भूमिका
आजी आजोबा हे नातवंडांचे सवंगडीच असतात नाही का? कशी गंमत असते..खरं तर ते आपल्या काही पीढ्या आधीचे..मात्र जे आपल्या आई बाबांनाही जमत नाही ते त्यांना एखादी जादू केल्याप्रमाणे जमतं..आजी आजोबा आपल्या वयाचे होऊन खेळतात..अगदी तासंतास..आई बाबांना समजावता येत नाही ते समजावतात.
खरं तर आजी आजोबांचं काम जास्तं कठीण..त्यांना त्यांच्या मुलांनाही सांभाळून घ्यायचंय आणि नातवंडांनासुद्धा..पण हे सगळं ते अगदी लीलया करत असतात..या भूमिका अगदी सहज निभावत असतात..
हे आठवण्याचं कारण म्हणजे अलिकडे मी माझ्या आजोबांना भेटायला गेले..त्यांचं वास्तव्य मुंबईत असल्यामुळे वरचेवर भेट होऊ शकत नाही याचं नेहमी वाईट वाटतं मला..आजोबांचं वय 93..तब्ब्येत तशी कायमच ठणठणीत..अलिकडे वयोमानामुळे काही किरकोळ तक्रारी जरी होत असल्या तरी आजोबा नेहमीच त्यातून पूर्ण बरे होतात..
व्यवस्थित जेवण जात नसल्यामुळे या वेळी आजोबा बरेच बारीक झालेले दिसले..मी त्यांच्या शेजारी बसले आणि म्हणाले,"आजोबा,जेवताय ना व्यवस्थित?..भूक लागते ना? भूक मारू नका..व्यवस्थित जेवा..जेवला नाहीत तर अशक्तपणा येईल..सगळं जेवत जा..पोटाला काहिही त्रास होणार नाही तुम्हाला..आपण औषध आणलंय ना?."
मी हे सगळं सांगत असताना आजोबा पलंगावर आडवे पडूनच सगळं ऐकत होते..अगदी एखाद्या लहान मुलाप्रमाणे..मी सांगेन त्याला मान हलवून संमती देत होते..हे सगळं घडत असताना मला एकदम आठवण झाली ती माझ्या लहानपणची..मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी आलेले..आणि काही कारणामुळे माझं पोट बिघडलेलं..औषध आणल्यावर मला बरं वाटलं पण पुन्हा त्रास होईल या भितीने मी खात नव्हते..
तेव्हा मी अशीच आडवी पडलेले आणि आजोबा मला समजावत होते..," औषध आणलंय की नाही आपण?..मग आता वाटेल बरं..पण जेवायचं..नाही तर अशक्तपणा येईल की नाही?आंबे पण आणलेत खूप आपण." तेव्हा अशक्तपणा म्हणजे काय असा प्रश्नही मी विचारलेला..😄(इंग्लिश मीडियम चे परिणाम😀) मुळात आजोबा तसे अबोल, पण त्यांची ही वाक्य मात्र मला अगदी व्यवस्थित आठवतायत..
ही आठवण झाली आणि मला हसू आलं..तेव्हा मी लहान होते..आता 93 वर्षीय आजोबांचं लहान मूल झालेलं मी पाहत होते आणि मोठी होऊन आता मी त्यांना समजावत होते..आणि ते सुद्धा त्यांच्या मुला सुनांचंही ऐकणार नाहीत इतकं सगळं ऐकून घेत होते..
आई बाबा आजी आजोबा ही वयामुळे आपण नावं दिलेली नाती..पण वयाच्या प्रत्येक टप्प्यवरच्या गरजा वेगळ्या..जर असा विचार केला की आजोबा आपल्याहून मोठे..त्यांना आपण काय सांगणार तर आजोबांची त्यावेळची भावनिक गरज कशी पूर्ण होणार? हे प्रत्येक नात्याला लागू होतं..म्हणूनच कधी आजोबांची आई व्हावं लागतं..आईची बाबांची आई व्हावं लागतं..वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला किती वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात..याची मजा समजली तर वयाचा प्रत्येक टप्पा किती छान जगता येईल नाही का?
फोटो सौजन्य: गूगल

Comments
Post a Comment