Posts

माझी पहिली दुचाकी....

Image
आपल्या आयुष्यात महत्वाचं स्थान आपली उपकरणं सुद्धा बजावतात बरं...घरातला फ्रिज , वॉशिंग मशीन ते आपली वाहनं...त्यांच्या शिवाय आपलं काय झालं असतं असं अनेकदा वाटत असणार आपल्याला..आणि ते खरंही आहे.. म्हटलं तर निर्जीव वस्तू त्या पण त्यातही आपला जीव गुंतलेला असतो..यापैकी काही बदलायची वेळ आलीच आणि त्याजागी नवीन वस्तू घरात आली तरी जुन्या वस्तूची आठवण येतंच राहते. माझ्या आयुष्यात 'सनी' ,माझी दुचाकी ही अशीच एक आठवणीतली गाडी आहे..नाशिकला असताना आम्ही सनी घेतली.. सनीच का घेतली याचं एक मजेशीर कारण बाबा सांगतात...आमच्या शेजारी राहणारे लठ्ठ वैद्य आजी आजोबा त्यांच्या सनीवरून double seat जात असंत...तिथेच तिचा दणकटपणा सिद्ध झाला आणि बाबांनी सनी घ्यायचं ठरवलं.🤣🤣🤣 सनीचा सर्वात महत्वाचा उपयोग हा मला शाळेत सोडण्यासाठी होणार होता..अर्थातच शाळा घरापासून लांब होती. त्यामुळे आईने मला सोडणं आणणं सोयीचं होणार होतं.. नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सकाळी मी आणि आई सनीवरून शाळेत जात असू..येताना ऊन असल्यामुळे जरा दिलासा असायचा..तरी ,डोक्यावर ऊन आणि गार वारा या combination मधे सनीवरून फिरण्याची मजा व

कर्मभूमी ते पुण्यभूमी...

Image
    माझ्या नृत्य वर्गात ऊर्जेचा सर्वात मोठा झरा असतात त्या माझ्या छोट्या विद्यार्थिनी. शिकायला नव्याने सुरुवात केल्यामुळे उत्साह तर त्यांच्यात असतोच. त्याचबरोबर नवीन काय शिकतोय या बद्दल प्रचंड कुतूहल सुद्धा असतं.  सद्ध्या वार्षिक कार्यक्रमाची तयारी क्लास मधे सुरु आहे. अशावेळी लहान विद्यार्थिनींना समजेल, आवडेल आणि सादर करतानाही आनंद मिळेल असा आशय असलेलं काव्य त्यांच्यासाठी विचारपूर्वक निवडावं लागतं. आपल्या भारत देशाचं गुणगान गाणारं 'वंदे मातरम' हे असंच एक परिपूर्ण काव्य या वर्षी मी निवडलं.  मुलींना विचारलं , "याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? त्यांना जमेल तसं सोप्या भाषेत त्या सांगू लागल्या. वनस्पती, फळं, फुलं, नद्या, पर्वत रांगा, वारे सगळ्यांनी समृद्ध असा आपला देश आहे.   मात्र ही चर्चा एवढ्यावर थांबली नाही. विषय रंगत गेला आणि अचानक एकीने प्रश्न केला. ताई, कंट्री (देश) सुद्धा देवाघरी जाते का? आणि आपल्या सारखंच, कंट्री बॉर्न सुद्धा होते का (जन्म सुद्धा घेते का) वय वर्ष 7 असलेल्या या माझ्या विद्यार्थ्यांकडून हा प्रश्न येणं तसं अनपेक्षित होतं. दोन्ही प्रश्नांची उत्

