Posts

प्रिय बूझो

Image
    आज बरोबर 5 वर्ष झाली तू आमच्यात नसून..5 वर्ष..म्हटलं तर मोठा काळ..पण एक तो दिवस आहे आणि एक आजचा दिवस..तुझी आठवण आली नाही असं झालंच नाही कधी..या निमित्ताने तुला हे प्रेमाचं पत्र..      तशी मी कुत्र्यांना घाबरणारीच बरं का? त्या टोकाला कुत्रा दिसला की या टोकावरून मागे फिरणारी..आता मात्र वाटतं, का नाही भिती घालवायचा प्रयत्न केला मी आधी?..जगातल्या सर्वात सुंदर प्रेमाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न का नाही केला कधी?      लग्ना अगोदर मी इथे घरी यायचे तेव्हा मी दिसल्या दिसल्या तू इतका भुंकायचास की मी गेट उघडून आत यायलाही घाबरायचे..तेव्हा वाटलंही नव्हतं की पुढे तू माझा खास दोस्त होशील..      2006 साली जेव्हा तुला सचिन ने घरी आणलं तेव्हा आम्ही कॉलेज च्या दुस-या वर्षाला होतो..दोन अडीच महिन्यांचा होतास तू..छोटासा.. मस्तीखोर..घरभर फिरायचास..खुर्चीवर चढून बसायचास..या गमती जमती कळायच्या मला आणि हे सगळं मी miss केल्याचं वाईटंही वाटायचं..      आमचं लग्न ठरल्यावर एक गोष्ट माझे बाबा मला नेहमी सांगायचे..बूझो जेव्हा तुला accept करेल ते...

प्रेरणास्रोत...

Image
  गणित विषयाशी माझी गट्टी जमली नाही ती नाहीच कधी..बेरीज, वजापाकी, गुणाकार, भागाकार, पाढे पाठ करणं हे सगळं मी शाळेत असताना केलं ते केवळ नाइलाज म्हणून ..नावडता विषय तर तो होताच माझा पण मला भिती होती गणिताची..phobia..म्हणजे लोकांना उंचीचा phobia असतो..अंधाराचा असतो..तसा मला गणिताचा..माझ्या मनाने हे ठरवलेलं असायचं की बास हे आपल्याला येणार नाही..एखादं गणित सोडवायला पहिली step काय इथेच मुळात डोकं चालत नसे..भिती मुळे मी गणिताचा अभ्यास तसा नावडीनेच करायचे..पण डोक्यात घुसतंय का हे बघायचेच नाही..आणि ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी मला काहिही येत नाही या भितीने भोकाड पसरायचे..मग आई ची थोडी बोलणी खायची..ती समजावेल तितकं समजून घ्यायचं आणि पेपर द्यायचा..आईच्या प्रयत्नांमुळे मी गणितात कधी नापासही झाले नाही किंवा काठावर pass ही झाले नाही..खूप भारी नसले तरी ok marks मिळायचे..गेल्याजन्मी काय पापं केली आणि गणित विषय या जन्मात भेटला असं नेहमी वाटायचं मला..     पण या सगळ्याला छेद दिला तो पाचवीच्या वर्षाने..आईने माझ्यापुढे हात टेकले आणि मला गणिताचा क्लास लावला...मुळात जो विषय मला आवडत नाही त्य...

