Posts

Kinetic, Yezdi आणि मी

Image
       त्या दिवशी सकाळी वेधशाळेचं जराही न ऐकता ऐन उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरही हवा चक्क गार होती. सकाळ तशी प्रसन्न असतेच नाही का? भारद्वाज पक्षाची जोडी खूप दिवसांनी बघायला मिळाली. भारद्वाज दिसला की शुभ शकुन असतो म्हणतात. लहान असताना मात्र दर रविवारी महाभारतात नितीश भारद्वाज दिसला की मस्त वाटायचं.      तर ...मनात असतं ते शब्द रुपात येतं. म्हणून भारद्वाज पक्षावरुन नितीश भारद्वाज आणि त्याच्यावरुन लहानपण असा सेतू बांधला. याला निमित्त झालं आमच्या समोर राहणारी 2 वर्षांची चिमुरडी आरोही. सकाळी सकाळी तिच्या बाबांनी दुचाकी बाहेर काढली की आरोहीची पुढे उभं राहून एक चक्कर ठरलेली. हा तिचा नित्यक्रम मी खूपदा बघते, पण आज का कुणास ठाऊक माझी लहानपणची आठवण जागी झाली.      मी लहान असताना माझ्या काकाकडे लाल रंगाची kinetic होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे रहायला जायचा दरवर्षीचा बेत. आठवडाभर आजी आजोबांबरोबर वेळ मजेत जायचाच पण रविवारचाही एक बेत ठरलेला असायचा..तो म्हणजे काकासोबत kinetic वरुन फिरणं. आठवडाभर काका व्यस्त असायचा, मात्र रविवारची विश्रांती...

ज्योत

Image
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः।।6.19।। श्रीमद् भगवद्गीतेतील हा श्लोक....याचा अर्थ असा की निवा-यातील दिव्याची ज्योत जशी स्थिर असते तसेच चित्त, आत्मयोगाचे अनुष्ठान केलेल्या योगी मनुष्यास लागू पडते..    हा श्लोक वाचला आणि देवघरातील त्या दिव्याच्या ज्योतीकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकले...रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस देवघरात जाऊन दिवा लावणं आणि परवचा म्हणणं हा आपल्या सर्वांचाच नित्यक्रम. माझे आजोबा अजूनही दिवे लागण झाली (घरातली tube सुरु केली ही खूण) की आधी बसल्या जागी हात जोडून नमस्कार करतात..    रोज सकाळी सूर्य उगवतो तसा प्रकाश सर्वत्र पसरतो..एक नवीन दिवस आपल्याला मिळाला..जग स्वच्छ सूर्य प्रकाशात उजळून निघालं..उठा जागे व्हा..नवी सुरुवात करा..असं सांगणारा हा प्रकाश..विजेचा शोध लागला नव्हता तोपर्यंत सकाळचा सूर्यप्रकाश हा दिवसाचा, तर देवघरातील दिवा हा रात्रीचे साक्षीदार होते..   सकाळचा सूर्यप्रकाश जसा बहिर्मुख करणारा तसा या नंदादीपाचा प्रकाश अंतर्मुख करणारा..दिवसभर मनुष्य या ना त्या मार्गाने क...

माझी 'अद्भुत' चित्रकला

Image
 शीर्षक वाचून वाटेल आज आपला चित्रकलेचा तास दिसतोय...छे ओ!... चित्रकलेचा आणि माझा सुतराम संबंध नाही.. आणि हे वाचून आश्चर्य वाटण्यासारखं काहिही नाही..मी भरतनाट्यम नृत्यांगना किंवा नृत्य शिक्षिका आहे म्हणून मला चित्रकलाही येते असं असण्याचं अजिबात कारण नाही.. खरं तर काही वर्षांपूर्वीपर्यंत, म्हणजे जो पर्यंत सक्तीने चित्र काढावी लागत असंत तोपर्यंत तर चित्रकला हा माझा अत्यंत नावडता विषय होता..सक्ती म्हणजे शाळेत असतानाचा काळ ओ! गणित जितका माझा हाडवैर असलेला विषय त्याहून थोडं कमी वैर माझं चित्रकलेशी होतं..'मांसवैर' म्हणता येईल...हो..कारण गणिताचं वैर माझ्या हाडांपर्यंत जाऊन रुतत असे (अजूनही रुततं) तिथे चित्रकलेचं वैर हे मांसापर्यंतच जात असे..असं का याचं सर्वात मोठं कारण हे की मला चित्र काढता नाही आलं तरी माझी all rounder आई ते काढत असे..आणि तुला चित्र कसं गं येत नाही काढता? अशा शिव्या मला खाव्या लागत नसत..जे गणिताबाबत नव्हतं..अहो कौलारु घर काढायचं म्हटलं तरी मला फुटपट्टी लागायची हे पाहिल्यावर खरं तर कूणीही कपाळावर हात मारुन घेईल..या सगळ्यामुळे का काय माझी चित्रकलेची वही ब-या...