पाणीपुरी

Image
  कधी कधी खूप अस्वस्थ वाटतं नाही का आपल्याला?...त्या जाहिराती लागत पूर्वी.."मै बहोत उदास था' ...तसं काहीसं.. आणि ..त्याच जाहिरातींमध्ये "और फिर मुझे मिला एक जादुई इलाज' ....असं ती लोकं म्हणत आणि प्रॉडक्ट दाखवत... ते इंग्रजी लोकांवरती केलेलं हिंदी डबिंग बघताना फार हसू यायचं 😃...पण.. इथे मुद्दा तो नाही.. मुद्दा हा आहे कि अस्वस्थ वाटतं ..ताण येतो.. मग करायचं काय.. तर दोस्त हो ..एक जालीम उपाय इथे या ठिकाणी मिळालेला आहे. .झोप हा उपाय आहेच..पण तीही कमालीची शांत लागावी या करता त्या अगोदरच नको का स्ट्रेस निघायला!..किमान थोडा तरी. त्या करता एक भन्नाट उपाय सापडला मला.. 'पाणी पुरी'  ...पाणी पुरी ला आपण गोल गप्पा, पुचका इत्यादी शब्दांनी ओळखतोच. पण आज मी त्याचा इतिहास सांगणार नाहीये, तो जाणकारांनी सांगावा..  तर पाणी पुरी मुळे आपला स्ट्रेस रिलीझ होतो.. कमालीचा..  शंभर गोष्टी चालतात ओ डोक्यात.. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे जणू आपल्याकडे पर्मनंट भाडेकरू.. उध्या-संज्या सारखे..भाडंही देत नाहीत आणि जातही नाहीत डोक्यातून...डोक्यात जातात उलटं...वर्तमानकाळात जागायचं कसं या

कुटुंब...

Image
आम्ही लहान असताना, 1999-2000 च्या सुमारास 'प्रपंच' हि मालिका लागायची अल्फा मराठी वर..आत्ताचं झी मराठी.. विभक्त कुटुंब पद्धत प्रचलित असताना ,प्रतिमा कुलकर्णी यांनी देशमुख कुटुंबाशी परिचय करून दिला.. श्रीधर देशमुख यांचं हे एकत्र कुटुंब... मुलं , सुना , नातवंड असे सगळे गुण्या गोविंदाने नांदणारे... एकमेवर इतका जीव कि कोण कुणाचं मूल हेही कळू नये.. आई वडिलांपेक्षा काका काकू जवळचे...आजी आजोबा जणू मित्रच नातवंडांचे...एकमेकांचा खंबीर आधार, मात्र उगाच कुणाच्याही आयुष्यात लुडबुड नाही.. समुद्रकाठी असलेला 'आश्रय' बंगला दिसला कि रवींद्र साठेंचे स्वर कानावर पडायचे आणि मग घराच्या आत डोकावता यायचं. मालिका सुरु करण्याची हि पद्धतच मला फार आवडायची...एक आल्हाददायक वातावरण निर्माण व्हायचं.. समस्या कुठल्या कुटुंबात नसतात? मात्र समस्या सुटतात हा विश्वास, हे सुरवातीचे स्वर निर्माण करायचे.. त्यामुळे मलिका पाहताना कधीही नकारार्थी वाटलं नाही. मालिकेत ब-याच ठिकाणी पार्श्वसंगीतात केवळ तानपुऱ्याचे स्वर ऐकू येतात..सहज साधे सोपे संवाद, झोपाळ्यावर बसलेलं असतानाचे, खोलीतले किंवा वऱ्हांड्य

कोपरा...

Image
'आपलं घर'... मनोमन हळवं करणारे हे शब्द...आपण  कितीही मोठे झालो..वयाने आणि खिशाने...तरी सरते शेवटी आपल्या मुक्कामी...आपल्या घरी आपल्याला यायची ओढ असणारच आहे... असं जरी असलं ना तरी आपल्या घरातला आपला आपला एक कोपरा असतो किंवा एक ठरलेली जागा असते...घरात असुनही त्या 'आपल्या' अशा जागेत गेल्याशिवाय आपल्या जिवात जीव येत नाही..मग तो एखादा  कट्टा असो, घरातला एखादा कोनाडा असो, बाल्कनी असो, गच्ची असो किंवा एखादी खोली असो..अख्ख्या घरात जे घरपण सापडत नाही ते , घरातल्या त्या लहानशा जागेत गवसत. कितीही मोठं जग असो आपलं, सूक्ष्माकडे आपला ओढा असतोच. अगदी घरात असताना सुद्धा. घरासाठी अजून एक सुंदर शब्द आपल्या शब्दकोशात आहे...'मंदिर'.. अशाच आपल्या सर्वांच्या परिचयाचं मंदिर ...'कसबा गणपती'... राजमाता जिजाबाई साहेब आणि राजे शिवछत्रपती यांनी स्थापन केलेलं हे मंदिर म्हणजे अमूल्य असा वारसा.. अलिकडे दिवाळीत इथे आलो असता हे मंदिर इतकं तेजस्वी भासलं म्हणून सांगू! जुन्या धाटणीची ही वास्तू दिव्यांच्या आणि आकाश कंदिलांच्या  उजेडात अधिकच जिवंत वाटत होती.. गर्भगृह आणि सभामंडप