फणस

Image
    निसर्गाच्या किमयेतील मला ठाऊक असलेला हा आविष्कार की जो खरं तर फळ आहे का भाजी हे कोडंच कधी उलगडलेलं नाही..    प्रथिनं , खनीजं , कर्बोदकं या आणि अशा अनेक पोषण मूल्यांचा खजीना फणसात आहेच..शिवाय झाड म्हणूनही फणस उपयुक्त..फणसाच्या लाकडाला वाळवी लागत नसल्यामुळे फर्निचर साठी याचा भरपूर वापर होतो..गराचा भाग सोडल्यास उरलेला 55 ते 65% भाग हा प्राण्यांसाठी खाद्य म्हणूण उपयोगाला येतो..    वा..काय कमाल आहे निसर्गाची..म्हणजे बघा हां..तसं फणस हे स्वयंभू झाड..अपोआप रुजतं ..आपोआप वाढतं ...स्वत: स्वत:ला बहरवतं..तसा maintainence काहीच नाही..आणि असं सगळं असूनही या फणसाचं कोडं उलगडंत नाही..ज्यांना भाजीतून आनंद मिळतो अशांसाठी तो भाजीच्या रुपात समोर येतो..ज्यांना गरे किंवा साटं आवडतात त्यांच्यासाठी तो फळ म्हणून प्रकटतो..आणि एवढं सगळं असूनही हे असं का याचं उत्तर आपल्याकडे नाही.    माणसांचं पण असंच असतं का? आपण म्हणतो ना  "हा माणुस काही बुवा आपल्याला अजून समजत नाही..". म्हणजे पाहिलं तर त्याचं सगळं वागणं बोलणं उघड उघड असतं..मनमिळावू असतो..चार लोकांप्रमाण...

संधी

Image
   या अशा परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागेल असं कुणाला कधीही वाटलं नसेल..पूर्वी साथीचे रोग यायचे. मात्र औषधोपचाराअभावी आणि पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यात लोकांना जीव गमवावा लागायचा असं फक्त ऐकलेलं..    पण आज विज्ञानाची एवढी प्रगती झालेली असताना सुद्धा 2020 मधे आपल्याला या संकटाला तोंड द्यावं लागतंय..."छे ओ, पूर्वी रोगांची साथ यायची..तेव्हा मरायचे लोक..आता असं होत नाही" या आपल्या over confidence ला एक सणसणीत चपराक निसर्गाने दिली..    एवढंच नव्हे तर 'मी मोठा तू लहान'..'माझा देश छान' 'तुझा नाही'..आम्ही जास्तं भारी तुम्ही नाही वगैरे सगळ्यावरून आपण धाडकन खाली आपटलो आहोत..आज अक्खं जग locked down आहे..कुणाचं जास्तं आर्थिक नुकसान झालंय तर कुणाचं कमी..पण नुकसान सगळ्यांचं झालंय हे नक्की..आज आपल्या जाती धर्मांचे फक्त कागद उरलेत..कुणी हिंदू नाही, मुसल्मान नाही, मराठा नाही.. आपण फक्त आणि फक्त भारतीय आहोत..    आज आपण सगळे एकाच बोटीतले प्रवासी झालेलो आहोत..बोट बुडण्याच्या मार्गावर असताना ती वाचावी या करता सहप्रवासी म्हणून आपल्याला ज...

Good vibes only

Image
  10 वर्षांपूर्वी चं चक्र पुन्हा फिरलं..तेव्हा स्वाइन फ्लू  आणि आत्ता कोरोना...सद्ध्या कोरोना व्हायरस ला जितकी publicity मिळते आहे तितकी क्वचितच कुणा जिवाला मिळाली असेल पृथ्वीतलावर..हो..तो सुद्धा जीवच शेवटी..तो म्हणत असेल की आता आलोय त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे..जसा एखादा परदेशी पाहुणा इथे आला की म्हणेल..मिम्स म्हणू नका..जोक म्हणू नका...animations म्हणू नका..आणि असे काही साथीचे रोग आले आपल्या इथे की प्रत्येक माणसातला एक सूप्त डॉक्टर जागा होतो..आपल्या अल्पमतीने प्रत्येक जण उपाय सुचवत बसतो..खिशात कापूर ठेवा..कानात निलगिरीत बुडवलेला कापसाचा बोळा ठेवा..उपायांचं थैमानच जणू..आणि हे असे forwards वाचून लोकांमधे एकच गोंधळ उडतो..कालपर्यंत ठणठणीत असलेले आपण अचानक आजारपणाच्या..किंबहुना मरणाच्या भितीने ग्रासले जातो..    सतत एकच एक वाचून, ऐकून, त्या बद्दल बोलून आपण फक्त नकारात्मकता पसरवतो आहोत..सगळीकडे भिती, संशय, किळस पसरते आणि यातूनच रोगाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता आहे..त्यामुळे सकारात्मक विचार ही या परिस्थितीशी लढा देण्याची पहिली पायरी..आपण पूर्णत: शारीरिक आ...

