Posts

झोप आणि तिचे प्रकार..

Image
आज मराठी भाषा गौरव दिवस ..तेव्हा म्हटलं मराठीत तर आपण लिहितोच मग सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आज लिहावं...झोsssssपsss..कसं बरं वाटलं कि नाही वाचून..? या विषयावर लिहिण्याचा विचार येताच जांभया यायला लागल्या बघा. मला खात्री आहे ,वाचकांना सुद्धा हाच अनुभव शीर्षक वाचताच येऊ लागेल.. विचार केला तर काय कमालीचा प्रकार आहे ही झोप...!!! संपूर्ण निद्रिस्त व्हायचं , डोळे मिटायचे, संपूर्णपणे आपल्या विश्वात जायचं , सगळ्या जगाचा विसर पडू द्यायचा.    थेट काही एक वेळाने पूर्ण ताजं तवानं जागं व्हायचं. देवाने एवढं काही निर्माण करून ठेवलंय पण त्यापैकी सर्वात अद्भुत मला झोप वाटते. अजून एक म्हणजे ती निसर्गाचीच हाक म्हणायची इतर विधींप्रमाणे त्यामुळे ती सुद्धा कधीही येऊ शकते हे विशेष.     तर अशी ही झोप , हिचे प्रकार कुठले?याच्याही आधले मधले प्रकार असणार हे नक्की..     रात्रीची झोप: ही झोप आपण सर्वच घेतो. थोडक्यात आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे रात्रीची झोप. हल्लीच्या ट्रेंड प्रमाणे रात्री कितीही कुणी ओटिटी बघत बसलं तरी एका पॉईंट ला निद्रादेवी त...

चांदनी...

Image
  चंद्रला जितकं महत्व, तो जितका हवा हवासा तितकीच चांदणी..चंद्राकडे लक्ष गेलं आणि चांदणी कडे नाही असं होणार नाही. या चांदणी चं सुद्धा असंच होतं     चार वर्षांपूर्वी अचानक सकाळी बातमी येऊन धडकलेली, श्रीदेवी गेली ..आणि ती सुद्धा अशी विचित्रपणे..आणि इतक्या लौकर..वेळ आली की हे लौकर उशिरा म्हणण्याला काही अर्थ उरत नाही खरा, तरी श्रीदेवी गेली हे पचनीच पडेना तेव्हा.  तिची एक मुलाखत ऐकल्याचं आठवतंय. एकूण बालपण, शिक्षण ,अभिनयात पदार्पण असे नेहमीचे प्रश्न विचारले जात होते तिला. एक वाक्य ऐकून मात्र मी भारावून गेले. ती म्हणाली मी वयाच्या चौथ्या वर्षापासून सिनेमात काम करू लागले. शाळेत जायला कधी वेळ मिळाला नाही. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून डिग्री घेणं वगैरे काय असतं , शाळा कॉलेज काय असतं हे मला माहितीच नाही.  एका हॉटेलात आई वडिलांसोबत आली असता चार वर्षांचा या मुलीला कुणी एक दिग्दर्शक डान्स करताना बघतो काय, सिनेमासाठी तिला निवडतो काय..घरून तिला प्रोत्साहन मिळत काय.. बाल कलाकार म्हणून तिची सुरुवात होते काय..and the rest is history... अभिनय म्हणजे काय हे कळत नसल...

मृत्यूचा सोहळा

Image
  मृत्यू' या एकमेव शब्दापाशी आपलं आयुष्य घुटमळत असतं..जगण्याचा विचार किती करतो आपण? कमीच करतो खरं..मरणाचा विचार जास्त करतो. 'काही झालं तर?' हा विचार करणारी जमात एकीकडे तर 'काही होत नाही', असा परस्पर विरोधी विचार करणारे दुसरीकडे.. पण सगळ्याच्या मुळाशी एकच...मृत्यू... खरं तर जगणंच महाकठीण, मृत्यू सोपा..एका क्षणात सगळं थांबतं...जाणाऱ्यापाशी काही उरत नाहीच..आपण जातो.. ४ ओळखीतली माणसं येतात..सगळं उरकलं जातं ..सगळे घरी जातात... मात्र, मी काय काम केलंय याचा जेव्हा विसर पडतो तेव्हाच मृत्यू होतो. प्रश्न हा आहे की जाणारा काय देऊन गेलाय ..जे असं काही देऊन गेले आहेत, त्याचा मृत्यू हा दुःखद होऊच शकत नाही, कारण केवळ देह रुपानेच ते आपल्यात नसतात. इतरांचं 'जगणं' हे खरंच 'जगणं' व्हावं असं काहीतरी एखाद्या कडून त्याच्याही नकळत होतं..अशी अद्वितीय व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा त्यांच्या मृत्यूचा होतो तो सोहळा.. लता बाई निवर्तल्या..यावर अजूनही विश्वास बसत नाही. बसूच नये..कारण लता बाईंचा अजरामर ठेवा आपल्यापाशी आहे ..त्या स्वतः रित्या गेल्या...मात्र आपल्यासारख्यांच...

