Posts

कुकर

Image
   आज सकाळी चहा घेत बसले होते..गॅस वर कुकर लावला होता..हा कुकर माझ्या सासुबाईंचा अत्यंत लाडका..20 एक वर्ष तर नक्कीच झाली असतील त्याला..बरोबर आहे..आपण आपल्या कष्टाने घेतलेल्या वस्तू किंवा भेट म्हणून मिळालेली वस्तू जपून वापरतोच..वय झाल्यावर जसे म्हाता-या माणसांचे दात त्यांना अच्छा करतात तसंच या कुकर चे स्क्रु एक एक करून याला टाटा करत करत साश्रू नयनांनी निरोपही देतात..पण घरात वापरायला दुसरा कुकर असला तरी हा कुकर सासूबाईंना प्राणांहून प्रिय आणि म्हणूनच डॉक्टर जसा रुग्णाला वाचवायचे आटोकाट प्रयत्न करतात तसेच प्रयत्न माझ्या सासूबाई या कुकर ला वाचवण्यासाठी करत असतात..त्याचे स्क्रु पुन्हा पुन्हा बसवून आणतात..वाफ धरत नसली की रिंग बदलतात..नाही नाही..चुकलं..बसवून आणायला सांगतात ..कुणाला? अहो असं काय करताय..'क्षणाचा सवंगडी आणि अनंतकाळचा गडी'...ओळखलं असेलंच तुम्ही.. नवरा..    आणि माझे सासरे अगदी निमुटपणाने दर वेळी तितक्याच उत्साहाने कुकर दुरुस्त करून आणतात..माझ्या मनात नेहमी विचार येतो..एकदा तरी सासरे वैतागले असतील..की नाही बाबा मी नाही जाणार..नवीन कुकर आणू आपण आता..पण कसं काय दे...

लळा 🥰🥰🥰🥰

   ही एक अशी भावना आहे जी वय, जात,पात, धर्म, वर्ण सगळ्याच्या पलिकडे घेऊन जाते..इथे आपण, हा माणुस आहे का प्राणी आहे का पक्षी आहे का हे एक वृक्ष आहे असा भेदभाव नक्कीच करत बसत नाही.. एकदा का लळा लागला की वाटणारी ओढ आपण रोखू शकतो का?     खूप दिवसांपासून जे पाहत आले त्या बद्दल आज लिहावंसं वाटलं..आमच्या समोरच्या बंगल्यात खडतरे नावाचं वृध्द दांपत्य गेली बरीच वर्ष राहतंय..अगदी जक्ख म्हातारे नसले तरी साधारण 70 री च्या आसपास दोघांची वयं असतील..त्यांची मुलं बाळं बहुदा मुंबईकडे स्थायिक असावी..काही निमित्तानेच त्यांचं इथे येणं होतं. पण सुख वस्तू कुटुंब आहे..आजोबा तसे ठणठणीत, अजूनही कार्यरत आहेत..आजींना वयोमानानुसार काही तक्रारी आसल्यातरी घरातल्या घरात का होईना हिंडत्या फिरत्या आहेत..     बंगल्या मागच्या outhouse मधे त्यांचं मदतनीस कुटुंब राहतं..नवरा बायको आणि त्यांची 2 लहान मुलं..मुलगा साधारण 5-6 वर्षांचा आणि मुलगी 2 वर्षांची..आपलंच घर आणि हे आपलेच आई वडील समजून हे दोघे घरात सगळी व्यवस्था पाहतात..बंगल्याची स्वच्छता, स्वयंपाक पाणी , बाहेरची महत्वाची कामं..ते अगदी आजोबा क...

