Posts

रिक्त

Image
     या बद्दल लिहिण्यापूर्वी स्क्रीन कडे टक लावून खूप वेळ पाहत होते..अर्थातच विषयामुळे..      'रिक्त'..'रिकामं'..यावर शब्द मांडले गेले की हा कॅन्व्हास भरून जाणार. मग रिक्तपणाचं महत्व उरेल का? पण शांतपणे विचार केला की या रिक्तपणाची गरज जाणवेल..त्याचं वेगळं स्थान उमगेल..      एक कोरा कागद आपल्या समोर ठेवला आणि विचारलं की यावर तुम्हाला काय दिसतंय?..काय असेल आपलं स्वाभाविक उत्तर?..की यावर काहिही दिसत नाही..मात्र त्यावर एक लहानसा बिंदू जरी काढला की आपलं सगळं लक्ष त्या बिंदू कडे आकर्षित होतं..एवढं मोठं रिक्त पटल, त्याचं अप्रूप वाटत नाही..पण आपण हे विसरून जातो की तो कागद रिकामा,म्हणून तो त्या बिंदूला सामावून घेतोय..या साठी ते पटल, तो कॅनव्हास कोरा असायला नको का? पण उत्तर देताना मात्र त्या भल्या मोठ्या रिक्त जागेला आपण विषेश महत्व देत नाही.      शांतता सुद्धा अशीच..जिथे आधी शांततेचा रिक्तपणा, तिथेच आवाजाचे महत्व..जिथे आवाज आहे तिथेच आपण जाऊन अजून आवाज मिसळला तर गोंगाटच होणार..      अर्थात सगळीकडे रिक्तपणा असणं 'महाग...

राजे शिवछत्रपती यांस.....

Image
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसुनो: शिवस्यैषा मुद्राभद्राय राजते।। आदरणीय राजे शिवछत्रपती,                         साष्टांग दंडवत🙏...          राजे, आज आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आपणास हे पत्र लिहावेसे वाटले..आपण महाराष्ट्रात जन्म घेतलात हे आमचे केवढे मोठे भाग्य..आपल्या आदरणीय माता-पित्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न आपण साकार केलेत..महाराष्ट्राला मोकळा श्वास घ्यायला शिकवलात आपण..जे आपल्या हक्काचं त्यासाठी लढलंच पाहिजे पण अचूक योजना, नियोजन करून हा दंडक कित्येक वर्षांपूर्वी आपण घालून दिलात...गावोगावी जाऊन जनमानसात मिसळून आपण माणसांना स्वराज्यात जोडलेत..      जात, पात, धर्म, वर्ण याच्या पलिकडे जाऊन आपण 'माणूस' मोठा केलात..केवळ स्वराज्य स्थापन केले नाहीत तर ते फुलवले आणि कणखर बनवलेत..      आपण आणि आपल्या सर्व शूर सैनिकांनी रक्त सांडले म्हणून आज आम्ही हा आजचा महाराष्ट्र पाहू शकलो..      पाहू शकलो हे खरं..पण आपण रुजवलेली मूल्य टिकव...

'भाकरी

Image
    'भाकरी' म्हणताच डोळ्यांपुढे उभी राहते ती मोठ्या आकाराची, पापुद्रे सूटलेली गोलाकार वाफाळलेली भाकरी..     खरंतर 'भाकरी' या शब्दाशी अनेक पैलू निगडित आहेत..उदारणार्थ सौभाग्य, असा शब्द वाचला की त्याचे पैलू येतात...मंगळसुत्र, लाल कुंकू, हिरवा चुडा, जोडवी ई. अगदी तसंच भाकरी म्हटलं की डोळ्यापुढे येते ती चूल, तवा , ठेचा, लोणी, झुणका, पालेभाजी..ई...ज्या प्रमाणे एखाद्या सौभाग्यवतीला पाहिल्यावर तिची दृष्ट काढावीशी वाटेल, त्या प्रमाणेच असा सुंदर थाट असतो भाकरीचा की ती खायची इच्छा पूर्ण करण्यापूर्वी आदराने आधी आपोपाप त्यासमोर नतमस्तक होवू...     आता पूर्वीसारख्या चुली राहिल्या नाहीत आपल्याकडे, तसंच स्वत: शेतात राबून ज्वारी बाजरी पिकवणं किंवा जात्यावर दळणं हे सुद्धा आता नाही.. पण भाकरी करायची पद्धत मात्र वर्षानुवर्ष अबाधित आहे..     या प्रक्रियेतील कलात्मकता मला कायम आकर्षून घेते..पीठ मळणं, खरंतर हाताच्या तळव्याचा वापर करून घोटून घेणं..त्यामुळे शरीरातील उर्जा पीठ शोषून घेतं..आपल्यातलं 'असणं' हेच जणू त्या भाकरीत ओढलं जातं..भाकरी थापणं म्हणजे आईने बाळाला ज...