दवबिंदू....

Image
 दवबिंदूचं मला नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे. आपल्या लहानशा अस्तित्वाच्या काळात तो किती डौलात चमकत असतो ! दररोज एक नवा बिंदू चमकताना दिसला कि किती प्रसन्न वाटतं. आपणही असेच असतो तर? दवबिंदू आणि लहान मुलं ही मला एकसारखी वाटतात नेहमी.    मोठं होणं म्हणजे नेमकं काय? समजूतदार होणं ? समजूतदार झालो असं म्हटलं तर आपण आपल्या आणि सर्वांच्या आवडीचे झालो असतो नाही का? पण होतं नेमकं उलटं ..मोठं झाल्यावर आपण स्वतःला आणि इतरांना आवडेनासे होतो ..लहान असताना अगदी 'अले अले' करत गोंजारणारी माणसं ढिगाने असतात. पण मोठे झालो की ,म्हणजेच समजूतदार झालो की असं कुणीही गोंजारत नाही आपल्याला.. मोठ्या होण्यातला समजूतदारपणा हाच असला पाहिजे की आधी आपण स्वतःला आवडतोय का? लहान मूल स्वतः स्वतःचा आनंद घेत असतं ..म्हणूनच ते सगळ्यांनाच आवडतं ..त्याला काय आणि किती कळत असेल ? हा आपला बाप, ही आई , हा अमका हा ढमका ...पण सगळे अगदी पायघड्या घालायला तयार असतात त्याच्यासाठी..याचं खरं कारण , माफ करा थोडं पठडी सोडून लिहितेय, पण ते मूल कुणाला 'घंटा' विचारत नसतं ..मला झोप आली मी झोपणार, मला वाटेल तेव्हा जेव्...

5 मिनिटं..

Image
  लहानपणी मोठी गम्मत असते बरं ! मुलांचं आपलं आपलं वेगळं घड्याळ असतं. त्यांच्या परीने ते घड्याळ पुढे मागे करत असतात. पाच मिनिटांचा वेळ सुद्धा किती मजेशीर वेळ असतो लहानपणी..मला आठवतं शाळेसाठी आई मला सकाळी उठवायला यायची तेव्हा मी 5 मिं-5 मिं म्हणून अजून थोडी झोप काढायचे. पण ही 5 मिनिटं आईच्या भरोशावर असायची ..एवढा विश्वास तिच्यावर की ती 5 मिनिटांनी उठवायला नक्की येणार आणि आपल्याला शाळेला उशीर होणार नाही. आणि त्या शेवटच्या ५ मिनिटात जणू अवघ्या रात्रभराची झोप घेतल्याचं समाधान मिळायचं. विचार केला तर या 5 मिनिटांचं आजही तितकंच महत्व आहे की . अगदी आजही सकाळचा गजर वाजला की आपल्यापैकी 99 टक्के जणं तो snooze करून 5 मिनिटासाठी नक्की पुढे ढकलत असतात. काय होणार असतं असं या अजून 5 मिनिटांनी? पण ती शेवटचीच ५ मिनिटं जिवाभावाची वाटतात सगळ्यांना.  आपल्या जिवलगांना कितीही वेळ भेटलो, त्यांच्याशी कितीही वेळ गप्पा मारल्या तरी त्या शेवटच्या पाच मिनिटात गेल्या 5 तासांची कसर भरून निघते असं वाटतं . प्रियकर प्रेयसीची भेट,... अगदी तासंतास हातात हात घेऊन बसूनही अजून 5 मिनिटं थांबण्याचा लडिवाळ ह...