शाळेकडली वाट

Image
  हे शीर्षक वाचल्यावर आपल्या सगळ्यांच्या आठवणी जाग्या झाल्या असतील नक्की..आपल्या बालपणापासून ते कळत्या वयाला (असं म्हणायचय😅 फक्त) पोहोचेपर्यंत आपली खास मैत्रीण म्हणजे आपली शाळा..आणि विषेश करून जर आपण सलग काही वर्ष एकाच शाळेत गेलो असलो तर आपलं एक वेगळं नातं जमून जातं तिच्याशी..पण याइतकंच आपल्याला काय आठवत असेल तर तो शाळेकडे जायचा रस्ता..कळत नकळत या वाटेशी सुद्धा आपलं एक नातं होऊन जातं..   माझी शाळा म्हणजे बदलापूरची इंडियन एज्युकेशन सोसायटीची कात्रप विद्यालय..इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी (6वी 7वी वगळता) असा मोठा काळ मी या शाळेची विद्यार्थिनी होते.. 1993-2003 ...बदलापुरात  कात्रप नावाचं छोटं गाव होतं..त्यानजिक शाळा असल्यामुळे शाळेला कात्रप विद्यालय असं नाव..बदलापूर हे, शहर म्हणून तेव्हा पूर्ण विकसित नव्हतं..काही भागात तेव्हाही अगदी खेडं नाही तरी गाव संस्कृती जपली होती..हे गाव पार करून पुढे गेलं की शाळेची इमारत दिसे..तेव्हा तरी शाळेकडे जायला हा एकच रस्ता होता..   शाळा तशी घराजवळंच होती..कधी चालत..कधी सायकल वरून अशी मजा करत आम्ही शाळेत जायचो..कात्रप गावातून शाळेकडे जाय...

निर्धास्त..

Image
   काल पासून एक विधान चर्चेत आलं.."आपली तयारी आहे कोरोना बरोबर जगायची , पण कोरोना ची तयारी आहे का आपल्याला त्याच्या सोबत जगू द्यायची"..    याचं उत्तर आहे 'हो'...त्याची तयारी आहे..म्हणून तर तो एवढा चिवट झालाय की जाता जात नाहिये..ठीक आहे..राहा बाबा..आता काय..    यावर लस तयार होण्याची प्रक्रीया सुरू आहे..ती येईलही काही दिवसात..तोपर्यंत काय? असंच घाबरत बसाचंय आपण?    मला आठवतं गर्दीच्या रसत्यावर किंवा भाजी मंडईत गेले की माझी बडबड सुरू..हा रस्ता शांत असता तर ..किती गर्दी किती आवाज हा..नको हे सगळं..आज जाणवतंय ही वाक्य किती महागात पडली..गर्दी हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक झाला आहे आणि त्यासोबतच आपण जगलं पाहिजे तेही विनातक्रार..उलंट असं म्हणावं लागेल की गर्दी ही आपली संस्कृती आहे..त्याचा स्वीकार केला पाहिजे.. आज सगळीकडे आपल्याला आवडते तशी शांतता आहेच की..शाळा शांत..का-यालय शांत..गल्लीबोळ मोठाले रस्तेही शांत..पण ही अशी शांतता काय उपयोगाची..? कला-क्रीडा-पर्यटन-खरेदी-विक्री आणि बहुतेक सर्व क्षेत्राच्या व्ययसायाचा अमुलाग्र भाग म्हणजे गर्दी..तेव्हा..गर्दी ...

आगळी अभिव्यक्ती

Image
    आपल्या पैकी ब-याच घरांत आजी-आजोबा असतील...आजी-आजोबा म्हणजे वृद्ध..साधारण 80-85 किंवा त्याहून अधिक वय पार केलेले..पण तब्ब्येतीने तसे ठणठणीत..स्वत: स्वत:चं सगळं दिनमान पार पाडू शकणारे..       आमच्या घरात आजोबा, वय वर्ष 93 आणि आजी वय वर्ष 85-86(नात्याने माझे आजे-सासूसासरे) अशी ठणठणीत जोडी आहे..ठणठणीत शब्दावर अशासाठी जोर दिला की काही तब्ब्येतीच्या गंभीर तक्रारीच्या दिव्यातून जाऊन सुद्धा त्यातून पूर्ण बरे होऊन हे दोघे आनंदाने जगताहेत..       आजींना एका कानाने अजिबात ऐकू येत नाही..मला तर कधीतरी वाटतं दोन्ही कानांनी असावं..कारण त्यांना काहीही सांगायचं झालं की काही वेळाने मला धाप लागते इतक्यांदा..आणि इतक्या जोराने सांगावं लागतं...कानाचं यंत्र न वापरण्याच्या यांच्या सारख्या बहुतांश आज्यांशी घरोघरी असाच संवाद होत असावा..😅😅पण आजोबांना मात्र मी एकच गोष्ट आजींना ऐकू न आल्यामुळे 7 ते 8 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने सांगताना ऐकलंय..😅😅इतक्यांदा सांगून जेव्हा आजीला कळतं तेव्हा आपण मात्र world cup जिंकल्याचा जितका आनंद क्रिकेट प्रेमिंन...