भूमिका

Image
  आजी आजोबा हे नातवंडांचे सवंगडीच असतात नाही का? कशी गंमत असते..खरं तर ते आपल्या काही पीढ्या आधीचे..मात्र जे आपल्या आई बाबांनाही जमत नाही ते त्यांना एखादी जादू केल्याप्रमाणे जमतं..आजी आजोबा आपल्या वयाचे होऊन खेळतात..अगदी तासंतास..आई बाबांना समजावता येत नाही ते समजावतात.  खरं तर आजी आजोबांचं काम जास्तं कठीण..त्यांना त्यांच्या मुलांनाही सांभाळून घ्यायचंय आणि नातवंडांनासुद्धा..पण हे सगळं ते अगदी लीलया करत असतात..या भूमिका अगदी सहज निभावत असतात..    हे आठवण्याचं कारण म्हणजे अलिकडे मी माझ्या आजोबांना भेटायला गेले..त्यांचं वास्तव्य मुंबईत असल्यामुळे वरचेवर भेट होऊ शकत नाही याचं नेहमी वाईट वाटतं मला..आजोबांचं वय 93..तब्ब्येत तशी कायमच ठणठणीत..अलिकडे वयोमानामुळे काही किरकोळ तक्रारी जरी होत असल्या तरी आजोबा नेहमीच त्यातून पूर्ण बरे होतात..    व्यवस्थित जेवण जात नसल्यामुळे या वेळी आजोबा बरेच बारीक झालेले दिसले..मी त्यांच्या शेजारी बसले आणि म्हणाले,"आजोबा,जेवताय ना व्यवस्थित?..भूक लागते ना? भूक मारू नका..व्यवस्थित जेवा..जेवला नाहीत तर अशक्तपणा येईल..सगळं जेवत जा.....

'आई' जन्म घेते....

Image
अलिकडे  माझ्या आईच्या तोंडी ब-याचदा हे वाक्य ऐकायला मिळतं ,"अगं आता म्हातारी झाली आई तुझी"..माझ्याच काय, माझ्या वयाच्या सगळ्याच मुलींच्या आया हे म्हणतात..    वय होतं हे नक्की..ते तर सगळ्यांचं वाढतं..मग सहजच एक विचार मनात आला..आई, ही आई केव्हा होते?..सूक्ष्म रूपात म्हणायचं तर बाळाची चाहुल लागते तेव्हा..आणि प्रत्यक्ष रूपात बाळ जन्माला येतं तेव्हा..आईपणाचा अनुभव नवीनच असतो तिच्यासाठी..आपल्या पोटी बाळ यावं यासाठीची शारीरिक आणि मानसिक तयारी तिला फार आधीपासून करावी लागते..याचाच अर्थ आई ही मूल जन्मायच्याही फार आधी जन्म घेते..     हेच वडिलांना लागू असतं..वास्तविक हे 'आई' तत्व वडिलांमधेही असतंच की..केवळ त्यांनी बाळाला गर्भात वाढवलेलं नाही म्हणून बाबा 'आई' नसतो असं म्हणणं किती चुकीचं ठरेल नाही का? जिथे बाळाची चाहूल लागताच 'आई' जन्म घेते तिथेच "बाबा' सुद्धा जन्म घेतो..बाबातलं 'आईपणही' जन्म घेतं.फक्त त्याची पूर्वतयारी,नियोजन वेगळं. पण तितकंच महत्वाचं..हे 'आई' तत्व लक्षात घेऊनच शीर्षक दिलं आहे. त्यामुळे आई बाबा असा भेदभाव नाहीच.     ...