गजर

Image
गजर...      'विठू चा गजर' जसा हवा हवासा वाटणारा, तसाच हा आपल्याला दररोज न चुकता ऐकवा लागणारा पण नकोसा वाटणारा तो घड्याळाचा गजर..      हे लिहिताना सुद्धा माझ्या कपाळावरती आठ्या उमटल्या..कारण गजर म्हणताच माझ्या डोळ्यासमोर येतं ते चावी द्यावं लागणारं ते जुनं गजराचं घड्याळ..या घड्याळाची गणना बहुतेक आता पुरातन वस्तुंमधेच होत असावी इतकं ते दुर्लभ झालेलं आहे.. पण मी लहान असताना हे घड्याळ आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होतं..सकाळी याच्या कर्कश्श आवाजाने आमच्या सारख्या अनेकांचा दिवस सुरु व्हायचा..सहसा हा वाजलाच नाही असं व्हायचं नाही..पण कधी झालंच..तर उठायला उशीर, आईच्या डब्याला उशीर, बाबांची अमुक वाजून अमुक मिंटांची गाडी चुकायची, शाळेसाठी मला आवरायला उशीर, अशा घडामोडी घडायच्या.. पण सर्वात वैताग यायचा तो त्या गजराच्या कर्कश्श आवाजाचा..जणू काही आपल्या कानापाशी येऊन एखाद्द्या पिशच्चाने बोंबलावं, " ए ऊठ नालायक, लाज नाही वाटत झोपून रहायला?.. खूप झाली झोप!"... अशा थाटात तो गजर व्हायचा की आपण खडबडून जागे झालो नाही तरंच नवल..साधारण अर्धा मिनीट हा असा गजर रोज व्हायचा..आमच्...

क्षण

Image
     खूप महिन्यांनी आखेर व्यायामशाळा उघडली...इतक्या महिन्यांची व्यायामाची विस्कटलेली घडी पुन्हा बसायला सुरुवात झाली..सकाळचं वेळापत्रक मार्गी लागलं तसं, त्या वेळी भेटणारी माणसंही पुन्हा दिसायला लागली..व्यायाम शाळेत येणा-यांशी जशी आपली ओळख होते, तसेच सकाळी आसपास फिरायला येणारे चेहरे सुद्धा ओळखीचे होतात..पार्क केलेली गाडी काढताना नावाने ओळख होत नसली तरी smile मुळे नक्की होत असते..रोजची smile हाच संवाद असतो..हां, सद्ध्या त्या करंट्या मास्कने माणसाचं स्मित मोकळेपणाने समोरच्या पर्यंत पोहोचवण्याची इच्छाच मारून टाकली आहे तो भाग निराळा..त्या मेल्या कोरोना बरोबर हा चिकटलेला मास्कही जळून भस्म होवोत अशीच प्रार्थना केली पाहिजे.. अशाच एका आजोबांशी माझी 'स्मित ओळख'...मध्य्म उंचीचे..साधारण 80 वय असलेले, हातात काठी आणि लोकरीची माकड टोपी घातलेले, अंगावर शर्ट पँट पण जरा मळलेले..त्यावरून त्यांची परिस्थिती फारशी बरी नसावी हे जाणवतं.. हे आजोबा मला नेहमी gym वरून निघालं की फिरताना दिसतात..ब-याचदा माझी निघायची आणि त्यांची तिथे फिरायला यायची एकच वेळ.. एकदा मी माझी गाडी काढून निघत असता...