प्रिय बूझो

Image
    आज बरोबर 5 वर्ष झाली तू आमच्यात नसून..5 वर्ष..म्हटलं तर मोठा काळ..पण एक तो दिवस आहे आणि एक आजचा दिवस..तुझी आठवण आली नाही असं झालंच नाही कधी..या निमित्ताने तुला हे प्रेमाचं पत्र..      तशी मी कुत्र्यांना घाबरणारीच बरं का? त्या टोकाला कुत्रा दिसला की या टोकावरून मागे फिरणारी..आता मात्र वाटतं, का नाही भिती घालवायचा प्रयत्न केला मी आधी?..जगातल्या सर्वात सुंदर प्रेमाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न का नाही केला कधी?      लग्ना अगोदर मी इथे घरी यायचे तेव्हा मी दिसल्या दिसल्या तू इतका भुंकायचास की मी गेट उघडून आत यायलाही घाबरायचे..तेव्हा वाटलंही नव्हतं की पुढे तू माझा खास दोस्त होशील..      2006 साली जेव्हा तुला सचिन ने घरी आणलं तेव्हा आम्ही कॉलेज च्या दुस-या वर्षाला होतो..दोन अडीच महिन्यांचा होतास तू..छोटासा.. मस्तीखोर..घरभर फिरायचास..खुर्चीवर चढून बसायचास..या गमती जमती कळायच्या मला आणि हे सगळं मी miss केल्याचं वाईटंही वाटायचं..      आमचं लग्न ठरल्यावर एक गोष्ट माझे बाबा मला नेहमी सांगायचे..बूझो जेव्हा तुला accept करेल ते...

प्रेरणास्रोत...

Image
  गणित विषयाशी माझी गट्टी जमली नाही ती नाहीच कधी..बेरीज, वजापाकी, गुणाकार, भागाकार, पाढे पाठ करणं हे सगळं मी शाळेत असताना केलं ते केवळ नाइलाज म्हणून ..नावडता विषय तर तो होताच माझा पण मला भिती होती गणिताची..phobia..म्हणजे लोकांना उंचीचा phobia असतो..अंधाराचा असतो..तसा मला गणिताचा..माझ्या मनाने हे ठरवलेलं असायचं की बास हे आपल्याला येणार नाही..एखादं गणित सोडवायला पहिली step काय इथेच मुळात डोकं चालत नसे..भिती मुळे मी गणिताचा अभ्यास तसा नावडीनेच करायचे..पण डोक्यात घुसतंय का हे बघायचेच नाही..आणि ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी मला काहिही येत नाही या भितीने भोकाड पसरायचे..मग आई ची थोडी बोलणी खायची..ती समजावेल तितकं समजून घ्यायचं आणि पेपर द्यायचा..आईच्या प्रयत्नांमुळे मी गणितात कधी नापासही झाले नाही किंवा काठावर pass ही झाले नाही..खूप भारी नसले तरी ok marks मिळायचे..गेल्याजन्मी काय पापं केली आणि गणित विषय या जन्मात भेटला असं नेहमी वाटायचं मला..     पण या सगळ्याला छेद दिला तो पाचवीच्या वर्षाने..आईने माझ्यापुढे हात टेकले आणि मला गणिताचा क्लास लावला...मुळात जो विषय मला आवडत नाही त्य...

