Posts

कृतज्ञता

Image
आमच्या घरासमोरंच बंगल्याचं बांधकाम सुरू आहे..येता जाता तर नजर पडतेच त्यावर रोज पण आज तिथे सकाळी लहानग्यांना खेळताना पाहून काही आठवणी जाग्या झाल्या.. हे माझ्या लहानपणच्या दिवसांचं..आम्ही,म्हणजे आई-बाबा आणि मी, नुकतेच बदलापूरला नवीन घरात रहायला गेलो होतो..मी असेन पहिली-दुसरीत..जे flats तयार होते त्याचं possession दिलं गेलेलं..आम्हीच सोसायटीत पहिले रहायला येणारे..बाकी घरं अजून पूर्ण व्हायची होती.. दिवस शाळेत आणि अभ्यासात निघून जायचा..प्रश्न उरायचा संध्याकाळचा..कुणासोबत खेळू..माझ्या वयाचं आजुबाजुलाही कुणी दिसेना.. कशी ते आता आठवत नाही, पण माझी ओळख लक्ष्मीशी झाली..इमारती चं बांधकाम करणार्या लोकांपैकी एका कुटुंबातील ही मुलगी..माझ्याहून थोडी मोठी असावी..ती आणि तिचा लहान भाऊ दोघे खेळताना दिसायचे..कशी कुणास ठाऊक, मी सुद्धा त्यांच्या सोबत खेळायला लागले..आई बाबांनीही कधी मला आडवलं नाही..लक्ष्मी कधी कधी भातुकली खेळायला घरी सुद्दा येत असे.. माझे काही फ्रॉक्स आईने तिला वापरायला म्हणू दिलेले..ते घालून तिला माझ्यासोबत खेळायला खूप मजा यायची.. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मी आजोळी गेले, परत...

पाऊस...

Image
पाऊस...या एका शब्दामधे किती काही भरून राहिलंय...नवी उम्मेद, नवा उत्साह..नवतेचा संबंध पावसाशीच जुळलेला.. पावसाळा हा एकमेव असा ऋतू आहे ज्याची सर्वच जीव आतुरतेने वाट बघत असतात... कधी तो न सांगता एकदम surprise द्यायला येतो..तर कधी आत्तासारखं..केव्हा पडेल याची उत्सुकता ताणून धरतो..तो लांबवर दिसणारा काळा ढग..तिथूनच उत्सुकता ताणली जाते.. पावसाशी वेगवेगळ्या वयाचं वेगवेगळं नातं आहे.. लहानपणी तर खासंच.. शाळेत असताना तर पावसाळ्याच्या दिवसात, जून महिन्यात शाळा सुरू व्हायची..पाऊस पडल्यामुळे मातीचा सुवास जसा हवा हवा वाटतो तसंच नवीन पुस्तकांचा, वह्यांचाही वास हवा हवासा वाटायचा..नवीन वर्गात, नवीन इयत्तेत..मित्र मैत्रिणी मात्र तेच हवे असायचे, यातच नवीन मित्रांची सुद्धा भर पडायची.. रेनकोट घालून पावसात सायकल चालवत , चिखल उडवत, थोडं भिजून, थोडं कोरडं राहून शाळेत पोहोचायला किती मजा यायची..घरातून निघताना एकटं, वाटेत मित्र मैत्रिणींचा टोळका भेटायचा आणि त्याच उत्साहात कधी शाळेत पोहोचलो कळाचं सुद्धा नाही..चालत गेलो, तरीही मजा, हळूच एखाद्या डबक्यात सगळ्यांनी उडी मारायची..तेव्हा कुठे स्वच्छ पाणी आणि घाण पाणी ...

मोलाचा धडा

परवा जोशी काकू भेटल्या..तशी ही माझी आणि त्यांची पहिलीच भेट..आमच्या स्वयंपाकीण बाई जोशी काकूंकडे काम करतात त्यामुळे त्यांच्याविषयी ऐकून होते..वरवर ठणठणीत वाटणार्या काकू, अल्जायमर च्या रुग्ण आहेत..दररोज काही तास सोबत राहणं, स्वयंपाक आणि काकूंना बाहेर फिरायला घेऊन जाणं हे आमच्या स्वयंपाकीण बाई छाया ताईंचं काम..आणि हे सगळं त्या अगदी प्रेमाने करतात.. परवा बाहेर फिरायला पडल्या असताना आमची भेट झाली..आमच्या घरावरून जात असताना छाया ताईंनी आमची ओळख करून दिली.. अतिशय प्रसन्न चेहर्याने जोशी काकू म्हणतात, किती छान नाव आहे तुमच्या बंगल्याचं 'शैलचंद्र'.. आजारी असल्यामुळे काकू संदर्भ सोडून बोलत होत्या..पण मधेच त्या असं काही छान बोलू लागल्या की त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकावं लागलं.. त्या बोलत होत्या..'अगं, आपण की नाही लोकांना गृहित धरतो, सगळ्यांशी कसं प्रेमाने बोल्लं पाहिजे..तुम्ही बरे आहात ना..खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, पुन्हा नक्की या आमच्याकडे असं म्हटलं पाहिजे..आपली पहिली भेट आठवणीत राहिली पाहिजे समोरच्या व्यक्तीच्या..हल्ली की नाही कुणी कुणाशी प्रेमाने बोलत नाही..सतत राग राग करतात ल...

