Posts

Showing posts from 2019

दुर्गराज

Image
'रायगड'...'गडांचा राजा, राजांचा गड'.. अशी ही मायभूमी 'रायगड' आपले आराध्य राजे शिवछत्रपतींची राजधानी पाहण्याचा बेत ठरला..गडावरंच रहाण्याची सोय झालीच होती.. आधी राजमाता जाजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले..मात्र गड चढून जाण्याचा विचारही शिवला नव्हता..आपण आपलं ropeway मार्गी जाऊया म्हटलं..त्यानुसार थोडंफार सामान घेऊन निघालो..रविवार असल्यमुळे ropeway ला 6 तास waiting..काय करावं सुचेना इतक्यात एक बोरं विकणा-या आजी भेटल्या..म्हणाल्या अहो कुठे थांबता..जा चढत...2 तासात पोहोचाल..या मी shortcut दाखवते..500 पाय-या वाचवते..(ही बहुदा त्यांची tag line असावी..जाता येता सगळ्यांना हेच सांगत होत्या)   थोडा विचार केला..म्हटलं आपल्या workout चा उपयोग करून घेण्याची हीच ती वेळ...पायात sports shoes नसले तरी floaters होते..पाठीवर sacks आणि एक handbag..महाराजांचं नाव घेतलं आणि सुरूवात केली..short cut पूर्ण माती आणि खडकांचा..एक दगड रोवलेला तर  दुसरा ठिसूळ..एकदा तर माझा एक पाय सटकला तेव्हा 'हिरकणी' ची गोष्ट आठवली..श्वासही अडकल्यासारखा अनुभव आला..पण थोडं बसल्यावर बरं वाटलं..सचिन

26/11...

Image
  रोजच्या सारखाच दिवस उजाडला होता त्या सकाळी सुद्धा..अगदी नेहमीप्रमाणे  सुरू होणारा एक बुधवार..कुणाला ठाऊक होतं काय वाढून ठेवलंय पुढे? 26/11 ला आज 11 वर्ष लोटली असतील, गुन्हेगारांना शिक्षाही झाली असेल..मात्र वरून खपली धरलेली असली तरीही मनावरच्या जखमा अजूनही ओल्या च आहेत..    अलिकडे  निवृत्त वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री.रमेश महाले, 26/11 हल्ल्यांचे मुख्य तपास अधिकारी यांनी लिहिलेलं 'कसाब आणि मी' वाचलं..     26/11 चा भीषण नरसंहार, त्यामागचं कारस्थान, तपास, सूत्र, पुरावे, साक्षीदार ई सर्वकाही या पुस्तकात विस्तृत लिहिलंय..वास्तव खरोखरंच एवढं भयानक असू शकतं यावर विश्वास बसत नाही.     पोलीस म्हणजे सरकारी नोकर, दिलेलं काम तेवढं करणार असा आपला समज असतो..हे पुस्तक वाचून मात्र पोलीस खात्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला..     गुन्हा काय घडलाय, कुठे घडलाय याच्या कायदेशीर कारवाया जसं पोलीस करतात , तसंच गुन्हेगार, त्याची मानसिकता, गुन्ह्याकडे काय दृष्टीने पाहिलं पाहिजे, त्यानुसार तपास करणं ही महत्वाची कामगिरी सुद्धा पोलिसांना बजावावी लागते..         26 /11 नंतर तपासाचं काम  20-20 तास पोलि