फणस

Image
    निसर्गाच्या किमयेतील मला ठाऊक असलेला हा आविष्कार की जो खरं तर फळ आहे का भाजी हे कोडंच कधी उलगडलेलं नाही..    प्रथिनं , खनीजं , कर्बोदकं या आणि अशा अनेक पोषण मूल्यांचा खजीना फणसात आहेच..शिवाय झाड म्हणूनही फणस उपयुक्त..फणसाच्या लाकडाला वाळवी लागत नसल्यामुळे फर्निचर साठी याचा भरपूर वापर होतो..गराचा भाग सोडल्यास उरलेला 55 ते 65% भाग हा प्राण्यांसाठी खाद्य म्हणूण उपयोगाला येतो..    वा..काय कमाल आहे निसर्गाची..म्हणजे बघा हां..तसं फणस हे स्वयंभू झाड..अपोआप रुजतं ..आपोआप वाढतं ...स्वत: स्वत:ला बहरवतं..तसा maintainence काहीच नाही..आणि असं सगळं असूनही या फणसाचं कोडं उलगडंत नाही..ज्यांना भाजीतून आनंद मिळतो अशांसाठी तो भाजीच्या रुपात समोर येतो..ज्यांना गरे किंवा साटं आवडतात त्यांच्यासाठी तो फळ म्हणून प्रकटतो..आणि एवढं सगळं असूनही हे असं का याचं उत्तर आपल्याकडे नाही.    माणसांचं पण असंच असतं का? आपण म्हणतो ना  "हा माणुस काही बुवा आपल्याला अजून समजत नाही..". म्हणजे पाहिलं तर त्याचं सगळं वागणं बोलणं उघड उघड असतं..मनमिळावू असतो..चार लोकांप्रमाण...

संधी

Image
   या अशा परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागेल असं कुणाला कधीही वाटलं नसेल..पूर्वी साथीचे रोग यायचे. मात्र औषधोपचाराअभावी आणि पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यात लोकांना जीव गमवावा लागायचा असं फक्त ऐकलेलं..    पण आज विज्ञानाची एवढी प्रगती झालेली असताना सुद्धा 2020 मधे आपल्याला या संकटाला तोंड द्यावं लागतंय..."छे ओ, पूर्वी रोगांची साथ यायची..तेव्हा मरायचे लोक..आता असं होत नाही" या आपल्या over confidence ला एक सणसणीत चपराक निसर्गाने दिली..    एवढंच नव्हे तर 'मी मोठा तू लहान'..'माझा देश छान' 'तुझा नाही'..आम्ही जास्तं भारी तुम्ही नाही वगैरे सगळ्यावरून आपण धाडकन खाली आपटलो आहोत..आज अक्खं जग locked down आहे..कुणाचं जास्तं आर्थिक नुकसान झालंय तर कुणाचं कमी..पण नुकसान सगळ्यांचं झालंय हे नक्की..आज आपल्या जाती धर्मांचे फक्त कागद उरलेत..कुणी हिंदू नाही, मुसल्मान नाही, मराठा नाही.. आपण फक्त आणि फक्त भारतीय आहोत..    आज आपण सगळे एकाच बोटीतले प्रवासी झालेलो आहोत..बोट बुडण्याच्या मार्गावर असताना ती वाचावी या करता सहप्रवासी म्हणून आपल्याला ज...

Good vibes only

Image
  10 वर्षांपूर्वी चं चक्र पुन्हा फिरलं..तेव्हा स्वाइन फ्लू  आणि आत्ता कोरोना...सद्ध्या कोरोना व्हायरस ला जितकी publicity मिळते आहे तितकी क्वचितच कुणा जिवाला मिळाली असेल पृथ्वीतलावर..हो..तो सुद्धा जीवच शेवटी..तो म्हणत असेल की आता आलोय त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे..जसा एखादा परदेशी पाहुणा इथे आला की म्हणेल..मिम्स म्हणू नका..जोक म्हणू नका...animations म्हणू नका..आणि असे काही साथीचे रोग आले आपल्या इथे की प्रत्येक माणसातला एक सूप्त डॉक्टर जागा होतो..आपल्या अल्पमतीने प्रत्येक जण उपाय सुचवत बसतो..खिशात कापूर ठेवा..कानात निलगिरीत बुडवलेला कापसाचा बोळा ठेवा..उपायांचं थैमानच जणू..आणि हे असे forwards वाचून लोकांमधे एकच गोंधळ उडतो..कालपर्यंत ठणठणीत असलेले आपण अचानक आजारपणाच्या..किंबहुना मरणाच्या भितीने ग्रासले जातो..    सतत एकच एक वाचून, ऐकून, त्या बद्दल बोलून आपण फक्त नकारात्मकता पसरवतो आहोत..सगळीकडे भिती, संशय, किळस पसरते आणि यातूनच रोगाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता आहे..त्यामुळे सकारात्मक विचार ही या परिस्थितीशी लढा देण्याची पहिली पायरी..आपण पूर्णत: शारीरिक आ...