विवेकशून्यता

पक्षांसाठी पिण्याचे पाणी बहुतेक जणं ठेवतात..तेव्हा हे त्यांनी नक्की पाहिलं असणार..विशेषत: छोटे पक्षी त्या पाण्यात स्वत:ला बुचकळून आधी अंघोळ करतात आणि नंतर तेच पाणी चोचीने पीऊन उडून जातात. किती साधा सरळ विचार..हे काय दिसतंय..पाणी..याचा उपयोग कशासाठी.. अंघोळ करण्यासाठी आणि पिण्यासाठी.. मग हे पिण्याचं पाणी, यात अंघोळ कशी करणार हे असले प्रश्न पक्षांना कधी पढत नाहीत. माणूस ठरला विकसनशील! सतत विकासाच्या शोधात!..बौद्धिक विकास, आर्थिक विकास, सामाजिक विकास ही अशी माणसाची घोडदौड सुरू राहिली.. मात्र ही सर्व प्रगती होत असताना माणूस त्याच्या मूलभूत नैसर्गिक प्रेरणांपासून दूर जात राहिला आणि स्वत:चा विवेक व वास्तवाचं भान हरवून बसला. हे माझं, हे त्याचं, हा माझा, तो माझा नाही, या जास्तीच्या समजुती तयार झाल्या. नियम, कायदे माणसाने स्वत:च तयार केले, पण या जास्तीच्या 'अकलेमुळे' कायदेही तोच मोडायला लागला..आणि आश्चर्य म्हणजे असं करत असताना त्याला जराही लाज किंवा अपराधीपणाची भावना वाटली नाही, ना कधी पश्चात्ताप झाला. मीही माणूस, ज्याचं मी नुकसान करतो तोही माणूसच हा साधा विवेक तो हरवून बसला.. आणि याही...

मूल्य

सकाळी सकाळी आजे- सासुबाईंची  खणखणीत हाक आली. कुणी आहे का?. पेपर आला असेल तर जरा आणून द्या..हाक मला ऐकू आली म्हणून मी पेपर (वर्तमानपत्र) द्यायला गेले. आजी तेव्हा पाठमोऱ्या ओट्या पाशी उभ्या होत्या..पेपर ठेवलाय याकडे त्यांचं लक्ष नव्हतं..मी 2 मिं त्यांच्याकडे पाहत उभी राहिले..दिवसातून पहिल्यांदा gas पेटवण्यापूर्वी आजीने शेगडी ला नमस्कार केला..पूर्वी चुलीला नमस्कार करायची सवय आजींना असणार. मात्र कौतुक याचं की आजही त्यांनी ही मूल्य जपली आहेत..ही संकल्पनाच किती छान आहे..ज्यामुळे आपल्याला शिजवलेलं अन्न मिळतं ती चूल पेटवण्यापूर्वी त्याला नमस्कार करणं..चुलीच्या रूपात देव पाहणे..म्हणजे निर्जीवाला सजीव केल्यासारखंच आहे की.. यावरुन अजून एक गोष्ट आठवली..माझे, वयाची नव्वद वर्षे पार केलेले आजोबा आजही संध्याकाळी दिवे लागले की बसल्याजागी आधी हात जोडतात..अगदी नित्य नियमानं..दिवेलागण झाली की नमस्कार करावा ही त्यांनी जपलेली मूल्य.. या दोन्ही उदाहरणावरुन लक्षात येते ती त्यांची सश्रद्ध वृत्ती..अगदी दैनंदिन व्यवहारात सुद्धा सगळीकडे या दृष्टिकोनातून पाहणं..हल्ली ज्याला positive approach म्हणतात तसेच क...