गगन भरारी

Image
'Dream is not what you see in sleep, Dream is something which does not let you sleep..'  माजी राष्ट्रपती व जेष्ठ शास्त्रज्ञ भारत रत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे हे अनमोल शब्द...स्वत:चं आयुष्य आणि देशाचं भविष्य घडवण्याचा कानमंत्र म्हणून हे त्यांनी कायम जपलं.. त्यांच्या झोपेचा ताबा घेतलेलं एक स्वप्न म्हणजे भारतीय अंतराळ कार्याची (Indian space program) सुरुवात..भारताचं पहिलं रॉकेट अवकाशात झेप घेण्याच्या तयारीत होतं..डॉ.विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली त्रिवेंद्रम येथील थुंबा गावातील चर्च ची निवड करण्यात आली कारण शास्त्रीय दृष्ट्या हे ठिकाण पृथ्वीच्या विषुववृत्तावर (equator) होतं.. यासाठी चर्च च्या bishop महोदयांची परवानगी मागण्यासाठी ही जेष्ठ तज्ञ मंडळी गेली..नेमकं हो किंवा नाही मध्ये उत्तर देण्यापेक्षा बिशप महोदयांनी त्यांना रविवारी मास साठी येण्याचा आग्रह केला.. त्यावेळी बिशप जे म्हणाले ते केवळ वाचण्याजोगेच नव्हे तर जतन करण्याजोगे आहे..डॉ.कलाम यांच्या Ignited Minds:  Unleashing The Power Within India. या पुस्तकातला हा परिच्छेद.. My children, I have a famou

कल्हई

Image
काळ बदलला..माणसं बदलली..माणसांच्या गरजा बदलल्या...सोयीची संकल्पना सुद्धा बदलली..पर्याय उपलब्ध झाले.. अगदी दैनंदिन आयुष्यातल्या वस्तू पहा..स्वयंपाकघरातली भांडी..स्टील किंवा, अल्यूमिनियम ,प्लास्टिक, मेलामाईन ई. येण्यापूर्वी पितळ हा धातू सर्रास वापरला जात असे..किंवा मातीची, तांब्याची भांडी सुद्धा..आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही भांडी अतिशय योग्य असत..आणि मुळात तेव्हा पर्याय उपलब्धही नव्हते त्यामुळे या भांड्यांची निगा राखणं हे routine असायचं..त्यासाठी वेगळा वेळ काढायला लागायचा नाही.. या मधे पितळ्याच्या भांड्यांची कल्हई हे एक महत्वाचं काम..काल आमच्या सोसायटीत असेच एक कल्हईकार आलेले..कल्हई कशी करतात हे बघण्याची माझी पहिलीच वेळ.. कल्हई म्हणजे तांब्याच्या वा पितळेच्या भांड्यांना आतल्या बाजूने कथलाचा पातळ थर देण्याची प्रक्रिया आहे...या भांड्यात जास्त काळ ठेवलेला, विशेषतः आंबट पदार्थ भांड्याच्या धातूशी प्रक्रिया होउन खराब होऊ नये म्हणून त्याला कल्हई केली जाते..(सौजन्य : गूगल ) हे बघत असताना सुचलं, अशीच कल्हई आपण स्वत:ला सुद्धा करून घेण्याची गरज आहे का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. क

गुरूमंत्र

Image
एक गमंतशीर पण काही शिकवून गेलेला किस्सा..शिवायला दिलेला ड्रेस मिळायचा म्हणून मी टेलर कडे गेले..ड्रेस तयार होतच होता म्हणून टेलर ने मला 5 मिं बसायला सांगितलं.. तिची 2 वर्षांची छोटी मुलगी तिथेच खेळत होती..मी तिच्याशी गप्पा मारत बसले..बोबडं बोलत पण मोठ्या उत्साहात ती मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होती आणि मलाही प्रश्न विचारत होती..थोड्यावेळाने 'आँख माले' (तिच्या बोबड्या भाषेत 🤣🤣) या अलिकडे गाजलेल्या bollywood गाण्यावर तिने dance पण करून दाखवला..(मी dance teacher आहे कळल्यावर आया उत्साहात आपल्या मुलांना bollywood dance करून दाखवायला सांगतात 🤪🤪 त्या मुलांचा उत्साह पाहून मला बघावाच लागतो) Dance झाल्यावरही आमच्या गप्पा सुरू होत्या..तिने आपणहून मला विचारलं, "मावशी, तुझ्याकडे cat आहे का? (2 अडीच वर्षांच्या मुलीने मला मावशी म्हणणं मी समजू शकते, आणि सहनही करू शकते🤠🤠🤠) मी म्हटलं," नाही गं, cat नाही माझ्याकडे, तुझ्याकडे cat आहे का?" तिने नकारार्थी मान हलवली..आणि म्हणाली, माझ्याकडे भुभु आहे.." आणि तिथेच बाहेर बसलेल्या एका भटक्या कुत्र्याकडे तिने बोट दाख