गोदावरी

Image
'अश्रद्धेकडून श्रद्धेकडचा प्रवास'... चित्रपटाचं उपशीर्षक एक प्रकारची हमी, सकारात्मकता देऊन जातं ...आमच्यासारख्या सर्व सामान्य प्रेक्षकांना 'and they lived happily ever after' ची इतकी सवय आहे कि सिनेमा म्हटलं कि पहिल्यांदाच 'शेवट गोड होतोय ना ' या कडे लक्ष लागून राहतं. ..आणि ते , 'गोदावरी' हा चित्रपट पूर्ण करतो.. गोदातिराची दृश्य हि या चित्रपटाचा 'USP' आहे. सुरुवातीपासून शेवट पर्यंत पात्रांच्या आयुष्यातल्या समस्या किंवा उतार चढाव दाखवले असले तरी 'गोदामाई' सतत आशावाद दाखवत राहते. निशिकांत चा स्वतःचा स्वतःशी सुरु असलेला संघर्ष अधोरेखित तर होत राहतोच पण चित्रपटात त्याचं डबकं होऊ दिलेलं नाही. परंपरा म्हणजे ' प्रवाह '...नदीसारखा...जशी नदी थांबत नाही तशी परंपराही..त्यात फक्त जाणिवांची भर पडत राहते...मात्र आपण परंपरेला देणं लागतो...आणि त्यात काहीही गैर नाही ..अशी एक एक उत्तरं निशिकांत ला सापडत जातात. चित्रपटाची इतर पात्र हि जणू निशिकांत च्या गुरुची भूमिका बजावतात. त्याचे आई-वडील, पत्नी गौतमी, मुलगी सरिता, मित्र केशव, फुगेवाला

अनुभूती...

Image
  सर सलामत तो पगडी पचास' अशी म्हण आहे...खरं तर अजून एक म्हण प्रचलित व्हायला हवी... 'मन सलामत तो पगडी पचास' .... उद्या दहा ऑकटोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस..या अनुषंगाने काही सुचलं, ते शेअर करते.  मन' असं म्हटलं की त्याला अनेक पैलू ,अनेक अर्थ, अनेक परिभाषा आहेत. पण हे मन नावाचं जे काही आपल्यापाशी आहे, ते सतत कार्यरत राहतं ते कशाच्या जोरावर? तर अनुभवांच्या...आपल्या समोर जे घडतंय..त्याला आपण काहीतरी प्रतिसाद देत असतो . त्यातूनच मन कार्यरत राहत.. अनुभव घेत राहून मन कार्यरत नक्की राहील. पण मानवी मनाची कक्षा इथपर्यंत मर्यादित नाही. आपण केवळ अनुभव घेत राहिलो तर एकावर एक असे नुसते थर साचत राहतील. मिळलेल्या अनुभवाचा विनियोग करायची वेळ येईल तेव्हा यातला नेमका कुठला,  कधी आणि कसा वापरायचा हे समजणारच नाही.. मग नेमकं काय घडलं पाहिजे? तर अनुभव हा ,अनुभूती पर्यंत पोहोचतोय का यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अनुभूती ची माझी व्याख्या हि अशी.. 'ज्ञानदायी अनुभव म्हणजे अनुभूती' ...ज्या अनुभवातून आपल्याला ज्ञान होतं ,ती अनुभूती.. ज्ञान...माहिती नव्हे... अशाच अनुभूतींच्य

राजू भाई..

Image
   राजू श्रीवास्तव यांचं अकाली जाणं खरोखर मनाला चटका लावून गेलं. गेल्या महिन्यापासून मृत्यूशी त्यांची चाललेली झुंज अखेर संपली. Brain dead , condition serious इ अफवा येत होत्या . पण ,'he is stable, do not believe in rumors असं वाचल्यावर आशावादी वाटत होतं . मलाच काय आपल्या सगळ्यांनाच  प्रतीक्षा होती ती राजू भाई ठणठणीत बरे होऊन पुन्हा सगळ्यांसमोर खळखळून हसवायला कधी येतात याची. मला खात्रीये, आजारी असताना हॉस्पिटल मध्ये आलेल्या अनुभवांवरही त्यांनी एक स्टॅन्ड अप ऍक्ट तयार केला असता..मृत्यू चं कारण ठरलं हार्ट अटॅक , पण राजू भाई बरे झाले असते तर त्यांनी 'माझा हार्ट अटॅक' या वरही उत्तम ऍक्ट सादर केला असता आणि हा गंभीर विषय अतिशय हलका करून आपल्यापुढे मांडला असता.  पण.. पण हे सगळं आता होणार नाही..कारण आता राजू भाई आपल्यात नाहीत...'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ' मधून राजू भाई घरोघरी पोहोचले.  त्यांच्या गजोधर ने तर सगळ्यांना वेड लावलं.  राजू भाईंची खासियत म्हणजे ,अति उत्तम देहबोलीचा वापर आणि निरीक्षण क्षमता. रवंथ करणाऱ्या गायीपासून ते फकफकणाऱ्या ट्यूब लाईट पर्यंत ते