जाणीव

अगदी परवाच घडलेली गोष्ट..मी मंगळवारी नेहमीप्रमाणे माझ्या क्लास हून उशिरा घरी आले..खूप उशीर नाही तरी 9.30 वाजतातच..त्यामुळे असे आठवड्यातून 2 दिवस आम्ही दोघे उशिरा जेवायला बसतो..परवा च्या दिवशी तो बाहेरगावी असल्यामुळे फक्त माझंच जेवण व्हायचं राहिलेलं..सासरे बुवांचं नुकतंच जेवण झालेलं..माझे हात-पाय धुवून झाले आणि तेवढ्यात सासरे विचारायला आले," येतेस ना गं..आमटी गरम केलीय..भात पण वाढलाय तुझ्यासाठी ..आज सचिन नाही ना घरात म्हणून मी केलं". 😊 पुण्यात गेले 2 दिवस थंडी चा चांगलाच तडाखा वाढलाय..आशात मी गाडीवरून घरी आले..म्हणून बाबांना जास्तं जाणवलं..जाणीव..किती मोठा शब्द आहे..आपली कुणीतरी वाट बघतंय, आपली कुणीतरी काळजी घेतंय.. काळाच्या ओघात या जाणिवाच हरवून गेल्या आहेत कुठेतरी..माणसाला माणसाशी जोडलेलं ठेवण्याची ही सर्वात मोठी गोष्ट..जाणीव..प्रेम एकमेकांपर्यन्त पोहोचवण्यचं सर्वात सशक्त माध्यम..जाणीव..आपण इतरांकडून ज्या जाणिवेची अपेक्षा करतो ती आपण दाखवतो का? आपल्या इतरांकडून अपेक्षाच खूप, पण सुरुवात आपल्याकडून झाली पाहिजे हे विसरतोच आपण..हा  छान खेळ आहे खरं..जाणिवा शोधण्याचा..आणि ती सा...

देऊळ

देऊळ एका संध्याकाळी , घराजवळच्या दत्त मंदिरात गेलेले. श्री.स्वामी समर्थ, दत्त गुरु, गणपती, महालक्ष्मी अशा सर्व देवतांच्या प्रतिमा तिथे आहेत..अतिशय शांत, गर्दी नसलेलं हे टुमदार देऊळ.. मी नामस्मरण करत बसलेले, तेवढ्यात एक 4-5 वर्षांची मुलगी तिच्या बाबांचा हात धरुन आली. तिला सर्वात आधी कशाची उत्सुकता असेल तर सगळ्या घंटा वाजवण्याची..तिच्या बाबांनी तिला उचलून घेतलं आणि तिने आनंदाने सगळ्या घंटा वाजवल्या..खाली उतरवताच ती प्रदक्षिणा घ्यायला पळाली.. हे सगळ पाहून मला माझं लहानपण आठवलं. देऊळात जाणं हा माझा लहानपणापासून चा आवडता उद्योग. लहानपणी आई-बाबांसोबत घराजवळच्या लक्ष्मी-नारायण मंदिरात गेल्याच्या आठवणी माझ्या अजूनही ताज्या आहेत. मला अजूनही ठळकपणे आठवतंय..त्या देवळाच्या अंगणात शहाबादी फरशा होत्या..गेट मधून आत आलं आणि चपला काढल्या की मी जशी छप्पी लंगडी खेळतात तशी उड्या मारत मारत पुढे जायचं. आज इतक्या वर्षांनी या दत्त मंदिरात गेल्यावर या आठवणी जाग्या झाल्या. मलाही अशीच घंटा वाजवण्याची उत्सुकता असायची..कधी एकदा बाबा उचलून घेतायत आणि कधी आपला हात तिथपर्यंत पोहोचतोय..ते झालं की पळत जाऊ...

नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर

नृत्य वर्ग संपला..माझ्याकडे शिकणारी 6 वर्षांची छोटी अदिती, अजोबा न्यायला येतील म्हणून वाट बघत होती..मी तिच्याशी गप्पा मारत तिथेच तिच्या शेजारी दाराच्या पायरीवर बसले..अदिती गाणं सुद्धा शिकते हे मला माहित होतं..मला म्हणाली ताई, माझी गाण्याची पहिली परीक्षा छान झाली..म्हटलं वा..मग मला म्हणून दाखव की एक बंदिश..कुठली म्हणू ताई, भूप मधली चालेल? मी हो म्हणताच अदिती बाई गाऊ लागल्या....मी तिचं गाणं record करत्ये याची तिला गम्मत वाटली..भूप रागातली एक पारंपारिक बंदिश..इतनं जोबन पर मान न करिये.. अदिती इतकी एकरूप होऊन म्हणू लागली..तिला जमेल त्या पद्धतीने हरकती, शब्दांचे अचूक उच्चार.. या वयात मुलं किती जपतात निरागसता..एवढीशी अदिती न लाजता..न घाबरता..अगदी मोठयांदी गात होती..तिच्या समजेप्रमाणे..कुणी आपल्याला ऐकत तर नाही ना असं जराही तिच्या मनात आलं नाही. शेवटी मला म्हणते, ताई मी बघ तिहाई सुद्धा घेतली..😀😀 या तिच्या बोलण्यात कुठेही दिखावा, मला कसं कळतं हे भाव नव्हते..केवळ आणि केवळ बंदिश म्हणून दाखवल्याचा आनंद होता..तेवढ्यात तिचे आजोबा आले आणि मला bye ताई म्हणून अदिती निघाली.. मग लक्षात आलं की आज ...

साथ

अनोखा बाल दिन

प्रतिसाद