डोळे

Image
    काय विलक्षण अवयव मिळावा हा आपल्याला....केवळ जादू..बंद असताना सुद्धा स्वप्न दाखवतो आणि उघडे असताना सुद्धा..काहिही न बोलता आपल्याला व्यक्त होण्याची सूट देतो..प्रेम..राग...अशा परस्पर विरोधी भावना सुद्धा हा आपला जादुई अवयव समोरच्या पर्यंत अगदी सहजगत्या पोहोचवत असतो..दु:ख आणि आनंदाश्रु वाहून आपल्याला मन  मोकळं करता येतं ते डोळ्यांतूनच..मेंदू पासून अगदी जवळ असलेले डोळे जणू आपला दुसरा मेंदूच..बेशुद्ध अवस्थेतला रूग्ण डोळे कधी उघडतो याकडे जास्तं लक्ष दिलं जातं..डोळे उघडले म्हणजे हरपलेलं भान ठिकाणावर आलं म्हणतात..     दिवसाचे अमुक एक तास आपल्या कोषात जाण्याची सोय सुद्धा आपल्या डोळ्यांनी केलिये बरं!..ध्यान करताना किंवा अगदी निद्रेत असताना सुद्धा डोळे मिटल्यावर आपण काही काळ 'एकांतात' जातो..आजुबाजुला कितीही कल्लोळ असो..स्वत:ला दुरुस्त करण्याची व पारखण्याची संधी या मिटलेल्या डोळ्यांमुळे रोज मिळत असते..जग जसं उघड्या डोळ्यांनी  पाहता येतं तसं बंद डोळ्यांनीही. त्याच्यावरचं मनन चिंतन हा त्यामागचा हेतू..     अलिकडे मी डोळे तपासायला गेले. खूप वर्षात तपासले नव्हते...

न जाणलेले भगतसिंह

Image
दिनांक 28 सप्टेंबर 1907...शहीद भगत सिंह संधू  यांचा जन्मदिवस..आपण भगत सिंह , सुखदेव आणि राजगुरु या महावीरांची आठवण काढतो आणि त्यांना वंदन करतो ते 23 मार्च 1931 साठी..ज्या ऐतिहासिक दिवशी हे तिघे वीर पुरुष हसत हसत, भारतासाठी फासावर चढून शहीद झाले. पण आज भगत सिंह यांच्या जन्मदिनी त्यांच्या बद्दल लिहावंसं वाटलं ते वेगळ्या कारणासाठी.. "शेतात बंदूक पेरली तर त्यातून हजार बंदुका उगवतील"...लहानग्या भगत चे हे विचार.. भारत देशाप्रति असलेला श्रद्धा व समर्पण भाव, आपल्या देशावर असलेलं नितांत प्रेम आणि देशाला सशस्त्र क्रांतीतून स्वातंत्र्य मिळावं हे रक्तातंच असलेलं भगत सिंह नावाचं हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होतं. देशासाठी आपलं घरदार सोडण्यापासून ते पंडित चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान सोशलिस्ट रीपब्लिकन असोसिएशन ची स्थापना होईपर्यंतचा मोठा काळ भगत सिंह यांनी पाहिला.. या सगळ्या दरम्यान अनेक घडामोडी घडत गेल्या.. रिकाम्या पोटी काहिही काम करणं जिथे अशक्य असतं तिथे पोटाला चिमटा लावून , वेळप्रसंगी 8-8 दिवस उपासमार करून, भगत सिंह आणि त्यांचे साथीदार लढत राहिले ते भारत भूमी स्वतंत्र ...

अशोक...

Image
   नाही..सम्राट अशोकांबद्दल हा लेख नाही..😀सम्राट अशोकां सारखा हा अशोक पराक्रमी राजा वगैरे नाही तरी, हा जितका मला विलक्षण वाटतो तितकाच, पुढे वाचल्यानंतर तुम्हालाही विलक्षण वाटेल या बद्दल खात्री आहे..    तर, हा अशोक म्हणजे आमच्या घरी स्वयंपाक करणा-या छाया ताईंचा मोठा मुलगा..इथे मी मुद्दाम इंग्रजी शब्दाचा प्रयोग आधी करतेय कारण तोच शब्द जास्तं साजेसा आहे..अशोक हा special child आहे..मराठीत ज्यासाठी 'मतीमंद' असा सहज शब्द वापरला जातो..पण माझ्या दृष्टीने अशोक हा एक विलक्षण मुलगा आहे.    आज अशोकचं वय 19-20 वर्षांच्या आसपास असेल..तसा अशोकला भेटण्याचा योग एक दोनदाच आलाय..खूप ओळख नसलेल्यांसमोर अशोक जरा बुजरा आहे. पण त्याचा विषय निघाला की छाया ताईंकडून नेहमी जे जे ऐकलं त्याने मी थक्क होत आलेले आहे..छाया ताई स्वयंपाक काम करतात तर त्यांचे यजमान छत्री इ वस्तुंची दुरुस्ती ची कामं करतात..रोजचा ठरलेला दिनक्रम..तेव्हा अशोक साठी वेगळा वेळ देणं कुणालाही शक्य नव्हतं..तरीही त्यांनी अशोकचं केलेलं संगोपन आणि त्याच्यावर केलेले संस्कार हे वाखाणण्याजोगे आहेत..सुदैवाने अशोक...