विसावा

Image
अलिकडेच हे सुंदर छायाचित्र पाहिलं..छायाचित्रकार धृतिमान मुखर्जी यांनी टिपलेला सुरेख क्षण.. विसाव्याचा...समुद्रात बगळ्यासारखा दिसणारा एक पक्षी (Naazca Booby) एका कासवावर विसावलाय आणि त्या कासवाच्या खाली लहानगे मासे छताखाली थांबल्याप्रमाणे विसावलेत..कदाचित त्या बगळ्यापासून संरक्षण व्हावं म्हणून लपलेत..   कलाकार म्हणून श्री.मुखर्जी यांची कमालंच केली आहे..त्यांनाही असा क्षण समुद्रात पहिल्यांदाच पहायला मिळाला असं ते लिहितात..    त्या कासवाला कल्पनाही नाही की आपल्या नकळत आपण कुणाला तरी आसरा दिला..कुणाचा तरी विसावा बनलो.. 'विसावा'..शब्दातच किती शांतता आहे..एखाद्यावर विसावणं..एखाद्यावर हवाला असणं..निश्चिंत असणं की ती व्यक्ती आहे आपल्यापाशी..विश्वास असणं त्यावर पूर्ण..मी आश्रय मागितला तरी ही व्यक्ती नाकारणार नाही..आपल्याला यापासून काहिही धोका नाही..     आता हे कासवंच बघा..त्यावर बसलेला पक्षी आणि त्याखाली थांबलेले मासे दोघांच्या मनात याच भावना आहेत की याच्या सोबत आपण सुरक्षित आहोत..     सगळ्यांनी आठवून पहा..अशी एक तरी व्यक्ती असेलच आपल्या आयुष्यात..अशा लोक...

वाढदिवस

Image
किती गमतिशीर शब्द आहे हा..'वाढदिवस'..वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण एकमेकांना.. खरं तर हा आपला जन्म दिन म्हणून त्याची आठवण काढून आपण एक दिवस स्वत:ला साजरं करतो..तसं बघायला गेलं तर  वाढदिवस म्हणजे आयुष्यातून एक दिवस वजा..मग का बरं साजरा करायचा हा दिवस? वाढदिवस असा शब्द का बरं? काय वाढतं? फक्त वय? ते तर नैसर्गिक झालं..देवाच्या कृपेने आपण त्या दिवशी जीवंत असतो म्हणून आपण म्हणू शकतो की वय एका वर्षाने वाढलं.. मग विचार याचा करायला हवा की वाढायला काय हवं..?   वाढायला हवी ती प्रगल्भता..सकारात्मक विचार करायची..विचार मंथन करायची..आत्मपरीक्षण करायची..थोडक्यात स्वत:चं audit करायची..मानसिक, शारीरिक आणि आर्थिकही..   आणि हे सगळं केलं तरंच पुढला वाढदिवस..पुढली वाढ..पुढली प्रगल्भता साधता येणार..   एक एक वर्षाचं contract च केलं तर स्वत:शी? म्हणजे बघा हां..आपण सगळ्या पातळ्यांवर खरे उतरतोय का असा report तयार करायचा..कुठे कमी पडलो त्याची वेगळी यादी करायची आणि या वर्षात त्यावर काम करू असं आश्वस्त करायचं स्वत:ला..किती मजा येईल बघा..   कशाला कुणाशी स्पर्धा करा..आपली प्रगती ...

