श्री स्वामी समर्थ..
2019 सालची गोष्ट ..आम्ही दोघांनी अक्कलकोट ला जायचं ठरवलं . एरवीच्या वेळापत्रकात आमच्या एकूण व्यवसायाचं स्वरूप बघता वर्षभरात जमलं नाही म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत जायचं ठरलं . आमच्या घरी कशेळीकरांकडे स्वामींवर सगळ्यांची श्रद्धा, विशेषतः माझ्या आजीची .त्यामुळे माझं नाव अक्कलकोट ला जाऊन ठेवावं अशी आजीची इच्छा होती. महिनाभराची असताना मला अक्कलकोट ला घेऊन जाऊन नाव ठेवलंय असं आई सांगते. त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी माझा अक्कलकोट ला जाण्याचा योग 2019 च्या मे महिन्यात आला. भर उकाड्यात जाण्याचा बेत ठरलेला खरा पण प्रत्यक्ष अक्कलकोट ला जाऊन दर्शन घेण्याच्या इच्छेपुढे उकाडा तो कसला. सकाळी लौकर आवरून आम्ही दोघे, आमच्या चार चाकीतून निघालो. प्रवास एकूण छान सुरु झालेला. सोलापूर रस्त्याला लागलो तशी गाड्यांची रांग लागलेली दिसली. पुढे कुठेतरी तेल सांडल्यामुळे जबरदस्त अपघात झाला होता. एकूणच घडलेला प्रकार लक्षात आला . गाडी हळू हळू , कासव गतीने पुढे ढकलत होतो . या मागे बसण्यात काहीही अर्थ नव्हता हे एकूण लक्षात आलं. ठरल्याप्रमाणे अक्कलकोट ला पोहोचायचं असेल तर इथून बाहेर पडलं पाहि...