रिक्त

Image
     या बद्दल लिहिण्यापूर्वी स्क्रीन कडे टक लावून खूप वेळ पाहत होते..अर्थातच विषयामुळे..      'रिक्त'..'रिकामं'..यावर शब्द मांडले गेले की हा कॅन्व्हास भरून जाणार. मग रिक्तपणाचं महत्व उरेल का? पण शांतपणे विचार केला की या रिक्तपणाची गरज जाणवेल..त्याचं वेगळं स्थान उमगेल..      एक कोरा कागद आपल्या समोर ठेवला आणि विचारलं की यावर तुम्हाला काय दिसतंय?..काय असेल आपलं स्वाभाविक उत्तर?..की यावर काहिही दिसत नाही..मात्र त्यावर एक लहानसा बिंदू जरी काढला की आपलं सगळं लक्ष त्या बिंदू कडे आकर्षित होतं..एवढं मोठं रिक्त पटल, त्याचं अप्रूप वाटत नाही..पण आपण हे विसरून जातो की तो कागद रिकामा,म्हणून तो त्या बिंदूला सामावून घेतोय..या साठी ते पटल, तो कॅनव्हास कोरा असायला नको का? पण उत्तर देताना मात्र त्या भल्या मोठ्या रिक्त जागेला आपण विषेश महत्व देत नाही.      शांतता सुद्धा अशीच..जिथे आधी शांततेचा रिक्तपणा, तिथेच आवाजाचे महत्व..जिथे आवाज आहे तिथेच आपण जाऊन अजून आवाज मिसळला तर गोंगाटच होणार..      अर्थात सगळीकडे रिक्तपणा असणं 'महाग...

राजे शिवछत्रपती यांस.....

Image
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसुनो: शिवस्यैषा मुद्राभद्राय राजते।। आदरणीय राजे शिवछत्रपती,                         साष्टांग दंडवत🙏...          राजे, आज आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आपणास हे पत्र लिहावेसे वाटले..आपण महाराष्ट्रात जन्म घेतलात हे आमचे केवढे मोठे भाग्य..आपल्या आदरणीय माता-पित्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न आपण साकार केलेत..महाराष्ट्राला मोकळा श्वास घ्यायला शिकवलात आपण..जे आपल्या हक्काचं त्यासाठी लढलंच पाहिजे पण अचूक योजना, नियोजन करून हा दंडक कित्येक वर्षांपूर्वी आपण घालून दिलात...गावोगावी जाऊन जनमानसात मिसळून आपण माणसांना स्वराज्यात जोडलेत..      जात, पात, धर्म, वर्ण याच्या पलिकडे जाऊन आपण 'माणूस' मोठा केलात..केवळ स्वराज्य स्थापन केले नाहीत तर ते फुलवले आणि कणखर बनवलेत..      आपण आणि आपल्या सर्व शूर सैनिकांनी रक्त सांडले म्हणून आज आम्ही हा आजचा महाराष्ट्र पाहू शकलो..      पाहू शकलो हे खरं..पण आपण रुजवलेली मूल्य टिकव...

'भाकरी

Image
    'भाकरी' म्हणताच डोळ्यांपुढे उभी राहते ती मोठ्या आकाराची, पापुद्रे सूटलेली गोलाकार वाफाळलेली भाकरी..     खरंतर 'भाकरी' या शब्दाशी अनेक पैलू निगडित आहेत..उदारणार्थ सौभाग्य, असा शब्द वाचला की त्याचे पैलू येतात...मंगळसुत्र, लाल कुंकू, हिरवा चुडा, जोडवी ई. अगदी तसंच भाकरी म्हटलं की डोळ्यापुढे येते ती चूल, तवा , ठेचा, लोणी, झुणका, पालेभाजी..ई...ज्या प्रमाणे एखाद्या सौभाग्यवतीला पाहिल्यावर तिची दृष्ट काढावीशी वाटेल, त्या प्रमाणेच असा सुंदर थाट असतो भाकरीचा की ती खायची इच्छा पूर्ण करण्यापूर्वी आदराने आधी आपोपाप त्यासमोर नतमस्तक होवू...     आता पूर्वीसारख्या चुली राहिल्या नाहीत आपल्याकडे, तसंच स्वत: शेतात राबून ज्वारी बाजरी पिकवणं किंवा जात्यावर दळणं हे सुद्धा आता नाही.. पण भाकरी करायची पद्धत मात्र वर्षानुवर्ष अबाधित आहे..     या प्रक्रियेतील कलात्मकता मला कायम आकर्षून घेते..पीठ मळणं, खरंतर हाताच्या तळव्याचा वापर करून घोटून घेणं..त्यामुळे शरीरातील उर्जा पीठ शोषून घेतं..आपल्यातलं 'असणं' हेच जणू त्या भाकरीत ओढलं जातं..भाकरी थापणं म्हणजे आईने बाळाला ज...