भूमिका

Image
  आजी आजोबा हे नातवंडांचे सवंगडीच असतात नाही का? कशी गंमत असते..खरं तर ते आपल्या काही पीढ्या आधीचे..मात्र जे आपल्या आई बाबांनाही जमत नाही ते त्यांना एखादी जादू केल्याप्रमाणे जमतं..आजी आजोबा आपल्या वयाचे होऊन खेळतात..अगदी तासंतास..आई बाबांना समजावता येत नाही ते समजावतात.  खरं तर आजी आजोबांचं काम जास्तं कठीण..त्यांना त्यांच्या मुलांनाही सांभाळून घ्यायचंय आणि नातवंडांनासुद्धा..पण हे सगळं ते अगदी लीलया करत असतात..या भूमिका अगदी सहज निभावत असतात..    हे आठवण्याचं कारण म्हणजे अलिकडे मी माझ्या आजोबांना भेटायला गेले..त्यांचं वास्तव्य मुंबईत असल्यामुळे वरचेवर भेट होऊ शकत नाही याचं नेहमी वाईट वाटतं मला..आजोबांचं वय 93..तब्ब्येत तशी कायमच ठणठणीत..अलिकडे वयोमानामुळे काही किरकोळ तक्रारी जरी होत असल्या तरी आजोबा नेहमीच त्यातून पूर्ण बरे होतात..    व्यवस्थित जेवण जात नसल्यामुळे या वेळी आजोबा बरेच बारीक झालेले दिसले..मी त्यांच्या शेजारी बसले आणि म्हणाले,"आजोबा,जेवताय ना व्यवस्थित?..भूक लागते ना? भूक मारू नका..व्यवस्थित जेवा..जेवला नाहीत तर अशक्तपणा येईल..सगळं जेवत जा.....

'आई' जन्म घेते....

Image
अलिकडे  माझ्या आईच्या तोंडी ब-याचदा हे वाक्य ऐकायला मिळतं ,"अगं आता म्हातारी झाली आई तुझी"..माझ्याच काय, माझ्या वयाच्या सगळ्याच मुलींच्या आया हे म्हणतात..    वय होतं हे नक्की..ते तर सगळ्यांचं वाढतं..मग सहजच एक विचार मनात आला..आई, ही आई केव्हा होते?..सूक्ष्म रूपात म्हणायचं तर बाळाची चाहुल लागते तेव्हा..आणि प्रत्यक्ष रूपात बाळ जन्माला येतं तेव्हा..आईपणाचा अनुभव नवीनच असतो तिच्यासाठी..आपल्या पोटी बाळ यावं यासाठीची शारीरिक आणि मानसिक तयारी तिला फार आधीपासून करावी लागते..याचाच अर्थ आई ही मूल जन्मायच्याही फार आधी जन्म घेते..     हेच वडिलांना लागू असतं..वास्तविक हे 'आई' तत्व वडिलांमधेही असतंच की..केवळ त्यांनी बाळाला गर्भात वाढवलेलं नाही म्हणून बाबा 'आई' नसतो असं म्हणणं किती चुकीचं ठरेल नाही का? जिथे बाळाची चाहूल लागताच 'आई' जन्म घेते तिथेच "बाबा' सुद्धा जन्म घेतो..बाबातलं 'आईपणही' जन्म घेतं.फक्त त्याची पूर्वतयारी,नियोजन वेगळं. पण तितकंच महत्वाचं..हे 'आई' तत्व लक्षात घेऊनच शीर्षक दिलं आहे. त्यामुळे आई बाबा असा भेदभाव नाहीच.     ...