एकांत

Image
 प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा... 'एकांत'...आपल्याला कितीही मित्र असले तरी या मित्रा सारखा कुणी नाही..सततच्या गलक्यात..गर्दीतून मग ती विचारांची असो किंवा माणसांची..त्यापासून लांब जाऊन या मित्राला कधी भेटता येतंय याची आपण आतुरटेने वाट पाहत असतो..  एकटेपणा आणि एकांत यात खूप फरक आहे बरं का..एकटेपणा कंटाळवाणा असतो तर एकांताची आपल्याला गरज असते..एकांतात माणुस आत्मपरीक्षण करू शकतो..आपली कृती..आपले विचार पारखून बघू शकतो..म्हणूनच हा एकांत नावाचा मित्र भेटला की त्याच्याशी आपण मोकळा संवाद साधू शकतो..   हा आपल्याला माहिती असलेला अर्थ..तोही तितकाच महत्वाचा..आज या शब्दाचा खरा अर्थ वाचला..'एक' म्हणजे आपण..'मी'...या 'मी' ची आपल्याला जाणीवही नसते जेव्हा आपण जन्म घेतो..नंतर आपल्याला एक नाव दिले जाते..आपल्यावर संस्कार घडतात..आणि आपण जे काही करतो त्याला आपण म्हणतो हे 'मी' केले..आणि याचे रूपांतर अहंपणात होते..आपण हे विसरून जातो की इथे या निर्गुण निराकारची सत्ता..त्याच्या समोर आपण फक्त एक घटक..   हा अहंभाव असलेला 'मी' 'एक'...त्याचा अंत होणे म्हणजे...

शिवथर घळ

Image
गडांचा राजा 'रायगड' पाहून दुस-या दिवशी खाली आलो..येताना ropeway चा वापर केला..तेवढाच हाही अनुभव मिळावा..अवघ्या 4 मिंटात खाली..विज्ञानाची खरंच कमाल आहे..अर्थात गड चढून जाण्याप्रमाणे उतरून येण्याची मजा वेगळीच..पण पुढलं destination लौकर गाठता यावं यासाठी वेळ वाचावा हा प्रयत्न..   अलिकडे श्री सद्गुरू यांचा एक छान विचार वाचला..त्यांच्याच श्ब्दात इथे लिहिते..'Do not go in search of a Guru...when the pain of ignorance within you becomes a scream,  a Guru will come in search of you'...    थोडक्यात गुरू भेट घडते ती योग्यवेळ आल्यावर..अशाच योग्य समयी महाराजांना भेटले ,ते त्यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी.. 1653 च्या सुमारास वरंधा घाटातील शिवथर येथील एका काळोख्या गुहेत कुबडीवर रेलून..दीपप्रकाशात एक अत्यंत तेजस्वी सत्पुरूष कर्मयोगाचे तत्वज्ञान ओवीबद्ध करण्यात मग्न झाले होते...समर्थ रामदास स्वामी!! त्यांच्या कठोर साधनेतून 'दासबोध' याच शिवथरघळीत उदयास आले..      'शिवथरघळ' हेच ठिकाण समर्थांनी का निवडले असा एक संदर्भ काही दिवसांपूर्वी वाचण्यात आला..तो असा की ही जगा...

दुर्गराज

Image
'रायगड'...'गडांचा राजा, राजांचा गड'.. अशी ही मायभूमी 'रायगड' आपले आराध्य राजे शिवछत्रपतींची राजधानी पाहण्याचा बेत ठरला..गडावरंच रहाण्याची सोय झालीच होती.. आधी राजमाता जाजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले..मात्र गड चढून जाण्याचा विचारही शिवला नव्हता..आपण आपलं ropeway मार्गी जाऊया म्हटलं..त्यानुसार थोडंफार सामान घेऊन निघालो..रविवार असल्यमुळे ropeway ला 6 तास waiting..काय करावं सुचेना इतक्यात एक बोरं विकणा-या आजी भेटल्या..म्हणाल्या अहो कुठे थांबता..जा चढत...2 तासात पोहोचाल..या मी shortcut दाखवते..500 पाय-या वाचवते..(ही बहुदा त्यांची tag line असावी..जाता येता सगळ्यांना हेच सांगत होत्या)   थोडा विचार केला..म्हटलं आपल्या workout चा उपयोग करून घेण्याची हीच ती वेळ...पायात sports shoes नसले तरी floaters होते..पाठीवर sacks आणि एक handbag..महाराजांचं नाव घेतलं आणि सुरूवात केली..short cut पूर्ण माती आणि खडकांचा..एक दगड रोवलेला तर  दुसरा ठिसूळ..एकदा तर माझा एक पाय सटकला तेव्हा 'हिरकणी' ची गोष्ट आठवली..श्वासही अडकल्यासारखा अनुभव आला..पण थोडं बसल्यावर बरं वाटलं..सचिन ...