विसावा

Image
अलिकडेच हे सुंदर छायाचित्र पाहिलं..छायाचित्रकार धृतिमान मुखर्जी यांनी टिपलेला सुरेख क्षण.. विसाव्याचा...समुद्रात बगळ्यासारखा दिसणारा एक पक्षी (Naazca Booby) एका कासवावर विसावलाय आणि त्या कासवाच्या खाली लहानगे मासे छताखाली थांबल्याप्रमाणे विसावलेत..कदाचित त्या बगळ्यापासून संरक्षण व्हावं म्हणून लपलेत..   कलाकार म्हणून श्री.मुखर्जी यांची कमालंच केली आहे..त्यांनाही असा क्षण समुद्रात पहिल्यांदाच पहायला मिळाला असं ते लिहितात..    त्या कासवाला कल्पनाही नाही की आपल्या नकळत आपण कुणाला तरी आसरा दिला..कुणाचा तरी विसावा बनलो.. 'विसावा'..शब्दातच किती शांतता आहे..एखाद्यावर विसावणं..एखाद्यावर हवाला असणं..निश्चिंत असणं की ती व्यक्ती आहे आपल्यापाशी..विश्वास असणं त्यावर पूर्ण..मी आश्रय मागितला तरी ही व्यक्ती नाकारणार नाही..आपल्याला यापासून काहिही धोका नाही..     आता हे कासवंच बघा..त्यावर बसलेला पक्षी आणि त्याखाली थांबलेले मासे दोघांच्या मनात याच भावना आहेत की याच्या सोबत आपण सुरक्षित आहोत..     सगळ्यांनी आठवून पहा..अशी एक तरी व्यक्ती असेलच आपल्या आयुष्यात..अशा लोक...

वाढदिवस

Image
किती गमतिशीर शब्द आहे हा..'वाढदिवस'..वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण एकमेकांना.. खरं तर हा आपला जन्म दिन म्हणून त्याची आठवण काढून आपण एक दिवस स्वत:ला साजरं करतो..तसं बघायला गेलं तर  वाढदिवस म्हणजे आयुष्यातून एक दिवस वजा..मग का बरं साजरा करायचा हा दिवस? वाढदिवस असा शब्द का बरं? काय वाढतं? फक्त वय? ते तर नैसर्गिक झालं..देवाच्या कृपेने आपण त्या दिवशी जीवंत असतो म्हणून आपण म्हणू शकतो की वय एका वर्षाने वाढलं.. मग विचार याचा करायला हवा की वाढायला काय हवं..?   वाढायला हवी ती प्रगल्भता..सकारात्मक विचार करायची..विचार मंथन करायची..आत्मपरीक्षण करायची..थोडक्यात स्वत:चं audit करायची..मानसिक, शारीरिक आणि आर्थिकही..   आणि हे सगळं केलं तरंच पुढला वाढदिवस..पुढली वाढ..पुढली प्रगल्भता साधता येणार..   एक एक वर्षाचं contract च केलं तर स्वत:शी? म्हणजे बघा हां..आपण सगळ्या पातळ्यांवर खरे उतरतोय का असा report तयार करायचा..कुठे कमी पडलो त्याची वेगळी यादी करायची आणि या वर्षात त्यावर काम करू असं आश्वस्त करायचं स्वत:ला..किती मजा येईल बघा..   कशाला कुणाशी स्पर्धा करा..आपली प्रगती ...

