नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर


नृत्य वर्ग संपला..माझ्याकडे शिकणारी 6 वर्षांची छोटी अदिती, अजोबा न्यायला येतील म्हणून वाट बघत होती..मी तिच्याशी गप्पा मारत तिथेच तिच्या शेजारी दाराच्या पायरीवर बसले..अदिती गाणं सुद्धा शिकते हे मला माहित होतं..मला म्हणाली ताई, माझी गाण्याची पहिली परीक्षा छान झाली..म्हटलं वा..मग मला म्हणून दाखव की एक बंदिश..कुठली म्हणू ताई, भूप मधली चालेल? मी हो म्हणताच अदिती बाई गाऊ लागल्या....मी तिचं गाणं record करत्ये याची तिला गम्मत वाटली..भूप रागातली एक पारंपारिक बंदिश..इतनं जोबन पर मान न करिये..
अदिती इतकी एकरूप होऊन म्हणू लागली..तिला जमेल त्या पद्धतीने हरकती, शब्दांचे अचूक उच्चार..
या वयात मुलं किती जपतात निरागसता..एवढीशी अदिती न लाजता..न घाबरता..अगदी मोठयांदी गात होती..तिच्या समजेप्रमाणे..कुणी आपल्याला ऐकत तर नाही ना असं जराही तिच्या मनात आलं नाही. शेवटी मला म्हणते, ताई मी बघ तिहाई सुद्धा घेतली..😀😀
या तिच्या बोलण्यात कुठेही दिखावा, मला कसं कळतं हे भाव नव्हते..केवळ आणि केवळ बंदिश म्हणून दाखवल्याचा आनंद होता..तेवढ्यात तिचे आजोबा आले आणि मला bye ताई म्हणून अदिती निघाली..
मग लक्षात आलं की आज 14 नोव्हेंबर, बालदिन..आणि खरोखर बालदिन..children's day इतक्या छान पद्धतीने साजरा झाल्याचं मला समाधान वाटलं..😇😇😇


Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....