लहानपण देगा देवा

Image
       आज जर का कुणी विचारलं की लहान असतानाचं काय miss करतेस सर्वात जास्तं? तर मी म्हणेन लहानपणंच miss करते.    मनुष्य प्राण्याचे लहानपण इतर प्राण्यांच्या तुलनेमधे सर्वात मोठं आहे. नंतरही माणसं लहान असल्यासारखी वागतात तो भाग निराळा..🤣🤣    काय आणि किती आठवावं लहानपणचं? मला आठवतंय आमच्या घरात मला प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे लाडाची नावं ठेवलेली..आजी म्हणायची, ठकू..तर काका म्हणायचा चन्नु मुन्नु 😀बाबा म्हणायचे शहाणू तर आई म्हणायची गुंडू...    बालपणाचा काळ ही खरंच मला ईश्वरी देणगी वाटते..आपण न सांगता मिळालेला खाऊ..surprise gifts..रात्री असू तिथे झोप आली तरी सकाळी जादू झाल्याप्रमाणे आपण आपल्या पलंगावर सापडायचो..कुणाच्या कडेवर बसायला कधी भिती नाही वाटली की कुणाच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसायचं tension आलं नाही..मित्र मैत्रिणींशी तासंतास खेळताना कधी आपल्याला आमक्या आमक्या 'रोगाची' लागण होईल हे डोक्यात तरी आलेलं का? तासंतास उनात खेळा..लोळा धडपडा पण आपण असं केलं तर आपल्याला त्रास होईल अशी शंकाही नव्हती..मिळालेल्या वस्तु व्यवस्थ...

हरे कृष्ण...

Image
    रविवार सकाळ सगळ्यांसाठी खास नाही का? शाळेत जाणारी मुलं असो किंवा मोठी माणसं..उद्या रविवार हे माहिती असल्यावरंच निम्मा खूश होतो माणुस..हा असा एक दिवस आहे की ज्या दिवशी आपल्यावर घडाळ्याचं वर्चस्व नसतं..       माझी शाळा कायम सकाळची..त्यामुळे रात्री लौकर झोपा..सकाळी लौकर उठा हेच रोजचं चक्र..असं आसल्यामुळेच मला रविवारी थोडं उशीरा उठण्याची मुभा होती..मात्र तरी ,माझा रविवारचा एक गजर होता..टी.व्ही  वर "कृष्णाssssss" असं ऐकू आलं रे आलं की मी उठायचेच...श्री रामानंद सागर कृत "श्रीकृष्ण" तेव्हा दर रविवारी सकाळी 9 वाजता दूरदर्शन वर लागायची..यात एक श्रीकृष्ण भेटायचा तर त्यानंतर 10 वाजता सुरु होणा-या श्री.बी.आर.चोप्रा यांच्या 'महाभारतात' भेटायचा तोही श्रीकृष्णच..       बालवयात मनावर गारूड घालणा-या या दोन मालिका आजही तितक्याच प्रभावी ठरतात म्हणजे बघा! पण त्या लहान वयात इतर पात्र किती समजत असतील ठाऊक नाही पण मनात घर करतात ते भगवान श्रीकृष्ण..ते परमेश्वर आहेत..शाश्वत आहेत..तरी ते मनुष्य रूपात अवतरले आहेत. म्हणूनच मनुष्य जन्माच्या मर्यादा बंधनं ...