Unity in diversity..🇮🇳🇮🇳🇮🇳

Image
  माझ्याकडे शिकणारी लहानशी सात वर्षांची 'समृद्धी'...तिने माझ्याकडे नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली त्याला आता एक वर्ष झालंय..तिच्या वडिलांची, नोकरीमुळे इथे वर्षभरापूर्वी बदली झाली , नाहीतर हे कुटुंब मूळचं कोलकाता चं, बंगाली बोलणारं . आई वडील, समृद्धी व दोन वर्षांची धाकटी बहीण असं यांचं छोटं चौकोनी कुटुंब.  वर्षभरापूर्वी समृद्धीने डान्स शिकायला सुरुवात केली तेव्हा तिला खूप कठीण जात होतं. भरतनाट्यम च्या बेसिक पोझिशन्स करण्यापासून ते इतर गोष्टींपर्यंत. मात्र अतिशय मेहनती मुलगी आहे ती. या एका वर्षात तिने स्वतःला इतकं तयार नक्की केलं कि गेल्या रविवारी झालेल्या क्लास च्या वार्षिक कार्यक्रमात आत्मविश्वासाने आणि अतिशय प्रसन्न चेहऱ्याने स्टेज वर नाचणाऱ्या या मुलीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं . तिची ताई म्हणून मला तिचं खूप कौतुक वाटलं . समृद्धी मूळची बंगाली भाषिक असल्यामुळे तिला आजही हिंदी व इंग्रजी भाषेचा अडसर जाणवतो . घरात बंगाली बोलणारी लोकं , वडिलांना जरी इंग्रजी येत असलं तरी काम सांभाळून ते तिला किमान इंग्रजी बोलायला शिकवू शकतील एवढा वेळ ते देऊ शकत नाहीत. समृद्धी ची आई

अगत्य

Image
   आमच्या कडे स्वयंपाक करणाऱ्या छाया ताईंच्या धाकट्या बहिणीच्या लग्नाला परवा गेले होते. खूप वर्षांनी त्यांच्या घरात शुभ कार्य होणार होतं याचा एकूण आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.    आपल्याकडे ज्या पद्धतीने लग्न समारंभ होतो त्याची सवय आपल्याला असते. पण छाया ताईंच्या घरच्या कार्याला जाण्याची माझी पहिलीच वेळ. पत्रिका पद्धत त्यांच्यात नसावी मात्र मुहूर्ताची वेळ सांगून मुहूर्ताला नक्की या असं छाया ताईंनी आवर्जून सांगितलं होतं . त्याप्रमाणे मी पोहोचले.     गर्दी बघून खरंतर छान वाटत होतं. एरवी गर्दी पासून लांब पळणारी मी पण आज गर्दीत जाऊन बसायला बरं वाटत होतं . हे दोन वर्षांचे निर्बंध संपुष्टात येऊन लोकं एकत्र येतायत, तेही मास्क शिवाय हे खरोखर विशेष आहे.   छाया ताईंची मुलगी श्रुती मला तिथे पोचताच प्रथम भेटली, " अय्या, गौरी ताई तुम्ही आलात" ..हे म्हणतानाचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. कदाचित आमच्या पैकी कुणी येणार नाही असं त्यांना वाटलं असावं म्हणून का काय पण तिला झालेला आनंद माझ्यापर्यंत पोहोचला. छाया ताई पलीकडच्या खोलीत आहेत असं कळल्यावर त्यांना शोधत त

क्षणो क्षणी 'क्षणचित्र'....