26/11...

Image
  रोजच्या सारखाच दिवस उजाडला होता त्या सकाळी सुद्धा..अगदी नेहमीप्रमाणे  सुरू होणारा एक बुधवार..कुणाला ठाऊक होतं काय वाढून ठेवलंय पुढे? 26/11 ला आज 11 वर्ष लोटली असतील, गुन्हेगारांना शिक्षाही झाली असेल..मात्र वरून खपली धरलेली असली तरीही मनावरच्या जखमा अजूनही ओल्या च आहेत..    अलिकडे  निवृत्त वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री.रमेश महाले, 26/11 हल्ल्यांचे मुख्य तपास अधिकारी यांनी लिहिलेलं 'कसाब आणि मी' वाचलं..     26/11 चा भीषण नरसंहार, त्यामागचं कारस्थान, तपास, सूत्र, पुरावे, साक्षीदार ई सर्वकाही या पुस्तकात विस्तृत लिहिलंय..वास्तव खरोखरंच एवढं भयानक असू शकतं यावर विश्वास बसत नाही.     पोलीस म्हणजे सरकारी नोकर, दिलेलं काम तेवढं करणार असा आपला समज असतो..हे पुस्तक वाचून मात्र पोलीस खात्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला..     गुन्हा काय घडलाय, कुठे घडलाय याच्या कायदेशीर कारवाया जसं पोलीस करतात , तसंच गुन्हेगार, त्याची मानसिकता, गुन्ह्याकडे काय दृष्टीने पाहिलं पाहिजे, त्यानुसार तपास करणं ही महत्वाची कामगिरी सुद्धा पोलिसांना बजावावी लागते.. ...

गगन भरारी

Image
'Dream is not what you see in sleep, Dream is something which does not let you sleep..'  माजी राष्ट्रपती व जेष्ठ शास्त्रज्ञ भारत रत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे हे अनमोल शब्द...स्वत:चं आयुष्य आणि देशाचं भविष्य घडवण्याचा कानमंत्र म्हणून हे त्यांनी कायम जपलं.. त्यांच्या झोपेचा ताबा घेतलेलं एक स्वप्न म्हणजे भारतीय अंतराळ कार्याची (Indian space program) सुरुवात..भारताचं पहिलं रॉकेट अवकाशात झेप घेण्याच्या तयारीत होतं..डॉ.विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली त्रिवेंद्रम येथील थुंबा गावातील चर्च ची निवड करण्यात आली कारण शास्त्रीय दृष्ट्या हे ठिकाण पृथ्वीच्या विषुववृत्तावर (equator) होतं.. यासाठी चर्च च्या bishop महोदयांची परवानगी मागण्यासाठी ही जेष्ठ तज्ञ मंडळी गेली..नेमकं हो किंवा नाही मध्ये उत्तर देण्यापेक्षा बिशप महोदयांनी त्यांना रविवारी मास साठी येण्याचा आग्रह केला.. त्यावेळी बिशप जे म्हणाले ते केवळ वाचण्याजोगेच नव्हे तर जतन करण्याजोगे आहे..डॉ.कलाम यांच्या Ignited Minds:  Unleashing The Power Within India. या पुस्तकातला हा परिच्छेद.. My children, I have a famo...