आनंदाचे डोही आनंद तरंग

Image
काल देवळात गेले असता घडलेली ही गंमत.. 1 वर्षाचं बाळ आणि त्याची आई ,रोज देवळात येतात..नुकतीच चालायला लागलेली ही छोटीशी मुलगी, हिचं नाव जिजा, देऊळभर मोठ्या आनंदाने फिरत असते..सगळ्यांकडे पाहून गोड हसते.. माझ्याजवळ असलेली गाडीची किल्ली मी तिला देऊ केली..मोठ्या आनंदात ती दुडुदुडु धावत आली आणि किल्ली हातात घेऊन खेळू लागली.. त्यांची निघायची वेळ झाली तशी तिची आई तिला म्हणाली," जिजा, चला घरी आता..त्या 'ताई' ला दे बरं परत किल्ली.." तिने मला 'ताई' शब्दाने संबोधल्याची मला मोठी गंमत वाटली, 🤣🤣🤣🤣 पूर्वी hair dye ची एक जाहिरात लागायची, ज्यात त्या बाईला त्यांच्या ओळखीचा मुलगा तिचे पिकलेले केस पाहून aunty अशी हाक मारतो..आणि तो शब्द aunty aunty aunty असा तिच्या डोक्यात घुमत राहतो..🤣तो hair dye लावल्यानंतर मात्र तो मुलगा तिला hello didi असं म्हणतो.. लहानपणी 'ताई' , 'दीदी' हा शब्द इतक्यांदा ऐकलेला असतो आपण..पण काळाच्या ओघात, वय मोठं होत जातं तसं आणि नवीन नाती आयुष्यात येत जातात तसं आपण या 'ताई' शब्दापासून लांब जातो.. पूर्वी ताई म्हणणारी लहान मुलं,

संवाद

Image
काल, एका restaurant मधे गेले असता एक विलक्षण गोष्ट पहायला मिळाली..आम्ही आमच्या टेबलवर बसलेलो असताना, एक मोठा ग्रूप बाहेर थांबलेला..येणारे सगळे जमण्याची वाट पाहत होता..आम्ही किती जणं , कुठे बसायचं हे सगळं त्यांनी तिथल्या captain ला सांगितलं..हे सगळं ते करत असताना अगदी सहज त्यांच्यापैकी एकाकडे माझं लक्ष गेलं.. त्याने कानाला यंत्र लावलं होतं.. त्या गोष्टीचं अर्थातच मला काही विषेश वाटलं नाही कारण कुठल्याही वयाची लोकं कानात दोष असेल तर यंत्र वापरू शकतात. त्यांच्यापैकी सगळी मंडळी जमल्यावर ते आत येऊन बसले..8 जणांचा ग्रूप होता..ते अगदी माझ्या समोरच्याच टेबलवर असल्यामुळे माझं त्यांच्याकडे पुन्हा लक्ष गेलं..अजून एकीने सुद्धा तसंच, कानाला यंत्र लावलेलं..मग मात्र माझी उत्सुक्ता ताणली गेली.. मी एक एक करत सगळ्यांकडे बघू लागले..अर्थातच त्यांचं लक्ष नव्हतं.. ते सगळे वेगवेगळे हातवारे आणि ओठांच्या हालचाली करून एकमेकांशी संवाद साधत होते.. एवढ्या वेळाने लक्षात आलं की ते सगळे मुक-बधीर होते..मी थक्क होऊन त्यांच्याकडे बघत बसले..आपल्यालाही लाजवतील इतक्या उत्कृष्ट पद्धतीने ते एकमेकांशी बोलत होते..हो...बोलत