पाहुणा

Image
 आमच्या घरच्या बागेत झाडं पुष्कळ..वावरायला भरपूर जागा..मांजरं-लहान मोठे पक्षी-फुलपाखरं हे आमच्याकडे रोज येणारे पाहुणे..खरं तर त्यांना पाहुणे म्हणणं चुकीचंच..हे अवघं विश्व त्यांचं घर..त्यांनी केव्हाही आणि कुठेही मुक्त विहार करावा..अगदी मनमुराद..   साधारण वर्षा दीड वर्षा पूर्वीची गोष्ट..माझे नृत्य वर्ग घरातच तळ मजल्याला..अगदी बागेला आणि अंगणाला लागून..येण्याजाण्याला तसं बंधन नाही..नेहमेप्रमाणे मुलींचा वर्ग सुरू होता..तेवढ्यात बाहेरून कणी चालत असल्याचा आवाज आला आणि अचानक समोर देव प्रकट व्हावा तसं बाहेरुन टुणकन उडी मारून एक मांजरीचं पिल्लू आत आलं..आम्ही सगळ्या..मी आणि माझ्या विद्यार्थिनी क्षणभर दचकलो..पण ते छोटंसं गोंडस पिल्लू पाहताक्षणी त्याच्या प्रेमात पडलो..आवाजाची दिशा हेरत हे पिल्लू आत आलं होतं..अजिबात न घाबरता जणू काही जन्मो जन्मीचा संबंध असावा असं ते आमच्यापाशी आलं..माझ्या सगळ्या विद्यार्थिनी प्राणी प्रेमी..त्यामुळे कुणालाही,  त्या न कळवता आलेल्या पाहुण्याचा त्रास नाही झाला..(न कळवता येणा-या पाहुण्यांचा अनुभव सगळ्यांना असेलच)उलटं क्लास राहिला बाजुला आणि या पिल्लामागेच ...

साधना ताई आणि 'समिधा'

Image
    साधारण 18 वर्षांपूर्वीची गोष्ट..माझे वय वर्ष 14..इयत्ता नव्वीत..त्या वेळी माझे बाबा नागपूर येथे नोकरी निमित्त कार्यरत होते..दिवाळीच्या सुट्टीत मी आणि आई नागपुर ला गेलो..ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांनी वरोरा येथे वसवलेल्या आनंदवन ला भेट द्यायची माझ्या बाबांना खूप इच्छा होती. थेट संबंध नसला तरी वाचनाच्या माध्यमातून आणि त्या आधीपासून गेली अनेक वर्ष माझे आजोबा, बाबा आनंदवन ला जमतील तशा फूल ना फुलाची पाकळी स्वरूप देणग्या नक्की पाठवत असत..आणि त्याचा अभिप्राय म्हणून डॉ.विकास आमटे यांच्या सुरेख हस्ताक्षरातले पत्र आजोबांना येत असे..आमच्याकडे सुद्धा अभिप्राय म्हणून आनंदवनातून तेथील रहिवासियांनी हाताने तयार केलेले भेट कार्ड येत असे..   अशा या सुंदरशा आनंदवन ला भेट देण्याचे आमचे नक्की ठरले..एका स्नेह्यांच्या ओळखीने वार्तालाप करून एक रात्र राहण्याची सोयही तिथेच  झाली..आई-बाबा आणि मी, बस ने आनंदवन ला पोहोचलो..राहण्याच्या ठिकाणी सामान ठेवल्यावर एका स्थानिकाने आनंदवन शी आमचा परिचय करून दिला..रुग्णालयं..वेगवेगळे प्रकल्प, शेती, टाकाऊतून टिकाऊ ते अगदी भूकंपापसून...

मोबाईल फोन उवाssच

Image
    हॅलोss ....हो..आज मी म्हणतोय हॅलो...एरवी तुम्ही सगळे म्हणता ना मला उचलल्यावर..म्हणून म्हटलं आज आपणंही म्हणून बघावं कसं वाटतंय..ओळखलंत का नाही मला..? हो हो तोच मी...जो कधी एके काळी बांधलेला असायचो आता मोकाट असतो..अहो तोच ओ..ज्याच्याशिवाय तुम्ही सद्ध्या जगू शकत नाही..सकाळी उठल्या उठल्याही मी लागतो आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा मीच लागतो..हां..आता बरोबर ओळखलंत..तुमचा जिवाभावाचा मोबाईल फोन मी..    मला फारंच भारी वाटतं बुवा..खरं तर मी एक वस्तू..ज्याला तुम्हीच निर्माण केलंत..पण आज माज मी करतोय की!!! हल्ली बघावं त्याच्या हातात मीच आणि माझे सख्खे चुलत भाऊच सगळे..अहो म्हणजे..मी जर samsung चा फोन तर ..redmi ..one plus 7 आणि आमच्यात सर्वात श्रीमंत चुलता म्हणजे i phone...सगळीकडे मी आणि माझे चुलतेच... आम्हीच राज्य करतोय..बरं त्या माझ्या सावत्र भावंडांबद्दल नाही बोलत मी..desktop, laptop, tab..तसं आमचं जमतं पण तरी फारसा contact नसतो त्यांच्याशी..अहो का काय? मी रोज तुमच्या बरोबर..उठता आणि खिशात घालता..ही सावत्र भावंड नेहमीच असतात तुमच्यासोबत असं नाही ना..आणि असली तरी माझ्याशिव...

