..आपण इतरांकडून ज्या जाणिवेची अपेक्षा करतो ती आपण दाखवतो का? आपल्या इतरांकडून अपेक्षाच खूप, पण सुरुवात आपल्याकडून झाली पाहिजे हे विसरतोच आपण..हा  छान खेळ आहे खरं..जाणिवा शोधण्याचा..आणि ती सापडली की आपणच जिंकतो..
त्या दिवशी सासरे बुवांच्या या प्रेमा मुळे मला खूप समाधान वाटलं हे मात्र नक्की..आणि न शोधताच ही जाणीव सापडली म्हणून जिंकलेही.
😊😊😊

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....