Image
    क्षण चित्रांची दुनिया खरोखरच जादुई आहे.. एखादा क्षण त्या लेन्स ने टिपावा आणि तो चिरकाल तसाच राहावा..आता तर सॉफ्ट कॉपी मुळे , तो डिलीट करे पर्यंत आपल्याजवळ अगदी आहे तसा राहावा याला जादू च म्हणावी लागेल. या सगळ्या माध्यमातून आपल्या आठवणी आपल्या पाशी नक्की राहतात.. पण का कुणास ठाऊक हे असं असल्यामुळे असेल कदाचित पण तो क्षण अनुभवण्याची भावना कमी होत चाललीये असं वाटतं.  लग्न समारंभाचंच उदाहरण घेऊया..भरभरून फोटो काढण्याकडे आज कल आहे..अगदी वधू वर त्यांच्या कक्षांमधून पूजा विधी करण्याकरता बाहेर येतात ते क्षण टिपण्यापासून ते सप्तपदीची प्रत्येक सुपारी पायाने सरकवतानाचे फोटो.. असे सगळे क्षण टिपायचे..त्यातही वधू वर प्रत्येक सुपारी बरोबर नवनवीन पोजस घेऊन फोटो काढताना दिसतात . प्रत्यक्ष काय सुरु आहे..तर सप्तपदी. त्याच्या प्रत्येक पदाला एक एक संकल्प आहे ..गहन अर्थ आहे..एक मनोभूमिका आहे..मात्र क्षण आणि क्षण टिपण्यासाठीच्या अट्टाहास रुपी इच्छेमुळे या इतर महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं . वधू वर एकमेकांमध्ये इतके गुंतलेले असतात कि आलेल्या लोकांमधे सुद्धा त्यांना फारसा रस नसतो..या सगळ्

निरागस हट्ट....(लघू कथा)

Image
१९९३ सालची गोष्ट...सरस्वती विद्यामंदिर शाळेत राजू दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. राजुचं संपूर्ण नाव प्रल्हाद राजेंद्र गोडबोले. नावामागची कथा अशी कि प्रल्हादच्या आजीने (आई ची आई) तिच्या लहानपणी म्हणे शाळेच्या नाटकात भक्त प्रल्हादाची भूमिका केलेली. तेव्हापासून त्या इतक्या भारावून गेलेल्या कि आपल्याला धाकट्या भावाचं नाव प्रल्हाद ठेवायचं असं त्यांनी ठरवलं होतं . पण तिला झाली धाकटी बहिण, त्यामुळे मग आपल्या मुलाचं नाव तरी प्रल्हाद ठेवूया अशी इच्छा होती .पण त्यांनाही दोघी मुलीच , त्यामुळे मोठ्या मुलीला जर का पहिला मुलगा झाला तर त्याचं नाव प्रल्हाद ठेवायचं असं म्हणे तिने सांगून ठेवलेलं. तर असा हा त्रेता युगातला प्रल्हाद कलियुगात आला तो गोडबोलेंच्या घरी. पण होता होता प्रल्हाद चा राजू झाला आणि सगळे त्याला लाडाच्या नावाने हाक मारू लागले. विष्णुभक्त नसला तरी हा प्रल्हाद प्राणी भक्त होता. हर तऱ्हेचे, हर जातीचे प्राणी त्याला आवडायचे. छोटे मोठे किडे , पाली , फुलपाखरं , सगळं त्याला खूप आवडायचं . त्यांच्याकडे बघत बसणं , त्यांच्या हालचालींचा निरीक्षण करणं . कधी पालीसारखं उलटं चालून बघणं , कधी आ

मोठेपण..

Image
कलाकाराला मोठेपण मिळण्याकरता तपश्चर्या करावी लागते..ते सहज साध्य नाही..मोठेपण मिळण्याकरता मात्र आयुष्यात अनेक ठिकाणी स्वतःच स्वतःला लहान होताना कलाकार पाहत असतो. कधी स्वतःच्या नजरेत कधी इतरांच्या. काहीजण त्याला सतत लहानपण देऊ पाहत असतात .अशावेळी कलाकाराची खरी परीक्षा असते . जग त्याला कितीही लहान करो, त्याने स्वतःच्या नजरेतून स्वतःला लहान करता काम नये. या अग्निदिव्यातून तालून सुलाखून जो निघतो आणि तरीही स्वतः लहान राहून कला मोठी करतो ,त्याच कलाकाराला मोठेपण मिळतं .. आज 'मी वसंतराव पाहताना हे सतत जाणवत होतं. जिथे सच्चे स्वर सापडतील ते संगीत आणि अशा सच्चा स्वरांचा शोध घेत असलेला एक ' अद्वितीय' कलाकार आपल्याला लाभला ते म्हणजे 'वसंतराव देशपांडे'. चाकोरीबद्ध गायकीत स्वतःला बंदिस्त न केल्यामुळेच कदाचित 'स्वर' त्यांना शोधत आले असावे. 'सा' लागला कि साक्षात परमेश्वर येऊन समोर उभा राहतो, त्याला शोधत मंदिरात जावं लागत नाही, हे मास्टर दीनानाथांच्या मुखी आलेलं चित्रपटातलं वाक्य अगदी खरं आहे. मात्र त्या परमेश्वरालाच मुक्तपणे प्रकट व्हायची इच्छा झाली असाव

