मूल्य

सकाळी सकाळी आजे- सासुबाईंची  खणखणीत हाक आली. कुणी आहे का?.
पेपर आला असेल तर जरा आणून द्या..हाक मला ऐकू आली म्हणून मी पेपर (वर्तमानपत्र) द्यायला गेले. आजी तेव्हा पाठमोऱ्या ओट्या पाशी उभ्या होत्या..पेपर ठेवलाय याकडे त्यांचं लक्ष नव्हतं..मी 2 मिं त्यांच्याकडे पाहत उभी राहिले..दिवसातून पहिल्यांदा gas पेटवण्यापूर्वी आजीने शेगडी ला नमस्कार केला..पूर्वी चुलीला नमस्कार करायची सवय आजींना असणार. मात्र कौतुक याचं की आजही त्यांनी ही मूल्य जपली आहेत..ही संकल्पनाच किती छान आहे..ज्यामुळे आपल्याला शिजवलेलं अन्न मिळतं ती चूल पेटवण्यापूर्वी त्याला नमस्कार करणं..चुलीच्या रूपात देव पाहणे..म्हणजे निर्जीवाला सजीव केल्यासारखंच आहे की..
यावरुन अजून एक गोष्ट आठवली..माझे, वयाची नव्वद वर्षे पार केलेले आजोबा आजही संध्याकाळी दिवे लागले की बसल्याजागी आधी हात जोडतात..अगदी नित्य नियमानं..दिवेलागण झाली की नमस्कार करावा ही त्यांनी जपलेली मूल्य..
या दोन्ही उदाहरणावरुन लक्षात येते ती त्यांची सश्रद्ध वृत्ती..अगदी दैनंदिन व्यवहारात सुद्धा सगळीकडे या दृष्टिकोनातून पाहणं..हल्ली ज्याला positive approach म्हणतात तसेच काही..मी वापरत असलेली चूल, जेवत असलेलं अन्न, वापरत असलेली यंत्रणा याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं..किंवा संध्याकाळ झाली, आजचा दिवस छान गेला, त्याबद्दल दिवे लागण झाली की देवाचे आभार मानणे..आपल्या आधीच्या पीढी पासून ही मूल्य आहेत..त्यामुळेच त्यांना गरज पडायची नाही motivational speakers ची किंवा कुठल्याशा courses ची..कारण रोजच्या जीवनातच सगळी कडे positively पहिलं जायचं..
अपण सुद्धा करून बघू शकतो..आपण वापरत असलेल्या उपकरणाचे, वाहनांचे , वस्तुंचे आभार मानुया..निर्जीवात सजीव पहायला शिकुया..घरात, ऑफिस मधे, प्रवासात,जिथे कुठे असू तिथे बसल्या बसल्या , आणि दिवसभरात केव्हाही, देवाचे आभार मानुया..स्वतःभोवती सकारात्मक उर्जेचं वलय आपणच तयार करुया..आपली मूल्य जपुया..☺☺

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....