कहो ना..'आज भी'..प्यार है

Image
    14 जानेवरी 2000...जानेवरी महिना हा सर्वार्थाने आशावाद दाखवणारा महिना.. एकतर वर्षातला पहिला महिना..नवीन सुरुवात करायची उमेद आणि ऊर्जा देणारा म्हणून जानेवारी ओळखला जातो. बरं मग साल 2000 चं काय म्हणताय असं विचाराल मला.. तर हो ..१४ जानेवारी, साल 2000 या दिवशी हिंदी सिनेमा जगताला, थोडक्यात बॉलीवूड ला 'कहो ना प्यार है' सिनेमामुळे एक 'अजिंक्यतारा' मिळाला...हृतिक राकेश रोशन नावाचा.. म्हणून हा 2000 सालचा जानेवरी महिना खास! 'कहो ना प्यार है' आणि हृतिक रोशन या जणू एका नाण्याच्या 2 बाजू झाल्या..खान लोकांचं अधिराज्य असलेल्या बॉलीवूड मधे 6 फूट उंच, पिळदार शरीरयष्टी , घारे डोळे, चाफेकळी नाक व भन्नाट जाॅ लाईन असलेला एक तरुण पदार्पण करतो. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांचा नातू , दिग्दर्शक व अभिनेता राकेश रोशन यांचा मुलगा व सुप्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांचा पुतण्या या सगळ्या ओळखी जणू पुसल्या गेल्या आणि लक्षात राहिला तो फक्त हृतिक रोशन.   त्याच्या सोबत हिरोईन होती अमिषा पटेल..बॅरिस्टर रजनी पटेलांची नात बरं का ही! तशी उंचीने हृतिक पेक्षा खूपच बुटकी पण तिच्या चेहऱ्याच्...

'The wall'...on the wall...आणि मी...

Image
  किती जादुई असतात नाही ही छायाचित्र! जुने फोटो आपल्याला आठवणींच्या विश्वात चटकन घेऊन जातात..लाखो क्षण, मिनिटे , तास,  दिवस तसंच कित्येक वर्षांचा काळ झपकन पार करवून आपल्याला मागे घेऊन जाण्याची ताकद असते बरं फोटो मधे!..मला तर जुने फोटो बघणं stress buster वाटतं ..फोटो बघत बसलं की आपण आपोआप त्यात रमतो, वेळ चांगला जातो आणि या सगळ्यात आपला ताण कधी हलका होतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही.. एक असाच आठवणीतला फोटो सापडला ..इयत्ता ६ वीत असतानाच्या या माझ्या फोटोत अजून एक फोटो आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला लाभलेला एक अद्वितीय खेळाडू असा त्याचा उल्लेख केला तर निश्चितच वावगं ठरणार नाही...चायना कडे जरूर त्यांची ग्रेट वॉल असेल मात्र आमची the great Indian wall, Mr. Dependable म्हणजे राहुल द्रविड. क्रिकेट बद्दलचं माझं ज्ञान अतिसामान्याहूनही अतिसामान्य आहे, मात्र एवढं नक्की ठाऊक की test player ला glamour मिळवून दिलं ते राहुल द्रविड ने. या फोटो मागची आठवण मोठी मजेशीर आहे. साल होतं १९९८, नाशिक.. राहुल द्रविड चं जबरदस्त fan following होतं माझं ..द्रविडचे फोटो गोळा करणं हा आवडता छंद..आई आण...

ओढ

Image
'ओढ'.. शब्दातच काहीतरी वेगळं आहे. शब्द उच्चारला तरी आपल्यापाशी काहीतरी खेचलं जातंय असं वाटतं मला. गंमत कशी असते बघा, ओढ हे सर्वनाम म्हणून वापरलं तर तितकं परिणामकारक होणार नाही मात्र ' ती ओढ' असं नाम या अर्थी वापरलं की जणू दुधावर साय धरावी तसं काहीसं मलईदार , मऊसूद वाटतं. ओढ लागून राहिली कि नेमक्या काय भावना असतात बरं? ती व्यक्ती आणि आपण यामध्ये एक अदृश्य धागा असतो. दोहोबाजुंनी हे धागे मजबूत बांधलेले असतात.  मात्र ताणून कुणीच धरत नाही. कारण दोघांनाही माहिती असतं कि आपल्यामध्ये आहे तो मायेचा धागा, ज्यावर फक्त मायेचा पदर सरकवला तरी तो घट्ट होत जाणारे. त्यासाठी कुणी एकाने ताणायची गरज नाही.  बरं ही ओढ निर्जीव वस्तूंबद्दल सुद्धा वाटतेच की...जसं की आपलं आवडतं पुस्तक , आपली बॅग , आपली गाडी इ. माझ्या गाडीवर तर माझा इतका जीव आहे की येता जाता मी तिला थँक यू म्हणते ," बाई गं , तू आहेस म्हणून मी जवळची , लांबची अंतरं किती सहज पार करू शकते".. कधी कधी माझं मलाच हसू येतं याचं ,पण गाडी सर्व्हिसिंग ला गेली की ती घरी येईपर्यंत मला अगदी बेचैन होत राहतं . कधी एकदा गाडी ...