शोध

Image
आज सकाळी पुन्हा जोशी काकू भेटल्या...मी आधी त्यांच्याबदद्ल लिहिलंय, काही वाचकांना माहिती असेल की काकूंना Alzimer आजार आहे..घरात मुलगा आणि काकूच असतात..त्यामुळे मुलाला काय ते त्या ओळखतात..मुलीला पूर्णपणे विसरल्या आहेत.. आज आर्थातच नव्याने माझी आणि त्यांची ओळख झाली..पण काकू मोठ्या आनंदाने माझ्याशी बोलल्या..कदाचित गप्पा मारणं त्यांना खूप आवडत असावं..एखाद्या लहान मुलाबदद्ल आपण म्हणतो , याला ओळख लागत नाही, तसं जोशी काकूंचं झालंय..कशा आहात काकू? हा एवढा साधा प्रश्न विचारला तरी काकू मोठ्या आनंदाने बोलतात.. "आपण भेटलो, खूप बरं वाटलं.." गेल्यावेळे प्रमाणे काकू बोलत होत्या..     अशा दुर्धर आजाराला कुणालाही सामोरं जावं लागू नये. पण कल्पना करा, आपली सगळ्यांची 'वाईटाची' आठवण इथपतच असती तर..उदारणार्थ काल आपल्यात कडाक्याचं भांडण झालं , आपण ठरवलं, यापुढे एकमेकांच तोंड सुद्धा पहायचं नाही..आणि उद्या भेटलो तेव्हा यातलं काहीही आठवत नसेल आपल्याला..पुन्हा नव्याने संवाद सुरू...झालं गेलं सगळं काही आपण विसरून गेलोय..फक्त चांगल्या आठवणी ऊरल्या आपल्यापाशी..आणि पुन्हा जोमाने आपण एकत

कृतज्ञता

Image
आमच्या घरासमोरंच बंगल्याचं बांधकाम सुरू आहे..येता जाता तर नजर पडतेच त्यावर रोज पण आज तिथे सकाळी लहानग्यांना खेळताना पाहून काही आठवणी जाग्या झाल्या.. हे माझ्या लहानपणच्या दिवसांचं..आम्ही,म्हणजे आई-बाबा आणि मी, नुकतेच बदलापूरला नवीन घरात रहायला गेलो होतो..मी असेन पहिली-दुसरीत..जे flats तयार होते त्याचं possession दिलं गेलेलं..आम्हीच सोसायटीत पहिले रहायला येणारे..बाकी घरं अजून पूर्ण व्हायची होती.. दिवस शाळेत आणि अभ्यासात निघून जायचा..प्रश्न उरायचा संध्याकाळचा..कुणासोबत खेळू..माझ्या वयाचं आजुबाजुलाही कुणी दिसेना.. कशी ते आता आठवत नाही, पण माझी ओळख लक्ष्मीशी झाली..इमारती चं बांधकाम करणार्या लोकांपैकी एका कुटुंबातील ही मुलगी..माझ्याहून थोडी मोठी असावी..ती आणि तिचा लहान भाऊ दोघे खेळताना दिसायचे..कशी कुणास ठाऊक, मी सुद्धा त्यांच्या सोबत खेळायला लागले..आई बाबांनीही कधी मला आडवलं नाही..लक्ष्मी कधी कधी भातुकली खेळायला घरी सुद्दा येत असे.. माझे काही फ्रॉक्स आईने तिला वापरायला म्हणू दिलेले..ते घालून तिला माझ्यासोबत खेळायला खूप मजा यायची.. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मी आजोळी गेले, परत

पाऊस...

Image
पाऊस...या एका शब्दामधे किती काही भरून राहिलंय...नवी उम्मेद, नवा उत्साह..नवतेचा संबंध पावसाशीच जुळलेला.. पावसाळा हा एकमेव असा ऋतू आहे ज्याची सर्वच जीव आतुरतेने वाट बघत असतात... कधी तो न सांगता एकदम surprise द्यायला येतो..तर कधी आत्तासारखं..केव्हा पडेल याची उत्सुकता ताणून धरतो..तो लांबवर दिसणारा काळा ढग..तिथूनच उत्सुकता ताणली जाते.. पावसाशी वेगवेगळ्या वयाचं वेगवेगळं नातं आहे.. लहानपणी तर खासंच.. शाळेत असताना तर पावसाळ्याच्या दिवसात, जून महिन्यात शाळा सुरू व्हायची..पाऊस पडल्यामुळे मातीचा सुवास जसा हवा हवा वाटतो तसंच नवीन पुस्तकांचा, वह्यांचाही वास हवा हवासा वाटायचा..नवीन वर्गात, नवीन इयत्तेत..मित्र मैत्रिणी मात्र तेच हवे असायचे, यातच नवीन मित्रांची सुद्धा भर पडायची.. रेनकोट घालून पावसात सायकल चालवत , चिखल उडवत, थोडं भिजून, थोडं कोरडं राहून शाळेत पोहोचायला किती मजा यायची..घरातून निघताना एकटं, वाटेत मित्र मैत्रिणींचा टोळका भेटायचा आणि त्याच उत्साहात कधी शाळेत पोहोचलो कळाचं सुद्धा नाही..चालत गेलो, तरीही मजा, हळूच एखाद्या डबक्यात सगळ्यांनी उडी मारायची..तेव्हा कुठे स्वच्छ पाणी आणि घाण पाणी