दहावीतलं 'lockdown'

Image
    खरं तर लोकहो..दहावी या विषयावर एक आद्य ग्रंथ लिहिता येऊ शकेल नाही का? म्हणजे आपलं मूल 10 वीत गेलं की कुणी कुणी कसं कसं वागावं, मुलांनी काय करावं..स्वत: आई वडिलांनी कसं वागावं..आजी आजोबांनी कसं वागावं..मित्र-मैत्रिणींनी कसं वागवं ते अगदी शेजा-यांनी सुद्धा कसं वागावं..     अगदी 9 व्वी पर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं असतं..अचानक 10 वी ला गेलं की काय माशी शिंकते देव जाणे..सर्वात मोठं पाऊल म्हणजे केबल बंद करणे..म्हणजे एवढी वर्ष टीव्ही बघूनही चांगली पास होणारी मुलं अचानक 10 वी च्या वर्षाला गेल्यावरंच काय ते टीव्ही पाहून नेमके नापास होतील अशी भोळसट (का बावळट म्हणतात ते) समजूत आई बाबांची असते..इथे बसतो पहिला घाव..     मग येतो दुसरा.."ती खेळायला येणार नाहिये तिला अभ्यास आहे"..किंवा 'अहो काकू, जरा टीव्ही चा आवाज कमी करता का? माझा मुलगा अभ्यास करतोय"..असं शेजा-यांना सांगायचं..अहो अभ्यासासारखं काहितरी असतंच की आपल्याला 1 ली ते 9 वी..ते करतो आपण आणि पास होतो दर वर्षी..मग आत्ताच खेळण्याचा वेळ तेवढा कमी झाला की कसा काय अभ्यास होणार बरं..?    ...

कुकर

Image
   आज सकाळी चहा घेत बसले होते..गॅस वर कुकर लावला होता..हा कुकर माझ्या सासुबाईंचा अत्यंत लाडका..20 एक वर्ष तर नक्कीच झाली असतील त्याला..बरोबर आहे..आपण आपल्या कष्टाने घेतलेल्या वस्तू किंवा भेट म्हणून मिळालेली वस्तू जपून वापरतोच..वय झाल्यावर जसे म्हाता-या माणसांचे दात त्यांना अच्छा करतात तसंच या कुकर चे स्क्रु एक एक करून याला टाटा करत करत साश्रू नयनांनी निरोपही देतात..पण घरात वापरायला दुसरा कुकर असला तरी हा कुकर सासूबाईंना प्राणांहून प्रिय आणि म्हणूनच डॉक्टर जसा रुग्णाला वाचवायचे आटोकाट प्रयत्न करतात तसेच प्रयत्न माझ्या सासूबाई या कुकर ला वाचवण्यासाठी करत असतात..त्याचे स्क्रु पुन्हा पुन्हा बसवून आणतात..वाफ धरत नसली की रिंग बदलतात..नाही नाही..चुकलं..बसवून आणायला सांगतात ..कुणाला? अहो असं काय करताय..'क्षणाचा सवंगडी आणि अनंतकाळचा गडी'...ओळखलं असेलंच तुम्ही.. नवरा..    आणि माझे सासरे अगदी निमुटपणाने दर वेळी तितक्याच उत्साहाने कुकर दुरुस्त करून आणतात..माझ्या मनात नेहमी विचार येतो..एकदा तरी सासरे वैतागले असतील..की नाही बाबा मी नाही जाणार..नवीन कुकर आणू आपण आता..पण कसं काय दे...