रणवीर..

Image
    पूर्वी सारखी रणक्षेत्र आता राहिली नाहीत..पण कार्यक्षेत्रांचा विस्तार मात्र होताना दिसतोय. प्रत्येक क्षेत्राची आता रणभूमीच झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तिथे एखादा 'रणवीर' च सातत्य टिकवतो. रणवीर सिंह भवनानी हा असाच एक वीर आहे असं म्हणावंसं वाटतं. हे लिहावंस वाटलं यामागे कारण म्हणजे अलिकडे पाहिलेला '83' हा चित्रपट . रणवीर पहिल्यांदा एखादी भूमिका उभी करतो ती नजरेतून. त्याचा चेहरा मेकअप लावून बदलतोच पण भूमिकेच्या खोलात शिरताना रणवीर डोळ्यातून अगदी भरभरून व्यक्त होत राहतो. कपिल देव उभा करताना प्रत्यक्ष कपिल देव यांची अनेकदा भेट घेऊन, त्यांची बोलण्याच्या , उठण्या-बसण्याच्या इ लकबी  त्याने पकडल्या आहेतच मात्र त्यांच्या डोळ्यांचा अभ्यासही अचूक केलाय हे समजतं. त्यामुळे चित्रपट पाहताना रणवीर बाजूला होऊन कपिल देव समोर उभे राहतात. स्वतः ४-५ तास दररोज क्रिकेट प्रॅक्टिस करणं , कमावलेलं शरीर उतरवून भूमिकेच्या जवळ आणणं या सगळ्या गोष्टींवर जीवापाड मेहनत रणवीर ने घेतलेली दिसून येते. कौतुक यासाठी करावंसं वाटलं की कपिल देवांची भेट घेणं शक्य असल्यामुळे या गोष्टी बऱ...

३१ डिसेंबर आणि आळंदी...

Image
  आळंदी ला जायचा योग इतक्या वर्षांनी काल आला. ज्ञानेश्वर माऊलींच्या सान्निध्यात जाणं हा विचारच किती भारावून टाकणारा आहे. 'ज्ञानेश्वरी' लिहून तरुण वयात संजीवन समाधी घेणाऱ्याला मनुष्य तरी कसं म्हणायचं? . ते साक्षात परमेश्वर च...माऊलींनी जन्म घेतला ते 'ज्ञानेश्वरी' निर्मितीच्या माध्यमातून जीवनमूल्य समजावून देण्यासाठी. हजारो वर्षांपूर्वी कृष्णपरमात्म्याने गीता सांगितली. माउलींनी , चंदन उगाळल्यावर त्यातला सुगंध बाहेर पडावा तसाच, गीतेतील सुगंध 'ज्ञानेश्वरी' म्हणून आपल्या समोर आणला.       आळंदी ला जात असताना हे सगळं मनात येत होतं . काल आळंदीत गर्दी म्हणावी अशी फार नव्हती. समाधीचं दर्शनहि मिळालं खरं पण काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं. समाधान वाटेना.    निघताना वाटलं इंद्रायणीला नमस्कार करावा, पाय बुडवावे आणि निघावं. नंतर जाणवलं की इंद्रायणीत पाय बुडवणं हा अनुभव नव्हे तर अनुभूती आहे. इतका वेळ जे राहून गेल्यासारखं वाटत होतं ते इथे गवसलं. इंद्रायणीत पाय बुडवले, डोळे मिटले आणि प्रत्यक्ष माऊलींना पदस्पर्श होतोय असं वाटलं.  दोन मीं सगळ्याचाच व...