कल्हई

Image
काळ बदलला..माणसं बदलली..माणसांच्या गरजा बदलल्या...सोयीची संकल्पना सुद्धा बदलली..पर्याय उपलब्ध झाले.. अगदी दैनंदिन आयुष्यातल्या वस्तू पहा..स्वयंपाकघरातली भांडी..स्टील किंवा, अल्यूमिनियम ,प्लास्टिक, मेलामाईन ई. येण्यापूर्वी पितळ हा धातू सर्रास वापरला जात असे..किंवा मातीची, तांब्याची भांडी सुद्धा..आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही भांडी अतिशय योग्य असत..आणि मुळात तेव्हा पर्याय उपलब्धही नव्हते त्यामुळे या भांड्यांची निगा राखणं हे routine असायचं..त्यासाठी वेगळा वेळ काढायला लागायचा नाही.. या मधे पितळ्याच्या भांड्यांची कल्हई हे एक महत्वाचं काम..काल आमच्या सोसायटीत असेच एक कल्हईकार आलेले..कल्हई कशी करतात हे बघण्याची माझी पहिलीच वेळ.. कल्हई म्हणजे तांब्याच्या वा पितळेच्या भांड्यांना आतल्या बाजूने कथलाचा पातळ थर देण्याची प्रक्रिया आहे...या भांड्यात जास्त काळ ठेवलेला, विशेषतः आंबट पदार्थ भांड्याच्या धातूशी प्रक्रिया होउन खराब होऊ नये म्हणून त्याला कल्हई केली जाते..(सौजन्य : गूगल ) हे बघत असताना सुचलं, अशीच कल्हई आपण स्वत:ला सुद्धा करून घेण्याची गरज आहे का? याचा...

गुरूमंत्र

Image
एक गमंतशीर पण काही शिकवून गेलेला किस्सा..शिवायला दिलेला ड्रेस मिळायचा म्हणून मी टेलर कडे गेले..ड्रेस तयार होतच होता म्हणून टेलर ने मला 5 मिं बसायला सांगितलं.. तिची 2 वर्षांची छोटी मुलगी तिथेच खेळत होती..मी तिच्याशी गप्पा मारत बसले..बोबडं बोलत पण मोठ्या उत्साहात ती मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होती आणि मलाही प्रश्न विचारत होती..थोड्यावेळाने 'आँख माले' (तिच्या बोबड्या भाषेत 🤣🤣) या अलिकडे गाजलेल्या bollywood गाण्यावर तिने dance पण करून दाखवला..(मी dance teacher आहे कळल्यावर आया उत्साहात आपल्या मुलांना bollywood dance करून दाखवायला सांगतात 🤪🤪 त्या मुलांचा उत्साह पाहून मला बघावाच लागतो) Dance झाल्यावरही आमच्या गप्पा सुरू होत्या..तिने आपणहून मला विचारलं, "मावशी, तुझ्याकडे cat आहे का? (2 अडीच वर्षांच्या मुलीने मला मावशी म्हणणं मी समजू शकते, आणि सहनही करू शकते🤠🤠🤠) मी म्हटलं," नाही गं, cat नाही माझ्याकडे, तुझ्याकडे cat आहे का?" तिने नकारार्थी मान हलवली..आणि म्हणाली, माझ्याकडे भुभु आहे.." आणि तिथेच बाहेर बसलेल्या एका भटक्या कुत्र्याकडे तिने बोट दाख...

आनंदाचे डोही आनंद तरंग

Image
काल देवळात गेले असता घडलेली ही गंमत.. 1 वर्षाचं बाळ आणि त्याची आई ,रोज देवळात येतात..नुकतीच चालायला लागलेली ही छोटीशी मुलगी, हिचं नाव जिजा, देऊळभर मोठ्या आनंदाने फिरत असते..सगळ्यांकडे पाहून गोड हसते.. माझ्याजवळ असलेली गाडीची किल्ली मी तिला देऊ केली..मोठ्या आनंदात ती दुडुदुडु धावत आली आणि किल्ली हातात घेऊन खेळू लागली.. त्यांची निघायची वेळ झाली तशी तिची आई तिला म्हणाली," जिजा, चला घरी आता..त्या 'ताई' ला दे बरं परत किल्ली.." तिने मला 'ताई' शब्दाने संबोधल्याची मला मोठी गंमत वाटली, 🤣🤣🤣🤣 पूर्वी hair dye ची एक जाहिरात लागायची, ज्यात त्या बाईला त्यांच्या ओळखीचा मुलगा तिचे पिकलेले केस पाहून aunty अशी हाक मारतो..आणि तो शब्द aunty aunty aunty असा तिच्या डोक्यात घुमत राहतो..🤣तो hair dye लावल्यानंतर मात्र तो मुलगा तिला hello didi असं म्हणतो.. लहानपणी 'ताई' , 'दीदी' हा शब्द इतक्यांदा ऐकलेला असतो आपण..पण काळाच्या ओघात, वय मोठं होत जातं तसं आणि नवीन नाती आयुष्यात येत जातात तसं आपण या 'ताई' शब्दापासून लांब जातो.. पूर्वी ताई म्हणणारी लहान मुलं,...