श्री स्वामी समर्थ..

Image
2019 सालची गोष्ट ..आम्ही दोघांनी अक्कलकोट ला जायचं ठरवलं . एरवीच्या वेळापत्रकात आमच्या एकूण व्यवसायाचं स्वरूप बघता वर्षभरात जमलं नाही म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत जायचं ठरलं .  आमच्या घरी कशेळीकरांकडे स्वामींवर सगळ्यांची श्रद्धा,  विशेषतः माझ्या आजीची .त्यामुळे माझं नाव अक्कलकोट ला जाऊन ठेवावं अशी आजीची इच्छा होती. महिनाभराची असताना मला अक्कलकोट ला घेऊन जाऊन नाव ठेवलंय असं आई सांगते.  त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी माझा अक्कलकोट ला जाण्याचा योग 2019 च्या मे महिन्यात आला. भर उकाड्यात जाण्याचा बेत ठरलेला खरा पण प्रत्यक्ष अक्कलकोट ला जाऊन दर्शन घेण्याच्या इच्छेपुढे उकाडा तो कसला. सकाळी लौकर आवरून आम्ही दोघे, आमच्या चार चाकीतून निघालो. प्रवास एकूण छान सुरु झालेला. सोलापूर रस्त्याला लागलो तशी गाड्यांची रांग लागलेली दिसली. पुढे कुठेतरी तेल सांडल्यामुळे जबरदस्त अपघात झाला होता. एकूणच घडलेला प्रकार लक्षात आला . गाडी हळू हळू , कासव गतीने पुढे ढकलत होतो . या मागे बसण्यात काहीही अर्थ नव्हता हे एकूण लक्षात आलं. ठरल्याप्रमाणे अक्कलकोट ला पोहोचायचं असेल तर इथून बाहेर पडलं पाहिजे. मागे फिराव

एका अंघोळीची गोष्ट

Image
अंघोळ म्हटलं की मला सध्या एकच चित्र डोळ्यापुढे दिसतं ..जे कदाचित घरोघरी दिसत असेल किंवा नसेलही..रोज एक ठरलेला प्रश्न मी सचिन ला नक्की विचारते (हुकूम करते म्हंटल तरी चालेल) अंघोळ कधी करतो आहेस?...त्यावर तो ," जातोय, कळलं ना!" असा वैताग मिश्रित राग दाखवत अंघोळीला जाण्याचं मनावर घेतो.. अंघोळ करणाऱ्यांच्या 2 categories असतात..एक, ज्यांना अंघोळ करताना विलक्षण आनंद मिळतो , त्यामुळे ते अंघोळ झाल्या नंतर नवीन जन्म झाल्याच्या आविर्भावात बाहेर येतात, सचिन सारखे,..तर दुसरे ,ज्यांना अंघोळ हि केवळ औपचारिकता वाटते , त्यामुळे ते अं घो ळ हि ३ अक्षर उच्चारायच्या आत बाहेर आलेली असतात, कावळ्याची अंघोळ करणारे , माझ्यासारखे.. म्हणूनच सचिन सारख्या लोकांना आंघोळीचं वेळापत्रक केलेलं आवडत नाही , ते दिवसभरात कधीही व कितीही वेळ अंघोळ करू शकतात..तर माझ्यासारखे," एकदाची करून टाकूया ती अंघोळ" म्हणून प्रकाश वेगाने अंघोळ करून येतात. मुद्दा काय , तर अंघोळी वेळेवर व्हाव्या आणि घराचं वेळापत्रक बिघडू नये..पण त्यावर "माझ्या अंघोळीचा आणि घरातल्या रुटीन चा संबंध काय?" असा निरागस प्र