रामदरा

Image
रोजच्या धावपळीतून थोडा बदल सगळ्यांना हवाच असतो . अशावेळी जेव्हा मोठ्या सुट्टीवर जाणं शक्य नसतं तेव्हा आपल्या आजूबाजूलाच इतकी सुंदर ठिकाणं लपलेली असतात याची आपल्याला कल्पनाही नसते. फेसबुक च्या माध्यमातूनच अशा  ठिकाणची माहिती मिळाली व आज याच निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा योग आला ते म्हणजे पुण्याहून अंदाजे ३० किमी वर असलेलं 'रामदरा' देवस्थान.    लोणीकाळभोर रस्त्यावर असलेलं हे मंदिर अतिशय शांत व आवर्जून भेट द्यावी असं आहे. वनवासात जायला निघाले असता प्रभू श्रीराम येथे वास्तव्याला होते असं म्हणतात. इथेच त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली. पुढे अनेक वर्षांनी उज्जैन च्या जुनादत्त आखाड्याचे  महंत देवीपुरी महाराज यांना दृष्टांत होऊन त्यांनी हे ठिकाण शोधलं व त्याचा जीर्णोद्धार केला. त्यांनी समाधी घेतल्यानंतर पुढे हे कार्य त्यांचे शिष्य मंगलपुरी महाराजांनी सुरु ठेवले. या दोघा महंतांच्या प्रतिमा इथे पहायला मिळतात.    रामनवमी किंवा महाशिवरात्री च्या उत्सवाचा काळ हा अर्थातच इथला गर्दी खेचणारा काळ. अन्यथा अतिशय निवांतपणे पोहचून दर्शन घेता येण्यासारखे आहे. तळ्याच्या म...

समतोल...   

Image
  "आम्ही पैसा नसेल कमावला पण आम्ही माणसं कमावली ..." आपल्या परिचयाच्या ज्येष्ठ पीढी चे प्रतिनिधी (आजोबा , आजी) बऱ्याचदा हे वाक्य म्हणतात. हा विषय अलीकडे घरातही निघाल्यामुळे माझी उजळणी झाली. मुळात या गोष्टी एकत्र होऊच नयेत का, असा प्रश्न , हे विधान ऐकल्यावर नेहमी पडतो. नशिबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालावायची तर आपल्या नशीबात जितका पैसा येणं आहे तितका आपोआप येणार. असं म्हटलं तर मग माणसांचही तसंच असलं पाहिजे. तसंच, आपण आपलं नशीब स्वतः घडवतो यावर ज्यांची श्रद्धा आहे ते म्हणतील कि आपल्या आयुष्यातील माणसं कोण व किती हे जसं आपण ठरवतो तसंच किती पैसे येणार हेही आपल्याच हातात आहे.  माणसं खरंच कमवता येतात का? जे कमवतो त्यावर आपला संपूर्ण अधिकार असतो. म्हणूनच आपण पैशांचा विनियोग करु शकतो. माणसं, अगदी दिवसाला एक या प्रमाणे जरी जोडली तरी माणसांवर आपला अधिकार नाही हे मुळात समजून घेण्याची गरज आहे. केवळ ती माणसं आपल्या नात्याची आहेत, परिचयाची आहेत का आपले मित्र आहेत म्हणून आपण अपेक्षा ठेवतो मात्र त्यांच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. पैसे आणि माणसं याला आपापलं महत्वाचं स्थान आहे. य...