संवाद

Image
काल, एका restaurant मधे गेले असता एक विलक्षण गोष्ट पहायला मिळाली..आम्ही आमच्या टेबलवर बसलेलो असताना, एक मोठा ग्रूप बाहेर थांबलेला..येणारे सगळे जमण्याची वाट पाहत होता..आम्ही किती जणं , कुठे बसायचं हे सगळं त्यांनी तिथल्या captain ला सांगितलं..हे सगळं ते करत असताना अगदी सहज त्यांच्यापैकी एकाकडे माझं लक्ष गेलं.. त्याने कानाला यंत्र लावलं होतं.. त्या गोष्टीचं अर्थातच मला काही विषेश वाटलं नाही कारण कुठल्याही वयाची लोकं कानात दोष असेल तर यंत्र वापरू शकतात. त्यांच्यापैकी सगळी मंडळी जमल्यावर ते आत येऊन बसले..8 जणांचा ग्रूप होता..ते अगदी माझ्या समोरच्याच टेबलवर असल्यामुळे माझं त्यांच्याकडे पुन्हा लक्ष गेलं..अजून एकीने सुद्धा तसंच, कानाला यंत्र लावलेलं..मग मात्र माझी उत्सुक्ता ताणली गेली.. मी एक एक करत सगळ्यांकडे बघू लागले..अर्थातच त्यांचं लक्ष नव्हतं.. ते सगळे वेगवेगळे हातवारे आणि ओठांच्या हालचाली करून एकमेकांशी संवाद साधत होते.. एवढ्या वेळाने लक्षात आलं की ते सगळे मुक-बधीर होते..मी थक्क होऊन त्यांच्याकडे बघत बसले..आपल्यालाही लाजवतील इतक्या उत्कृष्ट पद्धतीने ते एकमेकांशी बोलत होते..हो...बोलत...

शोध

Image
आज सकाळी पुन्हा जोशी काकू भेटल्या...मी आधी त्यांच्याबदद्ल लिहिलंय, काही वाचकांना माहिती असेल की काकूंना Alzimer आजार आहे..घरात मुलगा आणि काकूच असतात..त्यामुळे मुलाला काय ते त्या ओळखतात..मुलीला पूर्णपणे विसरल्या आहेत.. आज आर्थातच नव्याने माझी आणि त्यांची ओळख झाली..पण काकू मोठ्या आनंदाने माझ्याशी बोलल्या..कदाचित गप्पा मारणं त्यांना खूप आवडत असावं..एखाद्या लहान मुलाबदद्ल आपण म्हणतो , याला ओळख लागत नाही, तसं जोशी काकूंचं झालंय..कशा आहात काकू? हा एवढा साधा प्रश्न विचारला तरी काकू मोठ्या आनंदाने बोलतात.. "आपण भेटलो, खूप बरं वाटलं.." गेल्यावेळे प्रमाणे काकू बोलत होत्या..     अशा दुर्धर आजाराला कुणालाही सामोरं जावं लागू नये. पण कल्पना करा, आपली सगळ्यांची 'वाईटाची' आठवण इथपतच असती तर..उदारणार्थ काल आपल्यात कडाक्याचं भांडण झालं , आपण ठरवलं, यापुढे एकमेकांच तोंड सुद्धा पहायचं नाही..आणि उद्या भेटलो तेव्हा यातलं काहीही आठवत नसेल आपल्याला..पुन्हा नव्याने संवाद सुरू...झालं गेलं सगळं काही आपण विसरून गेलोय..फक्त चांगल्या आठवणी ऊरल्या आपल्यापाशी..आणि पुन्हा जोमाने आपण एकत...