रिक्त

Image
     या बद्दल लिहिण्यापूर्वी स्क्रीन कडे टक लावून खूप वेळ पाहत होते..अर्थातच विषयामुळे..      'रिक्त'..'रिकामं'..यावर शब्द मांडले गेले की हा कॅन्व्हास भरून जाणार. मग रिक्तपणाचं महत्व उरेल का? पण शांतपणे विचार केला की या रिक्तपणाची गरज जाणवेल..त्याचं वेगळं स्थान उमगेल..      एक कोरा कागद आपल्या समोर ठेवला आणि विचारलं की यावर तुम्हाला काय दिसतंय?..काय असेल आपलं स्वाभाविक उत्तर?..की यावर काहिही दिसत नाही..मात्र त्यावर एक लहानसा बिंदू जरी काढला की आपलं सगळं लक्ष त्या बिंदू कडे आकर्षित होतं..एवढं मोठं रिक्त पटल, त्याचं अप्रूप वाटत नाही..पण आपण हे विसरून जातो की तो कागद रिकामा,म्हणून तो त्या बिंदूला सामावून घेतोय..या साठी ते पटल, तो कॅनव्हास कोरा असायला नको का? पण उत्तर देताना मात्र त्या भल्या मोठ्या रिक्त जागेला आपण विषेश महत्व देत नाही.      शांतता सुद्धा अशीच..जिथे आधी शांततेचा रिक्तपणा, तिथेच आवाजाचे महत्व..जिथे आवाज आहे तिथेच आपण जाऊन अजून आवाज मिसळला तर गोंगाटच होणार..      अर्थात सगळीकडे रिक्तपणा असणं 'महाग...

राजे शिवछत्रपती यांस.....

Image
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसुनो: शिवस्यैषा मुद्राभद्राय राजते।। आदरणीय राजे शिवछत्रपती,                         साष्टांग दंडवत🙏...          राजे, आज आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आपणास हे पत्र लिहावेसे वाटले..आपण महाराष्ट्रात जन्म घेतलात हे आमचे केवढे मोठे भाग्य..आपल्या आदरणीय माता-पित्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न आपण साकार केलेत..महाराष्ट्राला मोकळा श्वास घ्यायला शिकवलात आपण..जे आपल्या हक्काचं त्यासाठी लढलंच पाहिजे पण अचूक योजना, नियोजन करून हा दंडक कित्येक वर्षांपूर्वी आपण घालून दिलात...गावोगावी जाऊन जनमानसात मिसळून आपण माणसांना स्वराज्यात जोडलेत..      जात, पात, धर्म, वर्ण याच्या पलिकडे जाऊन आपण 'माणूस' मोठा केलात..केवळ स्वराज्य स्थापन केले नाहीत तर ते फुलवले आणि कणखर बनवलेत..      आपण आणि आपल्या सर्व शूर सैनिकांनी रक्त सांडले म्हणून आज आम्ही हा आजचा महाराष्ट्र पाहू शकलो..      पाहू शकलो हे खरं..पण आपण रुजवलेली मूल्य टिकव...

'भाकरी

Image
    'भाकरी' म्हणताच डोळ्यांपुढे उभी राहते ती मोठ्या आकाराची, पापुद्रे सूटलेली गोलाकार वाफाळलेली भाकरी..     खरंतर 'भाकरी' या शब्दाशी अनेक पैलू निगडित आहेत..उदारणार्थ सौभाग्य, असा शब्द वाचला की त्याचे पैलू येतात...मंगळसुत्र, लाल कुंकू, हिरवा चुडा, जोडवी ई. अगदी तसंच भाकरी म्हटलं की डोळ्यापुढे येते ती चूल, तवा , ठेचा, लोणी, झुणका, पालेभाजी..ई...ज्या प्रमाणे एखाद्या सौभाग्यवतीला पाहिल्यावर तिची दृष्ट काढावीशी वाटेल, त्या प्रमाणेच असा सुंदर थाट असतो भाकरीचा की ती खायची इच्छा पूर्ण करण्यापूर्वी आदराने आधी आपोपाप त्यासमोर नतमस्तक होवू...     आता पूर्वीसारख्या चुली राहिल्या नाहीत आपल्याकडे, तसंच स्वत: शेतात राबून ज्वारी बाजरी पिकवणं किंवा जात्यावर दळणं हे सुद्धा आता नाही.. पण भाकरी करायची पद्धत मात्र वर्षानुवर्ष अबाधित आहे..     या प्रक्रियेतील कलात्मकता मला कायम आकर्षून घेते..पीठ मळणं, खरंतर हाताच्या तळव्याचा वापर करून घोटून घेणं..त्यामुळे शरीरातील उर्जा पीठ शोषून घेतं..आपल्यातलं 'असणं' हेच जणू त्या भाकरीत ओढलं जातं..भाकरी थापणं म्हणजे आईने बाळाला ज...