तेज ब्रह्म

Image
  पहाटेचा कुंद गारवा, दुपारी जाणवणारा उकाडा आणि पुन्हा तिन्हीसांजे नंतर तोच गारवा . वातावरणात हा बदल जाणवायला लागला की समजायचं दिवाळी येऊ घातलीये. वातावरणात जसा हा बदल होतो तसाच बदल होतो तो वातावरणातल्या सुगंधांमध्ये . चकलीची भाजणी, बेसन पीठ तुपावर भाजल्याचा सुगंध असे एकापेक्षा एक सुगंध दरवळून वातावरण गंधमय होतं तसं खाद्यमय सुद्धा होतं. हा बदल फक्त दिवाळीतच बरं का? म्हणजे पुढे काय वाढून ठेवलंय हे आपण नकारात्मक अर्थाने वापरतो, पण दिवाळी जवळ आली कि हे सुगंध जणू खरंच 'पुढे काय वाढून ठेवलंय' याची वर्दी देतात. हे सगळं वाढलं जाणार असेल तर दिवाळीची ओढ लागलीच पाहिजे.  तर या दिवाळी मागची कथा अशी... भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर आक्रमण केलं. प्रहरभर युद्ध करून त्याला संपवला. दिवाळी चा हाच तो पहिला दिवस , नरक चतुर्दशी. नरकासुराने कैद केलेल्या सर्व स्त्रियांना श्रीकृष्णाने मुक्त केलं. त्या सर्वांना श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याची इच्छा होती. पणत्या हातात घेऊन त्या ओळीत उभ्या राहिल्या. या पणत्या म्हणजे 'दीप' आणि ओळीला म्हणायचं 'आवली'..यावरून दीपावली शब्द तयार झाला....

अनुबंध...

Image
    मला लहानपणी कुत्र्यांची खूप भीती वाटायची...गल्लीच्या त्या टोकाशी कुत्रा दिसला कि मी या टोकावरून मागे फिरायचे. आमच्या घराच्या अगदी जवळ एक खाद्यपदार्थांचं दुकान होतं . दूध, ब्रेड, अंडी इ काही आणायचं असेल की तिथून आणता यायचं. त्या मालकाकडे एक पाळीव कुत्रा होता . छान उंचा पुरा,...अत्यंत बोलके डोळे होते त्याचे. गंमत अशी व्हायची की दुकानात मी काही आणायला गेले आणि हा तिथे असला की माझी तंतरलेली असायची. तो तसा शांत कुत्रा होता,  ना कधी तो माझ्यावर भुंकला ना गुरगुरला . पण त्याला का मी आवडायचे त्यालाच ठाऊक. मी दिसले कि तो माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायचा. दुकान मालकाचं नाव जोसेफ. आम्ही त्याला जो काका म्हणायचो . मी कुत्र्याला घाबरते हे जो काकाला माहिती होतं म्हणून तो लक्ष ठेवून असायचा. मात्र मी दुकानातून निघाले की हा कुत्रा माझ्या मागे मागे घराच्या गेट पर्यंत यायचा. आणि इतका गपचूप यायचा कि मला कळायचं सुद्धा नाही . चालता चालता नजर मागे गेलीच तर लक्षात यायचं कि हे महाशय येतायत.      याचा अर्थ तेव्हा कळत नव्हता . वाटायचं हा मला का त्रास देतोय. का येतो माझ्या...

वेग..

Image
    अगदी ४ दिवसांपूर्वी घडलेली गोष्ट. सिग्नल ला गाडीवर पहिल्या रांगेत थांबले होते.  हिरवा दिवा लागल्यावर गाडी सुरु करून पुढे गेले. अर्थातच नुकताच pick up घेतल्यामुळे माझा वेग कमीच hota. क्रॉसिंग चे पट्टे ओलांडून पुढे जाते न जाते तो भरदाव वेगाने सिग्नल मोडून बाईक चालवत २ किरकोळ पोट्टी जोरात ओरडत समोरून पुढे आली. जणू काही आपणच बाईकचे जनक आणि पहिल्यांदा या जगात आपणच ती चालवतोय या आविर्भावात ती मुलं ओरडत होती. मी वेळेवर ब्रेक लावला नसता तर अर्थातच काय झालं असतं हे सांगायला नको. बरं माझी चूक नसतानाही त्यांनी मला शिवी घातलेली मला ऐकू आली. मात्र, अत्युच्च दर्जाच्या शिव्या येत असतानाही मी त्या हाणु शकले नाही. भरदाव वेगाने ती पोट्टी पुढे निघून गेली . त्यांचा पाठलाग करण्यातही अर्थ नव्हता. त्यांच्या बाईक च्या स्पीड ला माझी गाडी पळवणं म्हणजे कासवाला घोड्याच्या वेगाने पळ सांगण्यासारखं झालं असतं. काही सेकंद माझं अवसान गळालं, भीती वाटली हे मी कबूल करते. थोडी पुढे येऊन मी माझी दुचाकी थांबवली. दीर्घ श्वास घेतला. आपल्याला काहीही झालेलं नाही असं म्हणत स्वतःलाच धीर दिला. आपण काय ...