एकांत

Image
 प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा... 'एकांत'...आपल्याला कितीही मित्र असले तरी या मित्रा सारखा कुणी नाही..सततच्या गलक्यात..गर्दीतून मग ती विचारांची असो किंवा माणसांची..त्यापासून लांब जाऊन या मित्राला कधी भेटता येतंय याची आपण आतुरटेने वाट पाहत असतो..  एकटेपणा आणि एकांत यात खूप फरक आहे बरं का..एकटेपणा कंटाळवाणा असतो तर एकांताची आपल्याला गरज असते..एकांतात माणुस आत्मपरीक्षण करू शकतो..आपली कृती..आपले विचार पारखून बघू शकतो..म्हणूनच हा एकांत नावाचा मित्र भेटला की त्याच्याशी आपण मोकळा संवाद साधू शकतो..   हा आपल्याला माहिती असलेला अर्थ..तोही तितकाच महत्वाचा..आज या शब्दाचा खरा अर्थ वाचला..'एक' म्हणजे आपण..'मी'...या 'मी' ची आपल्याला जाणीवही नसते जेव्हा आपण जन्म घेतो..नंतर आपल्याला एक नाव दिले जाते..आपल्यावर संस्कार घडतात..आणि आपण जे काही करतो त्याला आपण म्हणतो हे 'मी' केले..आणि याचे रूपांतर अहंपणात होते..आपण हे विसरून जातो की इथे या निर्गुण निराकारची सत्ता..त्याच्या समोर आपण फक्त एक घटक..   हा अहंभाव असलेला 'मी' 'एक'...त्याचा अंत होणे म्हणजे...

शिवथर घळ

Image
गडांचा राजा 'रायगड' पाहून दुस-या दिवशी खाली आलो..येताना ropeway चा वापर केला..तेवढाच हाही अनुभव मिळावा..अवघ्या 4 मिंटात खाली..विज्ञानाची खरंच कमाल आहे..अर्थात गड चढून जाण्याप्रमाणे उतरून येण्याची मजा वेगळीच..पण पुढलं destination लौकर गाठता यावं यासाठी वेळ वाचावा हा प्रयत्न..   अलिकडे श्री सद्गुरू यांचा एक छान विचार वाचला..त्यांच्याच श्ब्दात इथे लिहिते..'Do not go in search of a Guru...when the pain of ignorance within you becomes a scream,  a Guru will come in search of you'...    थोडक्यात गुरू भेट घडते ती योग्यवेळ आल्यावर..अशाच योग्य समयी महाराजांना भेटले ,ते त्यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी.. 1653 च्या सुमारास वरंधा घाटातील शिवथर येथील एका काळोख्या गुहेत कुबडीवर रेलून..दीपप्रकाशात एक अत्यंत तेजस्वी सत्पुरूष कर्मयोगाचे तत्वज्ञान ओवीबद्ध करण्यात मग्न झाले होते...समर्थ रामदास स्वामी!! त्यांच्या कठोर साधनेतून 'दासबोध' याच शिवथरघळीत उदयास आले..      'शिवथरघळ' हेच ठिकाण समर्थांनी का निवडले असा एक संदर्भ काही दिवसांपूर्वी वाचण्यात आला..तो असा की ही जगा...

दुर्गराज

Image
'रायगड'...'गडांचा राजा, राजांचा गड'.. अशी ही मायभूमी 'रायगड' आपले आराध्य राजे शिवछत्रपतींची राजधानी पाहण्याचा बेत ठरला..गडावरंच रहाण्याची सोय झालीच होती.. आधी राजमाता जाजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले..मात्र गड चढून जाण्याचा विचारही शिवला नव्हता..आपण आपलं ropeway मार्गी जाऊया म्हटलं..त्यानुसार थोडंफार सामान घेऊन निघालो..रविवार असल्यमुळे ropeway ला 6 तास waiting..काय करावं सुचेना इतक्यात एक बोरं विकणा-या आजी भेटल्या..म्हणाल्या अहो कुठे थांबता..जा चढत...2 तासात पोहोचाल..या मी shortcut दाखवते..500 पाय-या वाचवते..(ही बहुदा त्यांची tag line असावी..जाता येता सगळ्यांना हेच सांगत होत्या)   थोडा विचार केला..म्हटलं आपल्या workout चा उपयोग करून घेण्याची हीच ती वेळ...पायात sports shoes नसले तरी floaters होते..पाठीवर sacks आणि एक handbag..महाराजांचं नाव घेतलं आणि सुरूवात केली..short cut पूर्ण माती आणि खडकांचा..एक दगड रोवलेला तर  दुसरा ठिसूळ..एकदा तर माझा एक पाय सटकला तेव्हा 'हिरकणी' ची गोष्ट आठवली..श्वासही अडकल्यासारखा अनुभव आला..पण थोडं बसल्यावर बरं वाटलं..सचिन ...