मोलाचा धडा

परवा जोशी काकू भेटल्या..तशी ही माझी आणि त्यांची पहिलीच भेट..आमच्या स्वयंपाकीण बाई जोशी काकूंकडे काम करतात त्यामुळे त्यांच्याविषयी ऐकून होते..वरवर ठणठणीत वाटणार्या काकू, अल्जायमर च्या रुग्ण आहेत..दररोज काही तास सोबत राहणं, स्वयंपाक आणि काकूंना बाहेर फिरायला घेऊन जाणं हे आमच्या स्वयंपाकीण बाई छाया ताईंचं काम..आणि हे सगळं त्या अगदी प्रेमाने करतात.. परवा बाहेर फिरायला पडल्या असताना आमची भेट झाली..आमच्या घरावरून जात असताना छाया ताईंनी आमची ओळख करून दिली.. अतिशय प्रसन्न चेहर्याने जोशी काकू म्हणतात, किती छान नाव आहे तुमच्या बंगल्याचं 'शैलचंद्र'.. आजारी असल्यामुळे काकू संदर्भ सोडून बोलत होत्या..पण मधेच त्या असं काही छान बोलू लागल्या की त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकावं लागलं.. त्या बोलत होत्या..'अगं, आपण की नाही लोकांना गृहित धरतो, सगळ्यांशी कसं प्रेमाने बोल्लं पाहिजे..तुम्ही बरे आहात ना..खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, पुन्हा नक्की या आमच्याकडे असं म्हटलं पाहिजे..आपली पहिली भेट आठवणीत राहिली पाहिजे समोरच्या व्यक्तीच्या..हल्ली की नाही कुणी कुणाशी प्रेमाने बोलत नाही..सतत राग राग करतात ल

विवेकशून्यता

पक्षांसाठी पिण्याचे पाणी बहुतेक जणं ठेवतात..तेव्हा हे त्यांनी नक्की पाहिलं असणार..विशेषत: छोटे पक्षी त्या पाण्यात स्वत:ला बुचकळून आधी अंघोळ करतात आणि नंतर तेच पाणी चोचीने पीऊन उडून जातात. किती साधा सरळ विचार..हे काय दिसतंय..पाणी..याचा उपयोग कशासाठी.. अंघोळ करण्यासाठी आणि पिण्यासाठी.. मग हे पिण्याचं पाणी, यात अंघोळ कशी करणार हे असले प्रश्न पक्षांना कधी पढत नाहीत. माणूस ठरला विकसनशील! सतत विकासाच्या शोधात!..बौद्धिक विकास, आर्थिक विकास, सामाजिक विकास ही अशी माणसाची घोडदौड सुरू राहिली.. मात्र ही सर्व प्रगती होत असताना माणूस त्याच्या मूलभूत नैसर्गिक प्रेरणांपासून दूर जात राहिला आणि स्वत:चा विवेक व वास्तवाचं भान हरवून बसला. हे माझं, हे त्याचं, हा माझा, तो माझा नाही, या जास्तीच्या समजुती तयार झाल्या. नियम, कायदे माणसाने स्वत:च तयार केले, पण या जास्तीच्या 'अकलेमुळे' कायदेही तोच मोडायला लागला..आणि आश्चर्य म्हणजे असं करत असताना त्याला जराही लाज किंवा अपराधीपणाची भावना वाटली नाही, ना कधी पश्चात्ताप झाला. मीही माणूस, ज्याचं मी नुकसान करतो तोही माणूसच हा साधा विवेक तो हरवून बसला.. आणि याही